Home A राजकीय तत्वप्रणाली A राजकीय अपराधापासून बचावाचा इस्लामी उपाय

राजकीय अपराधापासून बचावाचा इस्लामी उपाय

cuffs
शासन, सत्ता आणि अधिकार हाती आले की राजकारण्यांना अपराध आणि गुन्हेगारीचे रान मोकळे झाले समजा. कारण त्यांच्या हाती सत्ता असते. शिवाय त्यांच्यापैकी बरेचजण गुन्हेगार आणि गुन्हेगारी जगताशी संबंधित असतात. त्याचप्रमाणे शिक्षण नसताना आणि कोणतीही योग्यता व पात्रता नसताना भविष्य बनविण्याचा सर्वांत सोपा आणि सरळ उपाय म्हणजे राजकारणच. गुंडगिरी, दादागिरी करणारे, समाजासाठी उपद्रवी ठरलेले आणि जनतेचे आर्थिक, मानसिक आणि लैंगिक शोषण केलेले लोक, त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात शिक्षण नसल्याने काहीही करता येत नसलेले लोकच राज्याची खुर्ची बळकावलेले असल्याचे सध्या पाहायला मिळते. चौथी-पाचवी पास-नापास असलेले लोक थेट मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री होत असल्याचा किळसवाणा इतिहासही या गोष्टीची साक्ष देतो. यामुळे याचे दुष्परिणाम संपूर्ण मानवजातीलाच भोगावे लागत आहेत.
मात्र इस्लामची अशी शिकवण आहे की अपात्र आणि दुराचारींना मुळीच शासकीय हुद्दा देता कामा नये.
प्रेषित मुहम्मद(स.) यांना एकदा विचारण्यात आले की, ‘‘हे जग कधी नष्ट होईल?‘‘
यावर प्रेषित मुहम्मद(स.) यांनी अत्यंत गंभीरपणे उत्तर दिले की, ‘‘जेव्हा अनामत नष्ट करण्यात येईल तेव्हा जग नष्ट होण्याची वाट पाहा.‘‘
लोकांनी विचारले की, ‘‘अनामत नष्ट होणे म्हणजे काय?‘‘
‘‘जेव्हा देशाचे शासन नालायक आणि अपात्र लोकांच्या हाती येईल, तेव्हा जग नष्ट होण्याची वाट पाहा!‘‘ प्रेषित मुहम्मद(स.) उत्तरले.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह – बुखारी)
या प्रेषितवचनांवरून हे लक्षात येते की हे केवळ जग नष्ट होण्याचे संकेत अर्थात महाप्रलयाचे भयानक चित्र आहे. अर्थातच जेव्हा एखाद्या अपात्र आणि नालायक व्यक्तीच्या हाती अधिकार अगर शासनव्यवस्था येते, तेव्हा ती व्यक्ती जनतेला सळो की पळो करून सोडते. सर्वत्र अंधेर नगरी आणि चौपट राजा याचे प्रत्यक्ष चित्र डोळ्यांना पाहण्याचे दुर्दैव ओढावते. जनता इतकी वैतागून जाते की, या लाजिरवाण्या जगण्यापेक्षा मेलेले बरे, असे वाटू लागते. म्हणूनच जनतेचे सर्वप्रथम कर्तव्य हेच आहे की, निवडणुकांच्या वेळी राजकारण्यांच्या गुंडगिरीला न घाबरता आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता विवेकबुद्धीचा वापर करूनच मतदान करावे.
चारित्र्यवान संघटित समाजाची आवश्यकता
समाज सुसंघटित नसला आणि त्यातून नीतिमत्ता आणि चारित्र्यशीलता संपली की, गुन्हेगारी बोकाळत असते. एक काळ असा होता की, माणूस आपले चारित्र्य जपत होता, त्याच्यावर समाजाचा वचक होता. गुन्हेगारी करण्याचा विचारसुद्धा कोणाच्या ध्यानीमनी येत नसे. मात्र आज समाज हा विखुरलेला, आपली वचक आणि धाक हरवून बसलेला आहे. प्रत्येकजण स्वातंत्र्याच्या झिंगेत सर्व काही करायला मोकळा झाला आहे. त्याला समाजाला जाब देण्याची जाणीव तर संपलीच शिवाय सामाजिक बांधिलकीसुद्धा नष्ट पावली आहे. सामाजिक आणि नैतिक मूल्यांची ऐशी-तैशी झाली आहे. यामुळे समाजविघातक प्रवृत्तींना बळ मिळत आहे. अशा या बिकट आणि संकटमय परिस्थितीत मात्र समाजबांधणीचे आणि सकारात्मक व नैतिक मूल्ये जोपासण्यासाठीचे कार्य करणे गरजेचे झाले आहे. यासाठीच प्रेषित मुहम्मद(स.) यांनी वारंवार ताकीद केली आहे की सामूहिकता हा मानवतेचा प्राण आहे. सामाजिकतेपासून विभक्त होता कामा नये. जो माणूस स्वतःला समाजापासून विभक्त करतो, त्याचा नाश उपस्थित आहे. प्रेषितांनी हेच तत्त्व या शब्दांत स्पष्ट केले आहे,
‘‘सैतान हा मानवांसाठी लांडगा आहे.(अर्थात शत्रु आहे) लांडगा हा कळपातून एकाकी पडलेल्या शेळीचा फडशा पाडतो, त्याचप्रमाणे समाजविभक्त माणसाची स्थिती असते. म्हणून तुम्ही आपसात गटबाजी करू नका, जमात अगर समाज आणि मस्जिद ह्या तुमच्या संघटिततेसाठी अत्यावश्यक बाबी आहेत.‘‘ (संदर्भ : प्रेषितवचन संग्रह – मुस्नदे अहमद)
इस्लामी विचारवंतांनी म्हटले आहे की, ‘‘समाजातील उपद्रवी घटक नष्ट करायचे असतील आणि गुन्हेगारीचे निर्मूलन करायचे असेल तर चारित्र्यवान सुसंघटित समाज असल्याशिवाय हे शक्य नाही.”(संदर्भ : प्रस्तावना, इब्ने अब्दुल बर, २१/२७५)
इस्लामचे थोर विचारवंत ‘इब्ने तैमिया‘ यांनी म्हटले आहे की,
‘‘सामाजिकता आणि सहकाराशिवाय मानवी गरजांपूर्ण होऊ शकत नाहीत. मानवी गरजांची पूर्तता दोन गोष्टींवर अवलंबून आहे, प्रथम हितांची जोपासना आणि उपद्रवांचा खातमा. त्याचप्रमाणे यासाठी या गोष्टीची आवश्यकता आहे की, लोकांनी समाजाच्या नैतिक बंधनात राहावे, सुसंगठित राहावे. मात्र याबरोबरच समाज चालविण्यासाठी एका सुनियोजित व्यवस्थेची नितांत गरज असते आणि ही समाजव्यवस्था अगदी स्पष्ट नियम व तत्त्वावरच शक्य असते. या ठिकाणी हे मात्र विसरता कामा नये की, हे स्पष्ट नियम केवळ इस्लामनेच प्रदान केले आहेत. म्हणून गुन्हेगारीचे समूळ निर्मूलन हे इस्लामी समाजव्यवस्थेतच शक्य आहे. ईश्वराने म्हटले आहे की, ‘‘आम्ही(ईश्वराने) प्रेषितांना स्पष्ट संकेत आणि मार्गदर्शनासह पाठविले आहे आणि त्यांच्यासोबत ग्रंथ आणि प्रमाण पाठविले, जेणेकरून लोक न्यायावर कायम राहावेत.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हदीद – २५)
सुसंघटित आणि सदाचारी समाज उभा करण्यासाठी केवळ लोकांचा बाजार गोळा करून चालत नाही, अथवा एखाद्या क्षणिक गरजेपुरते, केवळ ऐहिक आणि भौतिक गरजेपोटी समाजास संघटित करून चालणार नाही. तर यासाठी मजबूत नैतिक आधार आणि मूल्यांची गरज आहे. इस्लामी सामुदायिकतेचा आधारसुद्धा तोच आहे, जो प्रेषितत्त्वाचा उद्देश आहे. अर्थातच मानवजातीसाठी सौभाग्यप्राप्ती आणि हितांची जोपासना करणे होय. कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे प्रेषिता! आम्ही(स्वयं ईश्वराने) तुम्हाला समस्त जगवासीयांसाठी दया आणि कृपा बनवून पाठविले आहे.‘‘ (संदर्भ : सूरह-ए-अंबिया – १०७)
सारांश
उपरोक्त स्पष्टीकरणावरून हे लक्षात येते की इस्लामने गुन्हेगारी निर्मूलनाचे जे उपाय योजिले आहेत, ते क्षणिक आणि अस्थायी स्वरुपाचे नसून अर्थपूर्ण आणि स्थायी आहेत. एवढेच नव्हे तर गुन्हेगारी निर्मूलनासाठी इस्लामशिवाय पर्यायच नाही. शिवाय इस्लाममुळे केवळ गुन्हेगारीचे निर्मूलनच होत नाही, तर माणसाच्या ऐहिक आणि पारलौकिक जीवनाचे सार्थक होऊन दोन्ही लोकी सुख, समाधान, शांती आणि वास्तविक यश प्राप्त होते आणि हेच इस्लामचे प्रमुख उद्दिष्ट होय. कारण माणूस जोपर्यंत गुन्हेगारीपासून स्वतःला दूर ठेवीत नाही, अन्याय व अत्याचार आणि दुष्कर्म सोडून सत्य, न्याय आणि सदाचाराचा मार्ग अवलंबत नाही, अर्थात इस्लामी मार्गावर आपले जीवन व्यतीत करीत नाही, तोपर्यंत ईश्वर प्रसन्न होत नाही आणि जर ईशप्रसन्नतेची आसच नसेल, तर तो कोणत्या अर्थाने मुस्लिम होऊ शकेल? हीच बाब कुरआनात अशा शब्दांत व्यक्त करण्यात आली आहे,
‘‘बरे हे कसे शक्य आहे की, जो मनुष्य नेहमी अल्लाहच्या मर्जीप्रमाणे वागणारा आहे, तो त्या माणसाप्रमाणे कृत्ये करील, जो अल्लाहच्या कोपाने वेढला गेला आहे, आणि ज्याचे अंतिम ठिकाण नरक आहे, जे अत्यंत वाईट स्थान आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-आलि इम्रान – १६२)
म्हणजेच ईश्वराची प्रसन्नता प्राप्त करण्याची तीप आस आणि कामना ही सर्वच गुन्हेगारी निर्मूलनाचे आणि सदाचारी, सुख-समाधानी तसेच यशस्वी जीवनाचे मूळ आहे.
दुसरी लक्षणीय गोष्ट अशी की, इस्लामी शिकवणीचा लाभ हा त्यावर आचरण केल्याशिवाय प्राप्त होणार नाही. केवळ इस्लामी नियम अगर विधानाचे प्रगल्भ ज्ञान आत्मसात केले आणि कृतीच मात्र केली नाही, तर काहीच उपयोग होणार नाही. डॉक्टरने कितीही प्रभावी औषध दिले आणि त्या औषधांची व उपचारपद्धतींची केवळ माहितीच ठेवली आणि त्याच्या उपचारपद्धतीनुसार औषध घेतलेच नाही तर आजार बरा होण्याची आशा बाळगणे हे मूर्खपणाचे लक्षण ठरेल. असेच हे देखील आहे. गुन्हेगारी निर्मूलनाचे इस्लामी उपाय अमलात आणल्याशिवाय काहीही शक्य नाही.
संबंधित पोस्ट
September 2024 Safar 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
26 21
27 22
28 23
29 24
30 25
31 26
1 27
2 28
3 29
4 Rabi'al Awwal 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *