कुफ्र (अनेकेश्वरवाद) काय आहे आणि इस्लाम काय आहे?
ही गोष्ट समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की अनेकेश्वरवाद (नास्तिकता) काय आहे आणि इस्लाम काय आहे? अनेकेश्वरवाद अथवा नास्तिकता ती आहे ज्यात मनुष्य अल्लाहची आज्ञा पाळण्यास नकार देतो. आणि इस्लाम तो आहे ज्यात मनुष्य केवळ अल्लाहच्या आज्ञेचे पालन करतो. तो अशा प्रत्येक पद्धती अथवा कायदा किंवा आज्ञेचे पालन करण्यास नकार देतो जी अल्लाहने पाठविलेल्या मार्गदर्शनाच्या विरुद्ध असते. इस्लाम आणि अनेकेश्वरवाद (नास्तिकता. अल्लाहचा इन्कार) मधील हा फरक पवित्र कुरआनमध्ये स्पष्टपणे दाखविला गेला आहे. म्हणून फर्माविले गेले आहे की,“जे अल्लाहने उतरविलेल्या मार्गदर्शनानुसार निर्णय करीत नाहीत असलेच लोक वास्तविकतः अनेकेश्वरवादी (इन्कार करणारे) आहेत.”
-सूरतुल माइदाह-४४
निर्णय करण्याचा अर्थ असा नव्हे की जो खटला न्यायालयात जाईल केवळ त्याचाच निकाल अल्लाहच्या ग्रंथानुसार हावा, तर वास्तविकता याचा अर्थ तो. निकाल अथवा निर्णय आहे जो प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात सदैव करीत असतो. प्रत्येक वेळी तुमच्या समोर हा प्रश्न उभा राहतो की अमुक काम करावे किवा करु नये? अमुक गोष्ट अशी केली जावी की तशी केली जावी? अशा सर्व प्रसंगी एक पद्धत अल्लाहचा ग्रंथ आणि त्याच्या प्रेषितांची परंपरा दर्शविते आणि दुसरी पद्धत माणसाच्या स्वतःच्या इच्छा अथवा बापजाद्यांच्या चालीरीती किंवा मानवनिर्मित कायदे दर्शवितात. मग जो मनुष्य अल्लाहने दाखविलेली पद्धत सोडून एखाद्या अन्य पद्धतीनुसार काम करण्याचा निर्णय घेतो तो वास्तविकत: नास्तिकतेची (अल्लाहचा इन्कार करण्याची पद्धत अवलंबितो. जर त्याने आपल्या संपूर्ण जीवनात याच पद्धतीचे अवलंबन केले असेल तर तो पूर्णपणे काफिर (इन्कार करणारा, आहे. जर तो काही बाबतीत तर अल्लाहच्या आदेशांना मानत असेल आणि कांही बाबतीत आपल्या इच्छांना अथवा चालीरीतींना किंवा मानवाच्या कायद्याला अल्लाहच्या कायद्यावर प्राधान्य देत असेल तर जितक्या प्रमाणात तो अल्लाहच्या कायद्याचे उल्लंघन करतो तितक्या प्रमाणात तो काफिर ठरतो. एखादा अर्धा काफिर आहे, कुणी एक-चतुर्थांश काफिर आहे. कुणी एक-दशांश काफिर आहे आणि कुणी विसाव्या भागाने काफिर आहे. एखादा मनुष्य अल्लाहच्या कायद्याचे जितके उल्लंघन करतो तितकाच तो काफिर ठरतो.
इस्लाम याशिवाय अन्य काही नाही की माणसाने केवळ अल्लाहचा दास असावे. तो स्वमन, वंश व टोळी, मौलवी व पीर (संत) वगैरेंचाही दास असू नये आणि जमीनदार, तहसीलदार आणि मॅजिस्ट्रेट किंवा अल्लाहला सोडून कोणाचाही त्याने दास असू नये. पवित्र कुरआनमध्ये फर्माविले आहे
“हे पैगंबर! (स.) ग्रंथधारकांना सांगा की या, आम्ही आणि तुम्ही एका अशा गोष्टीवर सहमत होऊ जी आमच्या आणि तुमच्या दरम्यान एकसमान आहे. (म्हणजे जी गोष्ट तुमच्या पैगंबरानेही सांगितली आहे. आणि अल्लाहचा प्रेषित असण्याच्या नात्याने मी सद्धा तीच गोष्ट सांगत आहे.) ती गोष्ट अशी की एक तर आम्ही अल्लाहशिवाय कोणाचेही दास बनून राहू नये, दुसरी अशी की ईश्वरत्वात कोणासही भागीदार करू नये आणि तिसरी गोष्ट अशी की आमच्यापैकी कोणत्याही माणसाने कोणत्याही माणसाला अल्लाहच्या जागी आपला मालक व आपला स्वामी बनवू नये. या तीन गोष्टी जर त्यांनी मान्य केल्या नाही तर त्यांना सांगा की साक्षी रहा आम्ही तर मुसलमान आहोत म्हणजे आम्ही या तिन्ही गोष्टी मान्य करतो.” -सूरह आले इमरान : ६४
“काय ते अल्लाहच्या आज्ञापालनाशिवाय अन्य एखाद्याची आज्ञा पाळू इच्छितात? वास्तविकतः अल्लाह तर तो आहे ज्याच्या आज्ञेचे पालन कोणत्याही परिस्थितीत पृथ्वीवरील व आकाशातील प्रत्येक वस्तु करीत आहे आणि सर्वांना त्याच्याकडेच परतावयाचे आहे.”
– सूरह आले इमरान : ८३
या दोन्ही आयतीत एकच गोष्ट सांगितली गेली आहे. ती अशी की खरा धर्म अल्लाहची ताबेदारी व आज्ञापालन करणे होय. अल्लाहच्या उपासनेचा अर्थ असा नव्हे की फक्त पाच वेळा त्याच्यापुढे सिजदा (नमाज पढणे) करावा. तर त्याच्या उपासनेचा अर्थ असा आहे की रात्री व दिवसा सदैव त्याच्या आज्ञेचे पालन करावे. ज्या गोष्टींची त्याने मनाई केली आहे, ती करू नये आणि ज्या गोष्टीचा हुकुम दिला आहे त्याची अम्मलबजावणी करावी. प्रत्येक बाबतीत हे पहावे की अल्लाहची काय आज्ञा आहे. हे पाहू नये की तुमचे स्वतचे मन काय सांगत आहे, तुमची बुद्धी काय म्हणते, वाड-वडिलांनी काय केले होते, कुळ व भाऊकीची काय इच्छा आहे, मौलवी साहेब आणि पीर (साधु) साहेब काय म्हणत आहेत आणि अमुक साहेबांची काय आज्ञा आहे किंवा अमुक साहेबांची काय इच्छा आहे. जर तुम्ही अल्लाहच्या आज्ञेला डावलून कोणाचेही ऐकले तर तुम्ही त्याला ईश्वरत्वात भागीदार बनविले. त्याला तो दर्जा दिला जो केवळ अल्लाहचा दर्जा आहे. आज्ञा देणारा तर केवळ अल्लाहच आहे.
“उपासनेच्या लायक तर केवळ तोच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले आणि ज्याच्यामुळे तुम्ही जिवंत आहात. पृथ्वी व आकाशातील प्रत्येक वस्तु त्याच्या आज्ञेचे पालन करीत आहे.” – सूरतुल अनआम : ५७
0 Comments