Home A एकेश्वरवाद A सर्वसत्ताधिश

सर्वसत्ताधिश

हे मान्य केल्यानंतर की मनुष्याने एखाद्या आज्ञेच्या अधीन राहणे त्याची स्वत:ची गरज आहे, नाही तर एक मनुष्य दुसऱ्यासाठी संकट बनेल. असा प्रश्न उभा राहतो की, या सामाजिक प्राण्याला मर्यादेच्या बंधनात ठेवणारा कोण असावा? अखेर माझा हुकूम तुमच्यावर व तुमचा हुकूम माझ्यावर का चालावा? हुकूम चालविण्याचा हा अधिकार कोठून व कोणत्या आधारे प्राप्त होतो? त्याचबरोबर ही गोष्टसद्धा दृष्टीसमोर असावी की, हुकूम चालविणे आणि लोकांचे मस्तक आपल्यासमोर नमविणे इतकी रूचकर गोष्ट आहे की, यापेक्षा अधिक कोणतीही चविष्ट गोष्ट मनुष्याला शोधून काढणे शक्य झाले नाही. ही गोष्ट इतकी चवदार आहे की, तिच्यासाठी भावाने भावाचा गळा कापलेला आहे. पुत्र पित्याशी दोनहात करण्यास सरसावला आहे. तिच्यासाठी कोण सूर्याचा प्रतिनिधी बनला? कुणी चंद्राशी संबंध जोडले? फिरऔन, सूर्यवंशी व चंद्रवंशी याच गोष्टीचा चमत्कार आहे. कोणी एखाद्या अन्य नामधारी ईश्वराचा प्रवक्ता बनला. थोडक्यात असे की, ईश्वराच्या सेवकांवर आपली आज्ञा चालविण्याच्या आवडीने मानवाकडून ते सर्वकाही करविले, जे त्याच्या डोक्यात येऊ शकत होते. रक्ताच्या नद्या वाहविल्या गेल्या. पृथ्वीचे तुकडे तुकडे करविले गेले. राष्ट्रांनी हल्ले चढविले. जातींना वांशिक श्रेष्ठत्वाची मदिरा पाजली गेली. धार्मिक वेड उत्पन्न केले गेले, म्हणजेच, ज्या कोणत्या प्रकारे शक्य झाले, सामान्य लोकांचा आपल्या या आकांक्षेसाठी उपयोग केला गेला. यापेक्षाही मोठे संकट असे की, जेव्हा सत्यासाठी संघर्ष केले गेले आणि ईश्वराच्या सेवकांना सेवकांच्या गुलामीतून मुक्तता प्रदान करून देण्याचे प्रयत्न केले गेले, तेव्हा त्यांनासुद्धा त्याच जमातीचे समजले गेले व समजाविले गेले.
हळूहळू जेव्हा बादशाही लोकशाहीचा काळ आला आणि मानव बौद्धिक व सांस्कृतिक उन्नती करता करता अशा ठिकाणी पोचला की प्रत्येक गोष्टीचे व प्रत्येक पद्धती व तत्त्वाचे विश्लेषण करून निश्चित करू लागला, तेव्हा त्याच दोन गोष्टी ज्यांचा आताच उल्लेख आला, अधिक स्पष्ट रूपात समोर आल्या. एक अशी की, एकाला दुसऱ्यावर आपली आज्ञा चालविण्याचा अधिकार कोठून व का मिळाला? दुसरी अशी की, ज्याला कोणाला हुकूम चालविण्याचा अधिकार असेल अथवा त्याला हा अधिकार दिला गेला, त्याने प्रत्येक दोष व उणिवांपासून स्वच्छ, शुचिर्भूत व पवित्र असले पाहिजे. पहिल्या गोष्टीसंबंधी निश्चित केले गेले की, प्रत्येकाच्या आईने त्याला स्वतंत्र म्हणून जन्म दिला आहे, त्याच्यावर कुणाची मर्जी चालू नये. एखाद्या कुलीनाचीही नाही आणि एखाद्या पोपचीही नाही. न एखाद्या राजाची न कोणत्या ईश्वराची. तर त्यावर स्वत: त्याचीच मर्जी चालली पाहिजे. ही मर्जी कशी चालेल? त्याचे प्रकार एकापेक्षा अधिक आहेत. दुसऱ्या गोष्टीसंबंधी मानवी बुद्धीने विचार केला की, सर्वसत्ताधिकार आणि दोष व उणिवांत विरोध आहे. सर्वसत्ताधिकाऱ्याला दोष, उणिवांपासून स्वच्छ व चुकापासून मुक्त असणे आवश्यक आहे. या गरजेपोटी त्यांनी ज्या कोणा सर्वसत्ताधिकाऱ्याला राजमुकूट घातला त्याला शुचिर्भूत व पवित्र गृहीत धरले; या गोष्टीचा विचार न करता की, तो असा असो वा नसो. इटलीत मुसोलिनीच्या काळात जागोजागी लिहिले होते, “मुसोलिनी चुका करीत नाही.” यापूर्वी चर्चकाळात जागोजागी लिहिलेले असे, “पोप चुका करीत नाही.” मानवी वृद्धी ही गोष्ट मान्य करीत नाही की, चुका करणारी व्यक्ती सर्वसत्ताधिकारी बनू शकते. ‘रूसो’ ज्याची देणगी वर्तमान निधर्मी लोकशाही आहे, त्यानेसुद्धा जेव्हा सामान्यजनांना सर्वसत्ताधारी बनविले तेव्हा त्याच्यासमोर अशी अडचण आली की, जनसमूह ज्याला सामान्य लोक मूर्ख म्हणतात, त्याला शुचिर्भूत व पवित्र कसे मानावे व मानावयास लावावे? म्हणून त्याने आम लोकांची इच्छा अथवा Common will च्या नावाने निर्मिती केली व त्याला निर्दोष व अचूक गृहीत धरले. हे सर्व अशासाठी की, कोणत्याही राजनैतिक व्यवस्थेचा पाया सर्वसत्ताधिकारी असतो आणि त्याला मानल्याशिवाय कोणतीही राजनैतिक व्यवस्था प्रत्यक्षात येऊ शकत नाही आणि सर्वसत्ताधिकाऱ्याला शुचिर्भूत व पवित्र मानल्याशिवाय अन्य उपाय नाही. मी शपथपूर्वक सांगू शकतो की, मी बालपणापासून “सुब्बूहुन कु सुन रब्बुना व रब्बुल मलाइकति वरूह” पठन करीत असे. याचा अर्थसुद्धा माहीत होता. परंतु जेव्हा राजनैतिक व्यवस्थेच्या सर्वसत्ताधिकाऱ्याच्या अपेक्षित आवश्यक गुणांनी परिचित झालो, तेव्हा कुठे कळले की, ‘शुचिर्भूत व पवित्र’ चा अर्थ असा आहे. कदाचित सर्वसामान्य मुस्लिमांप्रमाणे मीसुद्धा नकळतपणे विचार न करता काहीसा असाच नि:संदिग्ध विचार बाळगत होतो की, ज्याप्रमाणे राजेलोक स्तुतिकाव्यावर खूश होऊन बक्षिसे देत असत, त्याप्रमाणे महान अल्लाहसुद्धा प्रसन्न होत असेल की, माझे सेवक किती चांगले आहेत की माझे गुणगान करीत आहेत. माझी प्रशंसा करीत आहेत. मला शुचिर्भूत व पवित्र मानीत आहेत. अल्लाहसंबंधी ही कल्पना अनिच्छेने विचार केल्याशिवाय बनते. पण आता मी इतक्या विचार व चिंतनानंतर मनातून उसळणाऱ्या विश्वासाने सांगतो की, अल्लाहला आमच्या स्मरण व प्रशंसेची गरज नाही. आम्ही त्याच्या त्या गुणांचे याचक आहोत. आम्ही त्याची गरज नाही. तो जगातील सर्वांत मोठे सत्य असण्याबरोबरच आमची सर्वांत मोठी गरज आहे. आम्ही त्याला व त्याच्या गुणांना समजू शकत नाही. आमच्याजवळ त्याला व त्याच्या गुणांना समजण्याचे कोणतेही साधन नाही. हे त्याचे उपकार आहे की, त्याने आम्हाला आपल्या व आपल्या गुणांचा परिचय देण्याची व्यवस्था केली. त्याने आम्हाला हे दाखविण्याची व्यवस्था केली की, त्याच्याशी आमचा संबंध कसा असावयाचा पाहिजे. त्याने आम्हाला आपले गुण अशासाठी दाखविले आहेत की, त्याप्रमाणे आम्ही त्याच्याशी संबंध जोडावेत. केवळ जिभेने त्याच्या गुणांचे वर्णन करून थांबू नये तर त्या गुणांना धारण करणाऱ्याच्या इच्छेवर स्वत:ला पूर्णपणे सोपवावे.
आता ही गोष्ट विचारणीय आहे की, महान अल्लाह जो खरोखर सर्वसत्ताधिकारी आहे. त्याचाच सर्वसत्ताधिकार का आवश्यक आहे? कोणत्या कारणामुळे ‘सर्वसत्ताधिकार केवळ त्या अद्वितीयालाच शोभा देतो?’
जरा विचार करा. तो मनुष्य जो स्वत: लहानसे जग आहे, जो अगणित पात्रतेचा स्वामी आहे, ज्याने आपल्या सर्व पात्रतांना अद्याप ओळखले नाही, ज्याने सृष्टीची अनेक लपलेली रहस्ये उलगडली आहेत, ज्याने सृष्टीतील अनेक गोष्टींना आपल्या अधीन केले आहे, तो पाण्यात माशापेक्षा अधिक चांगले पोहतो. हवेत उड्डाण करण्यात पक्ष्याना मागे टाकले आहे, चंद्रावर ध्वज गाडले आहे आणि मंगळावरसुद्धा पोहचला आहे; अशा माणसावर कोणाचा हकूम चालावयास पाहिजे? एक सामान्य बुद्धीचा माणूसदेखील सांगेल की, अशा महान मनुष्यावर हुकूम त्याचा चालावयास पाहिजे जो त्याच्यापेक्षा अधिक बुद्धिमान असेल आणि ज्याचे ज्ञान असीम असेल. अशा विवेकी माणसावर हुकूम त्याचा चालावयास पाहिजे जो त्याच्यापेक्षा अधिक विवेक बाळगणारा असेल, ज्याचा विवेक अथांग असेल. तो नि:पक्षपाती असावा. तो एखाद्याची बाजू घेणारा व एखाद्याचा विरोधी नसावा. तो कोणत्याही वंशाचा नसावा की ज्यामुळे वंशवादाची शंका यावी. तो कोणत्याही जमातीचा नसावा की एखाद्याने त्याच्या जमातवादी स्वार्थाला बळी पडावे. तो कोणत्याही वर्गाशी संबंधित नसावा की एखाद्या वर्गवादास बळी पडावा. त्याच्यात कोणाविरुद्ध तिरस्कार व सूडभावना नसावी. त्याचे ज्ञान इतके विस्तृत व सखोल असावे की तो भविष्यातील उद्यालासुद्धा तितकाच जाणणारा असावा जितका तो वर्तमान जाणतो. या गुणांना धारण करणारा सांगा या जगात कोण आहे? एखादा पीरसाहेब? एखादा पंडित? एखादा पोप? एखादा राजा? कुणी मुसोलिनी? कुणी हिटलर? अथवा सामान्यजनातील बहुसंख्य? यांच्यापैकी कोणात हे गुण आढळतात का? या गुणाविना एखाद्याला सर्वसत्ताधिकारी मानून त्याच्या अधीन होणे श्रेष्ठ मानवतेचा अपमान नव्हे काय? पण जाऊ द्या, श्रेष्ठ मानवतेला एखाद्या आंधळ्याच्या हाती देणे म्हणजे आपल्याच पायांनी चालत जाऊन विनाशाच्या खाईत पडणे नव्हे काय? __अशा श्रेष्ठ व उच्च मनुष्यावर तर त्याचा हुकूम चालावयास पाहिजे, जो सर्व प्रकारच्या उणिवांपासून मुक्त असावा. तो “फअआलुल्लिमा युरीद” (अर्थात – जो तो इच्छितो चांगले करतो) असावा. “ला युसअलु अम्मा यफअलु” (अर्थात – प्रश्न केला जात नाही त्याला जो काही तो करतो) असावा. जो शुचिर्भूत व पवित्र असावा. शुचिर्भूतता व पवित्रतेविना सर्वसत्ताधिकाऱ्याचा मुकूट कोणालाही शोभा देत नाही आणि जर त्याला एखाद्याने बळजबरीने उचलून नेले तर तो जगासाठी संकट बनतो.
संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *