माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे.
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘कोणालाही त्याच्या स्वत:च्या कर्माने स्वर्गात जाता येणार नाही.’’
पैगंबरांना लोकांनी विचारले, ‘‘आपणाससुद्धा नाही हे अल्लाहचे पैगंबर?’’
सांगण्यात आले, ‘‘नाही, मलासुद्धा नाही. परंतु अल्लाहने त्याच्या कृपेने व दयेने आच्छादित केले तर. म्हणून तुम्ही दृढता व सुनीती स्वीकारा आणि सान्निध्य स्थापित करा, तसेच तुमच्यापैकी कोणी मृत्युची कामना करू नये. कारण तो सत्कर्मी असेल तर त्याच्या सत्कर्मांत वृद्धी करेल आणि जर तो दुष्कर्मी आहे तर कदाचित तो पश्चात्ताप करून (तौबा करून) अल्लाहला प्रसन्न करील.’’
स्पष्टीकरण
एक हदीसकथन आहे, ‘‘जाणून असा की तुमच्यापैकी कोणीही स्वकर्माने मुक्ती प्राप्त करू शकणार नाही.’’
कुरआनमध्ये आले आहे,
‘‘आणि त्यांना विचारले जाईल : हा स्वर्ग (जन्नत) आहे ज्याचे तुम्हाला वारस बनविले आहे, त्या कर्मांच्या मोबदल्यत जी तुम्ही करीत होता.’’
(दिव्य कुरआन, ७:४३) कुरआन आणि हदीसवर्णनात कसलीही विसंगती सापडत नाही. स्वर्गाचे महान उत्तराधिकारीचे स्थान तर ईश्वरकृपा व दयेनेच प्राप्त होईल. मनुष्याची सत्कर्मे तर निमित्तमात्र असतील. सत्मार्गांनी तर हीच आशा केली जाऊ शकते की ईश्वर दया होईल. स्वर्गप्रवेशाचे वास्तविक कारण ईशकृपा व दयेव्यतिरिक्त अन्य काहीही नाही. ईशकृपा व दयेविना मनुष्यकर्मांचे महत्त्व व स्थिती नगण्य आहे.
अल्लाह कोणा जीवावर त्याच्या सामर्थ्यानुसारच दायित्वाचा भार टाकत असतो.(कुरआन, २:२८६) म्हणून सुनीती आणि सुदृढता स्वीकारा, परंतु मध्यममार्गाला नेहमी तुम्ही दृष्टीसमोर ठेवा ज्यामुळे संतुलित मार्गावर मार्गस्थ होणे तुमच्यासाठी सुकर होईल. जर स्वत:वर अतिरेक कराल तर हे जास्त काळ चालणार नाही. यात शंका आहे की कर्मध्येय तुम्ही विसरून जाल. हे लक्षात ठेवा, ‘‘अल्प जे शिल्लक आहे त्या अधिकपासून श्रेष्ठ आहे जे शिल्लक राहात नाही.’’ सुदृढता, अनुसरण व सान्निध्य त्या मध्यममार्गाला म्हणतात ज्यात अतिरेकाने काम घेतले जात नाही की अत्यल्पतेनेसुद्धा घेतले जात नाही.
एखाद्यास सत्कर्माची संधी प्राप्त होत नसेल तरी त्याने मृत्युची कामना करू नये. जीवनात शक्य आहे की त्याला पश्चात्ताप करण्याचा सुअवसर प्राप्त होईल आणि ईशप्रकोपापासून तो गृहस्थ सुरक्षित होईल.
‘‘अल्लाहव्यतिरिक्त अन्य सर्वकाही नष्टप्राय आहे.’’
0 Comments