Home A blog A व्याज व त्याचे दुष्परिणाम

व्याज व त्याचे दुष्परिणाम

प्रत्येक वेळेस, पावला- पावलावर आर्थिकरित्या कमकुवत लोकांना पैशाची आवश्यकता असते. जे जेव्हा कुणाला पैशाची मागणी करतात, तेव्हा एक दोघांचा अपवाद सोडल्यास इतर त्याला सावकाराकडे जाण्याचा सल्ला देतात. याच व्याजाच्या चक्रात फसून तो आपल्या गरजा पूर्ण करतो. याप्रकारे सावकारी पद्धत सभ्य समाजात रुढ झालेली आहे. खरे पाहता सभ्य समाज आणि व्याजाची व्यवस्था एकमेकांच्या विरोधी आहे. एकाचे प्रभुत्व दुसर्‍यासाठी मृत्युचा संदेश आहे. या दोन परस्परविरोधी बाबींमध्ये कधीच सामंजस्य असू शकत नाही. जे व्यक्ती आणि समाजावर व्याज प्रणालीचे प्रभुत्व असते ते नेहमीच वास्तविक सुख आणि समृद्धीपासून वंचित असतात. त्यांच्यावर ईश्‍वर आपली कृपादृष्टी ठेवत नाही. असा समाज तक्रारीच्या आगीत जळत असतो. अशा ठिकाणी माणसं माणसाविषयी सहानुभूती ठेवण्याऐवजी एकमेकांचे रक्त शोषण्यात व्यस्त असतात. यालाच ते आर्थिक सफलता समजतात. लोकांचा असा विश्‍वास आहे की, जर ही व्यवस्था बंद केली तर जगाचे आर्थिक चक्र थांबून जाईल.  

आश्‍चर्यांची बाब ही की, 1 जुलै 1944 ते 22 जुलै 1944 पर्यंत अमेरिकेच्या बर्टन वूड शहरातील माऊंट वॉशिंगटनमध्ये बँकींग व्यवस्थेवर कॉन्फ्रन्स घेण्यात आली. यामध्ये 44 देशांच्या 730 प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता. त्यांचा उद्देश जगात वैश्‍विक वित्तीय व्यवस्था कशी लागू करावी यावर विचार करणे हा होता. त्यावेळेव व्याजाधारित आर्थिक व्यवस्थेस मान्यता देण्यात आली. तेव्हापासून ती जगात लागू करण्यात आली. या वैश्‍विक कराराअंतर्गत एक बँक सुरू करण्यात आली, तिचे नाव ’इंटरनॅशनल बँक ऑफ सेलटमेन्ट’ ठेवण्यात आले. प्रत्येक देशासाठी कागदाचे एक चलन अनिवार्य करण्यात आले. कागदावर सुंदर चित्र छापून त्या चलनाचे मुल्य निर्धारित करणे याचा मुख्य उद्देश होता. कागदाचे मुल्य एक रुपयापासून तर पाच हजार रुपयांपर्यंतच्या वास्तविक स्विकार्हता होऊन जाते.

व्याजाच्या वापराने आपल्या शरीरावर प्रतिकुल परिणाम होतो. सावकारांच्या उन्मुलनाला सोप्या पद्धतीने समजने फार कठीन आहे. मनुष्याचे अस्तित्व फक्त भौतिक नसून नैतिक सुद्धा आहे. व्याज मनुष्याला स्वार्थी, कठोर हृदयी आणि निर्दयी बनवितो. त्याला पैसे आणि संसारिक लोभी बनवितो. व्याज मनुष्याला समाजातील पिडित व्यक्तींप्रति नैतिक जबाबदारीतून मुक्त करतो. आपल्या परिघात तो गतीहीन जीवन जगण्यास बाध्य करतो. यामुळे सेवा, सहकार्य, आपलेपणाचा स्वभाव नष्ट होत आहे़  आज या भौतिकता आणि पुंजीवादामुळे अतिथी सत्कारातही चहाचा कप सुद्धा व्याजाच्या दुष्प्रभावामुळे मागे ओढला जात आहे. कुणालाही जराशी सवड किंवा वेळ नाही की, आसपासच्या वातावरणाची समीक्षा करावी. आपला गरीब शेजारी, असहाय्य लोक किती समस्यांचा सामना करीत आहे हे बघायलाही वेळ नाही, ह्या सर्व जणू जुन्या गोष्टी झाल्या आहेत.

त्याच्यावर मायेची चादर टाकणारा कुणी नाही. त्यामुळेच आज गल्लोगल्ली सावकारांचे जाळे पसरले आहे, जे एखाद्या जळू प्रमाणे छोट्या राशीच्या मोबदल्यात व्याजावर व्याज चढवून अवैध वसूली करीत आहेत. हे सर्व होत असतांना समाज मात्र तंद्रीत गेल्याप्रमाणे वागतांना दिसतो, 

कर्जदारांमध्ये असेही लोक असतात जे हातावर आणून पानावर खाणारे आहेत. आपल्या परिवाराचे कसेबसे पालन पोषण करणार्‍या या लोकांवर कर्जाची परतफेड करण्याची मोठी जबाबदारी सुद्धा असते. मात्र यांना या संकटातून मार्ग दाखविणारा व यातून बाहेर काढणारा कुणीच नसतो. चांगल्या लोकांचे उदाहरण तसेच आहे ज्यात स्वयं दु:खात असतांना दुसर्‍याची मदत केली जाते. इतकेच नाही तर मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय, मोठे व्यापारी, उद्योगपती आणि उद्योग यांचाही कर्जाशी जवळचा संबंध असतो. विविध उद्योग आवश्यकतेच्या नावावर कर्जाचे आदान प्रदान हा कर्करोगाप्रमाणे असाध्य रोगाचे रूप धारण करीत आहे. व्याजावर आधारित कर्ज प्राप्तीसाठी संगठित व सशक्तपणा बघायला मिळतो. व्याजासाठी नवनव्या आकर्षक योजना बघायला मिळतात. बोटांवर मोजता येणारे पुंजीपती या कर्ज व व्याजाच्या योजनांवर नियंत्रण ठेऊन आहेत. जेव्हा की हेच मोठे लोक कर्ज किंवा व्याज न देता अत्यंत सहजपणे ‘पळ’काढतात. त्यांना न्यायाच्या कठड्यात उभे करणे कठीन होऊन जाते. जेव्हा की अशाच वेळी गरीबांची बेआब्रु केली जाते.

देशात कर्जदरांना जीवंत राहणे कठीन झाले आहे व या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. देशात अनेक क्षेत्र असे आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होतात. कर्जावरील व्याज आणि मुद्दल रक्कम परत न करण्याच्या परिस्थितीने पिडित व निराश व्यक्ती आत्महत्येचा पर्याय निवडतो आहे आणि आपल्या कुटुंबाला समस्येच्या मार्गावर नेऊन सोडतात. अशी स्थिती सामान्य नागरिक, शासनकर्ते, राजकीय व्यक्ती, व्यापारी, शिक्षित आणि बुद्धिजीवी यांच्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारी आहे. अशातही सरकार आणि राजकारणातील जादूगर सहानुभूती आणि मानवतेचे ढोंग करण्यात मागे राहत नाही.

धर्मग्रंथानुसार आपल्याला शक्यतोवर कर्जापासून स्वत:ला वाचवायला हवे, मात्र आजच्या भौतीकतावादी युगात जीवनातील गरजांची पूर्तता करण्यासाठी लोकांना अनेकदा कर्ज घ्यावे लागते. यात बँकेकडून घेण्यात येणार्‍या आणि इतर माध्यमातून घेण्यात येणार्‍या कर्जाचा समावेश आहे. ‘लोन’ किंवा कर्ज घेण्यात काहीच वाईट नाही, मात्र जर कर्ज घेणार्‍याकडून कर्जाचे हप्ते फेडण्यात उशीर होत असेल, किंवा त्याला कर्जाचा परतावा करण्यात अडचण येत असेल, अशा परिस्थितीत कर्ज घेणार्‍याकडून व्याजाच्या रकमेची मागणी करणे हे माणवतेला कलंकित करणारे आहे.

वैदिक काळ प्राचिन भारतीय संस्कृतीचा एक कालखंड आहे. याच काळात वेदांची रचना करण्यात आली. हडप्पा संस्कृतीच्या पतनानंतर भारतात अनेक नवीन संस्कृतींचा जन्म झाला. वेदातही कर्जावर व्याज घेणार्‍यांचा उल्लेख ‘व्याजखाणारा’ असा करण्यात आला आहे. वेदातही व्याजाला वर्जीत ठरविण्यात आले. ‘जास्त धन प्राप्तीच्या लोभात, पैसे उधार देणार्‍याकडून संंबधित धन ईश्‍वरही हिसकावून घेतो’ (ऋग्वेद – 3:53:14).

बायबलच्या नियमांच्या आधारावर ख्रिस्ती धर्मातही व्याज घेण्याची निंदा करण्यात आली आहे. 1179 पासून व्याज घेणार्‍याला बहिष्कृत करण्यास सांगण्यात आले होते. कॅथलिक चर्च नुसार व्याज खाने निषिद्ध समजण्यात आले आहे. बायबल मध्ये व्याजाचा विरोध पुढील प्रमाणे केला आहे़ ‘तू आपल्या भावांना व्याजावर कर्ज देऊ नको, ते भोजन असो, पैसा असो किंवा इतर वस्तू असो.’ (बायबल अनुवाद व्यवस्था विवरण 23:19).

कुरआनमध्ये व्याजाला वर्जित ठरविण्यात आले आहे. ‘आणि जे लोक व्याज खातात, ते त्याच प्रकारे उठतात जसे तो व्यक्ती उठतो ज्याला सैतानाने हात लावून बावळट केले आहे, आणि ते म्हणतात व्यापार हा व्याजाप्रमाणेच आहे.’ जेव्हा की अल्लाहने व्यापाराला वैध आणि व्याजाला अवैध ठरविले आहे. अंतत: ज्याला त्याच्या ईश्‍वराकडून चांगला मार्ग मिळाला आणि तो सुधरला, तर जे काही त्याने आधी घेतले होते ते त्याच्याजवळ राहिले आणि नंतर निर्णय अल्लाह करणार. मात्र जो सुधरला नाही आणि पुन्हा तेच व्याज घेण्याचे कार्य केले तर त्याला नरकातील आग मिळेल, व ते नेहमी त्या आगीत राहतील. (कुरआन 2:275).

इस्लामच्या दृष्टीने व्याजाच्या निंदेसंदर्भात प्रेषित हजरत मुहम्मद (सल्लल्लाहु अलैही वसल्लम) यांचा राग बघितल्यानंतर, इस्लामला मानणार्‍या कुणालाही ही परवानगी नाही की तो एका क्षणासाठीही प्रामाणिकपणा, अंतरात्माची हत्या करणार्‍या आणि बंधुभावाचा वैरी असणाजया व्याजाला सहन करेल.

– डॉ. एम.ए. रशीद 

(नागपूर) 

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *