Home A hadees A लोकांना माफ करा. नेकी आणि परोपकाराचा संदेश द्या

लोकांना माफ करा. नेकी आणि परोपकाराचा संदेश द्या

हजरत जाबिर (र.) म्हणतात, एक दिवस प्रेषित मुहम्मद (स.) बनी अमरो बिन औफ यांच्या मोहल्ल्यात गेले.

प्रेषित म्हणाले, ‘‘हे अनसारचे लोक.’’

तेव्हा त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्ही हजर आहोत. हे अल्लाहचे प्रेषित.’

प्रेषित त्यांना उद्देशून सांगू लागले, ‘‘इस्लामपूर्वीच्या काळात तुम्ही अल्लाहची उपासना करत नसत, दुर्बल आणि निराधार लोकांचा बोजा उचलत असत, आपल्या मिळकतीतून गरीबांना देत होता, प्रवाशी लोकांना मदत करीत, पण जेव्हा अल्लाहनं तुम्हाला आणि प्रेषितावर श्रद्धा ठेवण्याचे उपकार तुमच्यावर केले तेव्हा तुम्ही आपल्या बागांच्या भोवती भिंती उभ्या करता. माणसांनी जर तुमच्या बागेतले फळ खाल्ले असेल तर अल्लाह तुम्हास त्याचा मोबदला देईल. तसेच पशुपक्ष्यांनी फळं खाल्ली तर त्याचादेखील मोबदला दिला जाईल.’’

हजरत जाबिर (र.) म्हणतात की लोकांनी प्रेषितांचे म्हणणे ऐकून आपल्या बागांभोवतीच्या भिंती काढून टाकल्या. (तरगीब, तरतीब, )

हजरत अब्दुल्लाह बिन उमर म्हणतात की जेव्हा कधी प्रेषित मुहम्मद (स.) मला काही माल देत असत मी त्यांना म्हणत होतो, ‘जे लोक माझ्यापेक्षा अधिक वंचित असतील अशा लोकांना द्या.’

प्रेषित त्यांना उत्तर देत की ‘‘हा माल घेऊन टाका. जेव्हा कधी तुम्ही कुणाशी काही न मागता माल दिला गेला आणि तुम्ही त्याची अपेक्षाही केली नव्हती, तर असे देणे घेत जा. ते साठवून ठेवा. आवश्यकता असल्यास त्याचा उपयोग करा आणि वाटल्यास ते दान करा. जे तुम्हाला मिळाले नसेल त्याची लालसा करू नका.’’

हजरत अब्दुल्लाह बिन उमरचे पुत्र म्हणतात की म्हणूनच माझे पिता कधी कुणाकडे काही मागत नसत. आणि जर कुणाला न मागताच कुणी काही दिले असेल तर ते नाकारत नव्हते. (बुखारी, मुस्लिम)

ऐनिया इब्ने हसन एकदा आपले चुलते हुर बिन कैस यांच्याकडे गेले, हुर बिन कैस हे खलीफा ह. उमर (र.) यांच्या फार जवळचे होते.

ऐनिया आपल्या चुलत्यास म्हणाले की ‘तुम्हाला ह. उमर (र.) यांची जवळीक लाभली आहे. मला त्यांना भेटायचे आहे. त्यासाठी परवानगी मिळवून द्या.’

ह. उमर (र.) यांनी ऐनिया यांना भेटण्यास परवानगी दिली. ऐनिया ह. उमर (र.) यांच्याशी बोलताना म्हणाले की, ‘तुम्ही आम्हाला काही जास्त माल देत नाही की आमच्या बाबतीत न्याय्य वागणूक सुद्धा देत नाही.’

ह. उमर (र.) यांना याचा फार राग आला. ऐनिया यांना शिक्षा देण्याचा विचार करू लागले.

तेवढ्यात हुर बिन कैस यांनी ह. उमर (र.) यांना पवित्र कुरआनची एक आयत ऐकवली, त्याचा अनुवाद असा,

‘‘लोकांना माफ करा. नेकी आणि परोपकाराचा संदेश द्या आणि अडाणी लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करा.’’ (कुरआन, ८:१९९)

‘हे महाशय अशिक्षित आहेत, त्यांची चूक माफ करा.’ हे ऐकून ह. उमर (र.) यांचा राग संपला आणि ऐनिया यांना क्षमा करून टाकले. (बुखारी, इब्ने अब्बास)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *