स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी निर्भत्सना केली आहे ते पाप किती मोठे असेल हे आपल्या लक्षात येते. इतकेच नव्हे तर निसाई हदीसकथनानुसार जाणूनबुजून व्याज घेणे, देणे, साक्ष देणे आणि लिहून ठेवणाऱ्यांची अंतिम निवाड्याच्या दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) निर्भत्र्सना करतील. अर्थात अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा लोकांसाठी (जर पश्चात्ताप न करता मरण पावले) पापमुक्ती नव्हे तर निर्भत्सना करतील.
लाच
माननीय अब्दुल्लाह बिन अमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लाच देणाऱ्यांचा आणि लाच घेणाऱ्यांचा धिक्कार असो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लाच देणाऱ्यावर आणि ती घेणाऱ्यावरदेखील अल्लाहचा धिक्कार असो. (हदीस : मुन्तका)
स्पष्टीकरण
लाच दुसऱ्यांच्या हक्काधिकारांचे हनन करून स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी शासनाच्या लिपिकांना आणि अधिकाऱ्यांना दिली जाणाऱ्या वस्तू किंवा रकमेस ‘लाच’ म्हणतात. आपला वैध हक्क प्राप्त करण्यासाठी खोटारड्या राज्य प्रशासनाच्या धोकेबाज कमचाऱ्यांना, मनाच्या पूर्ण द्वेषासह आपल्या खिशातून ठराविक रक्कम काढून देणे भाग पडते, त्याशिवाय आपला हक्क प्राप्त होत नाही. या कारणास्तव हा आज्ञाधारक (मोमिन) अल्लाहने इच्छिले तर त्याच्याकडून धिक्कारला जाणार नाही. अशा स्थितीत आणखीन अधिक मागणी करतात की अल्लाहच्या ‘दीन’ला वर्चस्व व प्रभुत्व प्राप्त होवो.
संदिग्धतेपासून दूर राहणे
माननीय नुअमान बिन बशीर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘वैधही स्पष्ट आहे आणि निषिद्धही, परंतु या दोन्हींदरम्यान काही गोष्टी अशा आहेत ज्या संदिग्ध (संशयास्पद) आहेत. जो मनुष्य संदिग्ध गोष्टांपासून स्वत:चा बचाव करील तो त्यापेक्षा अधिक उघड पापांपासून वाचेल. तसेच जो मनुष्य संदिग्ध पापकृत्ये करण्यात बहादुरी दाखवील तर उघड पापकृत्यांमध्ये तो मागे पडण्याची शक्यता आहे आणि पापकृत्ये करण्यापासून अल्लाहने त्याला रोखले आहे. (ज्यात कोणाला जाण्याची परवानगी नाही आणि त्यात परवानगीशिवाय घुसणे अपराध आहे.) जे जनावर मनाई करण्यात आलेल्या विभागाभोवती चरते, त्याचे मनाई करण्यात आलेल्या विभागात जाऊन पडण्याची शक्यता खूपच अधिक आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की जी वस्तू निषिद्ध असल्याचे अजिबात माहीत होत नाही आणि वैध असल्याचे स्पष्टपणे कळत नाही, अशा वस्तूचे काही पैलू वैध वाटत असतील आणि काही निषिद्ध दिसत असतील तर त्याच्याजवळ न फिरकणे हेच मोमिनचे (अल्लाहच्या आज्ञाधारकाचे) काम आहे. जो संदिग्ध वस्तूंपासून दूर जातो, तो उघड निषिद्ध कर्म कसे करू शकतो? जर एखादा मनुष्य संदिग्ध वस्तूंना निषिद्ध समजूनदेखील त्या घेत असेल तर त्याचा परिणाम असा होईल की मन उघड निषिद्ध वस्तू घेण्यात बहादूर व धाडसी बनेल आणि ही मनाची अतिशय भयानक स्थिती आहे, हे उघड आहे. माननीय अतिय्या सअदी (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखादा मनुष्य अल्लाहच्या सदाचारी दासांच्या यादीत येऊ शकत नाही जोपर्यंत पापकृत्य घडण्याच्या भीतीने ती गोष्ट सोडत नाही ज्यात कसलेही पाप नाही.’’ (हदीस : तिर्मिजी)
0 Comments