Home A blog A शेजारधर्म

शेजारधर्म

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी शेजाऱ्यांशी आदर-सन्मानाचा व्यवहार करण्यास सांगितले आहे. शेजाऱ्याला त्रास देणे हा गंभीर गुन्हा असल्याचे म्हटले आहे. एकदा एका अनुयायाने प्रेषितांना विचारले की कोणता गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे? त्यावर प्रेषित म्हणाले की अल्लाहला भागीदार जोडणे आणि आपल्या आपत्यांना ठार करणे, ते तुमच्या सुखसुविधांमध्ये भागीदार होतील या भीतीने. आणि हे की तुम्ही आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करावा. प्रेषित पुढे म्हणाले की कुणी दहा स्त्रियांशी व्यभिचार केला तरी तो एखाद्या शेजाऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करण्यापेक्षा कमीच आहे. तसेच एखाद्याने दहा घरांमध्यो चोरी केली तरी ती शेजाऱ्याच्या घरी चोरी करण्याच्या तुलनेत कमीच समजली जाईल. प्रेषित पुढे म्हणतात की अशी व्यक्ती मुस्लिम होऊच शकत नाही ज्याचा शेजारी त्याच्या अत्याचाराला बळी पडत असेल. जर एखादी स्त्री आपल्या शेजाऱ्यांना त्रास देत असेल आणि त्याचबरोबर ती नमाज अदा करीत असेल आणि रोजे ठेवत असेल तरीदेखील ती स्वर्गात जाऊ शकत नाही. तसेच एखादी महिला नमाज अदा करते, दानधर्म करते, त्याचबरोबर जर ती शेजाऱ्यांशी सदवर्तन करत असेल तर ती स्वर्गात जाईल. प्रेषितांनी घोषणा केली की आपल्या घराच्या अवतीभवती ४० घरे शेजारी समजले जावेत. एकदा मुस्लिमांच्या माता ह. आयेशा यांनी प्रेषितांना विचारले की माझे दोन शेजारी आहेत. मी कुणाला भेटवस्तू देऊ? प्रेषित म्हणाले, ज्याचे दार तुमच्या दाराजवळ असेल. शेजाऱ्यांचे हक्काधिकार विशद करताना प्रेषित म्हणतात, त्याने तुमची मद मागितली तर त्याला मदत करा. त्याला कर्ज लवे असेल तर कर्ज द्या. तेवढ्यावर भागले नसेल तर पुन्हा द्या. आजारी पडल्यास त्याची विचारपुस करा. त्याला कोणते यश लाभले असेल तर शुभेच्छा द्या. अडचणीत सावडल्यास त्याच्या मदतीला धावून जा. त्याच्या घरात हवा जात नसेल तर आपल्या घराच्या भिंतीची उंची कमी करा. एखादे पक्वान्न केल्यास ते पदार्थ त्याच्या घरी पाठवा. जर फळे आणली असतील तर शेजाऱ्यालाही द्या. देऊ शकत नसाल तर तुमच्या मुलांना फळ घेऊन घराबाहेर पाठवू नका जेणेकरून शेजाऱ्यांच्या मुलांना दुःख होणार नाही.

पुरुष आणि स्त्री

पुरुष आणि स्त्री एकमेकांची वस्त्रे आहेत. (पवित्र कुरआन) वत्र् जसे माणसाचे थंडी, उष्णता आणि इतर त्रासांपासून रक्षण करते त्याचप्रमाणे पुरुष आणि महिलेचेही आहे. दोघे एकमेकांच्या सुरक्षेचीी काळजी घेतात. वस्त्र परिधान केल्याने जसे माणसाला सौंदर्य प्राप्त होते, तसेच सौंदर्य स्त्री-पुरुष यांच्या संबंधामुळे दोघांना प्राप्त होते. वस्त्र धारण करण्याने जसे शरीरावरील अवगुण झाकले जातात त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकतात. स्त्री आणि पुरुष या दोघांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. जे जे अधिकार स्त्रीला प्राप्त आहेत तेच अधिकार पुरुषालाही प्राप्त आहेत. पवित्र कुरआनने आई-वडील आणि इतर नातलगांमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांना वाटा दिलेला आहे. स्त्री स्वत:चा व्यापार किंवा कोणताही दुसरा व्यवसाय करू शकते. या व्यवसायातल्या कमाईवर स्त्रीचा पूर्ण अधिकार असेल. जर तिच्याकडे मालमत्ता, शेत-जमीन, घरदार असेल तर कुणालाही न विचारता, कुणाचीही संमती न घेता ती विकू शकते. स्त्रीच्या चालचरित्रावर आरोप लावल्यास भयंकर पाप म्हटले गेले आहे. पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की, “जे लोक पावित्र्यसंपन्न महिलेवर आरोप लावतात आणि त्यासाठी ४ लोकांची साक्ष आणू शकत नाहीत अशा लोकांना ८० फटके मारून शिक्षा द्या आणि पुढे कोणत्याही प्रकरणात त्यांची साक्ष कबूल करू नका. (कुरआन, सूरह नूर-५)” आपल्या शेवटच्या हजप्रसंगी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जे प्रवचन दिले होते त्यामध्ये असे म्हटले आहे की, “लोकहो, तुमच्यावर तुमच्या पत्नीचे हक्काधिकार आहेत, तसेच त्यांच्यावर तुमचे अधिकार आहेत. तुमच्या पत्नींनी इतर पुरुषांना तुमच्या बिछान्यावर बसू देता कामा नये. ज्यांना तुम्ही पसंत करीत नाही त्यांनी तुमच्या घरी विना परवानगी येऊ नये. आपल्या पत्नीशी सौहार्दाने वागा, अल्लाहचे नाव घेऊन तुम्ही तिचा स्वीकार केला आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करा, कैद्यांप्रमाणे घरी बंदिस्त करून ठेवू नका. पत्नीसंबंधी कुरआनात म्हटले आहे की त्या सदाचारी आहेत अल्लाहच्या आज्ञा पाळतात. पतीच्या गैरहजेरीत त्याच्या हक्काधिकारांचे संरक्षण करतात.”

– सय्यद इफ्तिखार अहमद

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *