Home A blog A मिळून मिसळून रहा…

मिळून मिसळून रहा…

रहेमतुल्लील आलमीन हज़रत मुहम्मद मुस्तुफ़ा सल्लल्लाहो अलैहे वसल्लम यांचे सर्वच संदेश  सोनेरी शब्दांनी लिहिण्यासारखे आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये पारिवारिक सदस्य, शेजारी, समाज आणि  देशवासियांसोबत भेटणे आणि त्यांच्याशी व्यक्तिगत  संबंध बनवून ठेवण्यात अनेक अशा गोष्टींचा आणि व्यवहारशी सामना करावा लागते जे कधीकधी मनाला पटत नाही. अशा परिस्थितीत कधी ते स्वीकार करण्यात अडचणी येतात तर कधी त्यांच्याशी संबंध खराब होण्याची शक्यता असते. जेव्हा कधी त्यांच्या संवेदना आणि आस्थेला  धक्का लागतो तर कधी त्यांच्या कटू बोलण्याचा सामना करावा लागतो तर कधी  आर्थिक नुकसानही होते. अशा परिस्थितीमध्ये चांगला व्यक्ती तोच असतो जो लोकांना दूर जाण्यास रोकूण त्यांना एकत्र जमा करून राहतो. प्रत्येक त्रासाला अल्लाहकरिता   सहन करतो आणि लोकांशी संबंध बनवून ठेवतो. अल्लाहच्या जवळ अशी व्यक्ती प्रिय आहे जो लोकांच्या त्रास सहन करूनही लोकांशी संबंध जोडून ठेवतो. हजरत मोहम्मद स.अ.व.यांनी सांगितले आहे कि  ’जो व्यक्ति लोकांशी मिळून मिसळून राहतो आणि त्यांच्याकडून होणार्‍या त्रासाला न  घाबरत धैर्य ठेवून वागतो ती व्यक्ति चांगली आहे अशा व्यक्ती पेक्षा जे लोकांशी मिळून मिसळून राहत नाही आणि त्यांच्याकडून होणार्‍या त्रासाला सहन करण्याचे धैर्य त्यांच्याकडे नाही.’
    हजरत मोहम्मद स.अ.व. यांनी सांगितले कि ज्या व्यक्तिला असं वाटते कि त्याच्या उपजीविकेमध्ये वाढ व्हावी आणि त्याचे आयुष्य वाढावे तर त्याने आपल्या नातलगांशी चांगले वर्तन ठेवायला हवे. अल्लाहच्या प्रसन्नतेकरिता कुणाला भेट देने, प्रेम-भाव व्यक्त करने अल्लाह च्या नजरेत खूप प्रिय आणि अत्यंत  प्रशंसनीय कार्य आहे. अशा लोकांसाठी हजरत मोहम्मद स.अ.व. यांनी अनेक  उद्घोषणा केल्या आहेत. अशा लोकांचे  अल्लाह समोर मोठे  स्थान आहे.  परलोकामध्ये अल्लाह त्यांना आपल्या सिंहासनच्या सावलीत जागा देईल व त्यांना माफ करेल. अल्लाह कयामतच्या दिवशी म्हणेेल, कुठे आहेत ते लोकं जे माझ्या महानतेकरिता एकमेकांशी प्रेम भावाने राहतात, आज मी त्यांना आपल्या सावलीत ठेवणार, आज माझ्या ऐवजी कुठलाही सहाय्यक नाही. संबंध तोड़ने आणि संपवणे या बद्दल हजरत मोहम्मद स.अ.व. यांनी कठोर निर्देशही दिले आहेत कि संबंध तोड़नारा जन्नत मधे प्रवेश करनार नाही. या संबंधी पवित्र कुरआन ची सुरा राद 25 मध्ये अल्लाहचे  फरमान आहे कि जो कोणी या संबंधांना तोडेल ज्यांना  अल्लाहने जोडण्याचा आदेश दिला आहे आणि जो जमीनीवर  सांप्रदायिकता पसरवत फिरेल ते धिक्काराचे हकदार आहेत. कयामतच्या दिवशी त्यांच्या करिता वाईट ठिकाण सुनिश्‍चित आहे. तुम्ही एकमेकांना पाहून व्यवहार करणारे बनू नये व  जर कोणी अत्याचार करत असेल तर आपणही तसे करू नये या उलट सर्वांशी मिळून मिसळून रहा. वाईटांसोबतही चांगले वागा म्हणजे आयुष्यात सर्व गोष्टी ठीक होतील.          – डॉ एम ए रशीद, नागपूर
संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *