माननीय अबू अय्यूब अंसारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्यासाठी वैध नाही की त्याने आपल्या बंधुशी तीन रात्रींपेक्षा अधिक काळापर्यंत संबंध तोडून टाकले असावेत. दोघे रस्त्यात एकमेकांना भेटले असता तोंड फिरवितो आणि प्रथम सलाम करणारा त्या दोघांमध्ये उत्तम आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण
अशी शक्यता आहे की दोन मुस्लिम व्यक्ती एखादवेळी एखाद्या गोष्टीवर एकमेकांवर नाराज व्हावेत आणि बोलणे बंद करावे, परंती तीन दिवसांपेक्षा अधिक त्यांनी या स्थितीत राहायला नको. सर्वसाधारणपणे असेच घडते की दोन मनुष्यांदरम्यान जर वितुष्टी निर्माण झाली आणि त्या दोघांना अल्लाहचे भय असेल तर दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्यात एकमेकांना भेटण्याची आतुरता निर्माण होऊ लागते आणि शेवटी त्यांच्यापैकी एकजण प्रथम सलाम करून ती शैतानी वितुष्टी संपुष्टात आणतो. म्हणून सलाम करण्यात तत्परता दाखविणाऱ्याची उत्कृष्टता या हदीसमध्येदेखील सांगितली गेली आहे आणि याव्यतिरिक्त दुसऱ्या हदीसींमध्येदेखील.
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वत:ला वाईट शंकेपासून अलिप्त ठेवा; कारण वाईट शंकेसह सांगितलेली गोष्ट सर्वाधिक खोटी असते. दुसऱ्यांच्या बाबतीत माहिती प्राप्त करत फिरू नका, टेहळणी करू नका, आपसांत दलाली करू नका, दुसऱ्यांशी शत्रुत्व बाळगू नका, एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करू नका आणि अल्लाहचे भक्त व्हा, आपसांत भाऊ-भाऊ बनून जीवन व्यतीत करा.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण
या हदीसमधील काही शब्दांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. (१) ‘तहस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘कान देऊन ऐकणे’ आणि ‘टक लावून पाहणे’. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे की एखाद्याचे बोलणे ऐकण्यासाठी लपून-छपून उभे राहणे आणि मग त्याच्या वक्तव्याचा त्याच्याच विरोधात वापर करणे आणि त्याला लोकांच्या दृष्टीत तुच्छ सिद्ध करणे ईमान व इस्लामच्या विरूद्ध आहे. (२) ‘तजस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– एखाद्याचे दोष शोधण्याचा प्रयत्न करणे’ की केव्हा त्याच्याकडून चूक घडते आणि केव्हा त्याची एखादी दुर्बलता त्याला माहीत पडते जेणेकरून लगेचच त्याची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी त्या दुर्बलतेचा इकडेतिकडे पैâलाव करत फिरणे. (३) ‘तनाजुश’ या शब्दाचा अर्थ आहे– जो खरेदी-विक्रीशी संबंधित आहे म्हणजेच ‘दलाली’. दलाल आणि व्यापाऱ्यादरम्यान ही गोष्ट निश्चित होते की दलाल चढ्या दराने बोली लावेल आणि त्याची इच्छा तो माल खरेदी करण्याची नसते तर फक्त ग्राहकांना फसविण्यासाठी तो असे करीत असतो. (४) ‘तदाबुर’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘आपसांत शत्रुत्व बाळगणे’ विंâवा ‘संबंध तोडणे’.
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) प्रवचन मंचावर विराजमान झाले आणि अतिशय मोठ्या आवाजात म्हणू लागले, ‘‘हे त्या लोकांनो! ज्यांनी फक्त आपल्या वाचेने इस्लामचा स्वीकार केला आहे आणि ईमान तुमच्या हृदयात उतरलेले नाही, तुम्ही मुस्लिमांना त्रास देऊ नका आणि त्यांना लज्जित करू नका आणि त्यांच्या दोषांच्या मागे पडू नका. जे लोक आपल्या मुस्लिम बंधुंच्या दोषांच्या मागे पडतात, अल्लाह त्यांच्या दोषांच्या मागे पडेल आणि ज्या मनुष्याच्या दोषांच्या मागे अल्लाह पडतो त्याला अपमानित करतो, जर तो आपल्या घरात असेल. (हदीस : तिर्मिजी).
स्पष्टीकरण
धर्मद्रोही सच्चा व पवित्र मुस्लिमांना वेगवेगळ्या प्रकारचात्रास देतात आणि अज्ञानकाळात घडलेल्या त्यांच्या घराण्याच्या लज्जास्पद दोषांना त्या लोकांसमोर सांगतात, त्याच लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या हदीसमध्ये तंबी दिली आहे. काही दुसऱ्या हदीसींमध्ये कथन करण्यात आले आहे की हे भाषण देताना पैगंबरांचा आवाज इतका वाढला होता की आसपासच्या घरांपर्यंत हा आवाज पोहोचला आणि
0 Comments