Home A इस्लामी व्यवस्था A सद्गुणी सत्ताधारी

सद्गुणी सत्ताधारी

हे लोक दुर्बलांचे, शोषितांचे, वंचितांचे भार उचलतात, पाहुणचार करतात, गरीबांच्या तक्रारींना वाईट मानत नाहीत, जे अपंग आहेत त्यांच्या गरजा भागवतात, अनाथांशी दयेने वागतात. आपत्ती कोसळल्यास संयम ढळू देत नाहीत. वचनपूर्ती करतात. आदरसन्मानाचे रक्षण करतात. ज्ञानी लोकांचा मान राखतात. त्यांना हवी असलेली मदत करतात. ज्या गोष्टींपासून ज्ञानी लोक सत्ताधाऱ्यांना रोखतात त्याचे आचरण करतात. त्यांच्याविषयी चांगले विचार बाळगतात. धार्मिक लोकांवर प्रेम करतात. दुर्बलांशी चांगला व्यवहार करतात. त्यांच्याशी न्याय्य वर्तन करतात. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी पुढे येतात. सत्यासमोर नतमस्तक होतात. लोकांच्या तक्रारींचे निवारण करतात. धार्मिक प्रवृत्तीचे असतात. आराधना-उपासना करतात. म्हणजे त्यांचे एकूण राजकारण याच सद्गुणांवर आणि वैशिष्ट्यांवर आधारित असते. वरील सर्व सद्गुण चांगल्या राजकारण्याचे द्योतक आहेत. ते एखाद्या लहानशा भूभागाचे शासक असतो की एखाद्या अधिराज्याचे अधिपती असोत, हे राजकीय सद्गुण त्यांच्यामध्ये आवश्यक आहेत.

याउलट जेव्हा ईश्वर कुणा सत्ताधारी शासकाकडून त्याचे राज्य हिरावून घेतो तेव्हा तर अशा शासनकर्त्यामध्ये वाईट गुण निर्माण होतात. कारण त्यांच्यामध्ये राजकीय सद्गुण लयाला गेलेले असतात. त्यांच्या हातून त्यांचे राज्य काढून घेऊन ईश्वर दुसऱ्या एखाद्या जनसमूहातील शासकाच्या स्वाधीन करतो, त्यांना अशा शक्तींच्या लोकसमूहांच्या अधीन करतो, ज्यांच्यामध्ये वर उल्लेखित सद्गुण असतात. त्यांच्या कुकृत्यांमुळे त्यांची समृद्धी, त्यांचा मानसन्मान सर्वकाही त्यांना गमवावे लागते. पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की, “जेव्हा आम्ही एखाद्या देशाला, राष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचे ठरवतो तेव्हा त्या राष्ट्रात धनसंपन्न लोकांची संख्या काढतो, मग असे लोक कुकर्म करू लागतात आणि त्यासाठी त्यांच्यावर प्रकोप कोसळवतो. त्यांना नेस्तनाबूद करून टाकतो.” एखाद्या समुदायाची सत्ता काढून टाकण्याचे मोठे संकेत असे की तो समुदाय आपल्या राज्यातील विद्वान, ज्ञानसंपन्न आणि लोकहितासाठी झटणारे, मानवतेच्या कल्याणासाठी वाहून घेतलेल्यांचा मानसन्मान करत नाही. एखाद्या समुदायात अशी वृत्ती दिसायला सुरुवात झाली तर त्या समुदायाचे त्या अनुषंगाने त्या राष्ट्राचे पतन जवळ आहे असे समजावे. ज्या समुदायाचे ईश्वर काही वाईट करण्याचे ठरवतो तेव्हा कोणतीही शक्ती त्या समुदायाला, राष्ट्राला वाचवू शकत नाही. पराभूत राष्ट्र लवकरच नामशेष लोते.

गुलाम राष्ट्र सत्ताधाऱ्यांच्या वर्चस्वाखाली गेले असल्याने त्यांच्या अमलाखाली असते. त्यांच्याच मेहेरबानीने ते जगू लागते. त्यांचे मनोबल खचून जाते. त्यांची संततीदेखील कमकुवत होत जाते. त्यांचा जन्मदरही खाली होत जातो. ते आळशी बनतात. आळशी झाल्याने आणखीनच धीर खचतो. दुसऱ्या राष्ट्राच्या, लोकसमूहाच्या वर्चस्वाखाली जगत असताना त्यांच्या आपसातील वांशिक संबंध ढिले पडत जातात. त्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी होत जाते. अशा लोकांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याच्या भावना दिवसेंदिवस कमी कमी होत जातात. जगण्यात रस नसतो. ते स्वतःचेदेखील रक्षण करू शकत नाहीत. अशा मनोबलाबरोबरच त्यांची शारीरिक शक्तीदेखील कमकुवत होत जाते. कारण सत्ताधारी समूह त्यांच्या गत वैभवाला नष्ट करू पाहात आहे. कोणत्याही आक्रमण करणाऱ्या शक्तीसमोर ते आत्मसमर्पण करत राहतात.

पराभूत राष्ट्र-जनसमुदाय आपल्यावर ताबा मिळविलेल्याच्या आहारी जातात. फक्त शारीरिक गुलामीच नव्हे तर मानसिक गुलामीसुद्धा पत्करतात. त्याचा असा गैरसमज झालेला असतो की ज्यांनी त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे त्यांच्यामध्ये खरेच कमालीचे सामर्थ्य असेल. ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये घर करून बसल्यानंतर तो विजयी राष्ट्राकडे आकर्षित होत जातो. त्याची प्रत्येक कृती आणि उक्ती त्यांना लोभनीय वाटू लागते. त्यांच्यासारखेच जगणे अंगीकारण्याच्या प्रयत्नात असतात. स्वतः आपल्यामध्ये त्याला अवगुण दिसू लागतात आणि स्वतःशीच ते घृणा करू लागतात.

(संदर्भ- इब्ने खल्दून, मुकद्दमा भाग-१)

संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद

संबंधित पोस्ट
September 2023 Safar 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 11
29 12
30 13
31 14
1 15
2 16
3 17
4 18
5 19
6 20
7 21
8 22
9 23
10 24
11 25
12 26
13 27
14 28
15 29
16 Rabi'al Awwal 1
17 2
18 3
19 4
20 5
21 6
22 7
23 8
24 9
25 10
26 11
27 12
28 13
29 14
30 15
1 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *