Home A blog A ‘रमजान’ मुबारक

‘रमजान’ मुबारक

रमजान पर्वाच्या सर्व देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा…! रमजान तो पवित्र महिना आहे ज्यात पवित्र कुरआनचे अवतरण झाले आहे. हे मार्गदर्शन आहे समस्त मानवजातीसाठी आणि  कसोटी आहे सत्य आणि असत्यातील. कुरआन मानवनिर्मित नाही. प्रेषित मुहम्मद (स.) हे कुरआनचे लेखक नाहीत. कुरआन साक्षात ईशवाणी आहे. कुरआनचा मध्यवर्ती विषय मनुष्य  आहे. कुरआनची भूमिका व त्याचे मार्गदर्शन समस्त मानवजातीसाठी आहे. रमजान या महिन्याला दोन महत्त्वाच्या कारणांमुळे पावित्र्य प्राप्त आहे. एक म्हणजे रोजा आणि दुसरे  म्हणजे पवित्र कुरआनचे अवतरण. हाच तो महिना आहे ज्यात सृष्टीनिर्मात्या अल्लाहने कुरआनद्वारा मानवतेसाठी परिपूर्ण आणि शोशत असे मार्गदर्शन उपलब्ध करून संपूर्ण  मानवतेवर कृपा केली. म्हणूनच जगभरातील श्रद्धावंत या महिन्यात रोजा ठेवतात. रोजाविषयी पवित्र कुरआनमध्ये स्पष्ट उल्लेख आला आहे. की, ’’हे श्रद्धावंतांनो! तुमच्यावर रमजान  महिन्याचे रोजे (उपवास) अनिवार्य केले आहेत, जसे पूर्वीच्या लोकांवर केले गेले होते. अपेक्षा आहे की तुम्ही ईशपरायणता धारण कराल.’’
या आयातीवरून स्पष्ट होते की रोजा हे काही कर्मकांड नाही की रुढी-परंपरा नाही. तर रोजा एका महान उद्देशप्राप्तीसाठी आहे. माणसाला माणुसपण देण्याचे, त्याला चारित्र्यवान  बनविण्याचे तसेच त्याचा व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे महान कार्य रोजा दरवर्षी करतो. नीतीमत्ता ही आपल्या देशाची निकड बनली आहे. एक भयानक पोकळी मानवाच्या जीवनात  निर्माण झाली आहे. हा रोजा या पोकळीला भरून काढण्याचे सामर्थ्य राखून आहे. पवित्र कुरआनचे अवतरण समस्त मानवांसाठी आहे. स्त्री असो की पुरुष, कोणा विशिष्ट  लोकसमुदायासाठी किंवा एका वर्गासाठी नव्हे किंवा राष्ट्रासाठी नव्हे, तर हे अखिल मानवजातीसाठी अवतरण केले गेले. तसेच यातील शिकवण केवळ उपासना, नमाज, रोजा अशा  धार्मिक विधींपर्यंतच मर्यादित नसून त्यात मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्राविषयीच्या बाबी, आचारविचार, वागणूक, आपसातील व्यवहार, युद्ध, शांतता, शासन, प्रशासन, राज्यव्यवस्था,  आर्थिक जीवन, सामाजिक जीवन, वगैरे सर्वांविषयी शिकवण आहे. पवित्र कुरआन हा अल्लाहने आपले संदेशवाहक जिब्रिल (अ.) यांच्याद्वारे आपले अंतिम प्रेषित मुहम्मद (स.)  यांच्यावर अवतरित केले. त्याची सुरूवात इ. स. 610 मध्ये मक्का शहरापासून दूर एका गुहेत झाली. सर्वांत पहिली वही (आयात) सुरह अलक च्या काही आयती होत्या. ’’वाचा (हे  पैगंबर स.) आपल्या पालनकर्त्याच्या नावासहीत ज्याने गोठलेल्या रक्ताच्या एका गुठळीपासून मानवाची निर्मिती केली. वाचा आणि तुमचा पालनकर्ता मोठा वैभवशाली आहे.’’ (कुरआन,  96:1-3)
कुरआनचे अवतरण प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर एकाच वेळी झालेले नाही. ते गरजेनुसार एकूण 22 वर्षे 5 महिने 40 दिवसांत पूर्ण झाले. कुरआनात 114 अध्याय (सूरह) मिळून 30 भाग (पारे) पाडण्यात आले आहेत. यात 540 रुकुअ (विसावे) आहेत. कुरआनचे पठण (ऐकताना किंवा करताना) यातील 14 ठिकाणी सजदा करणे म्हणजे ईेशरासमोर नतमस्तक होणे अनिवार्य आहे. संपूर्ण कुरआनात 77234 शब्द व 333760 अक्षरे आहेत. 6666 आयती आहेत. पवित्र कुरआनच्या बाबतीत स्वत: ईेशर (अल्लाह) सांगतो,’’आम्ही यास कद्रच्या  रात्री पाठविले आणि तुम्हाला काय माहीत कद्रची रात्र काय आहे? कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यानुसार ही रात्र रमजान महिन्याच्या  शेवटच्या दहा दिवसांपैकी एक रात्र आहे. जसे बारा महिन्यांत रमजान हा पवित्र महिना मानला जातो तसे रमजान महिन्यातील शेवटच्या दहा रात्रींमधून एक पवित्र रात्र आहे. कुरआन  ईेशराचा दोर आहे अर्थात जे याच्या नियमाला धरून जीवन व्यतीत करतील ते जग व परलोकात यशस्वी होतील. या संदर्भात तिबरानींची एक हदीस (प्रेषित वाणी) आहे की एकेदिवशी  प्रेषित मुहम्मद (स.) एका मस्जिदमध्ये गेले. त्यांनी पाहिले की काही सहाबी (प्रेषितांचे साथीदार) मस्जिदमध्ये एका कोपऱ्यात बसून एकमेकांना कुरआन समजावून सांगत होते. हे  पाहून प्रेषितांचा चेहरा आनंदी झाला. प्रेषित त्यांच्या जवळ गेले आणि विचारले की ’’तुम्ही म्हणता की अल्लाहशिवाय कोणी उपासनेस योग्य नाही, मी अल्लाहचा प्रेषित आहे आणि  कुरआन अल्लाहचा ग्रंथ आहे?’’ साहबांनी उत्तर दिले, ’’हे प्रेषित! होय, आम्ही ग्वाही देतो की अल्लाहशिवाय कोणी उपासनेस योग्य नाही आणि तुम्ही अल्लाहचे प्रेषित आहात व  कुरआन अल्लाहचा ग्रंथ आहे.’’ मग प्रेषित म्हणाले, ’’तुमच्यावर कृपा असो अल्लाहची. मी असा विेशास देतो की कुरआन अल्लाहचा दोर आहे. ज्याला धरून तुम्ही स्वर्गापर्यंत पोहचाल,  ज्याचे एक टोक धरतीवर तुमच्याजवळ आणि दुसरे टोक आकाशात अल्लाहजवळ आहे.’’

– नाजीम खान
9763869930

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *