धर्मपरायणता आणि ईशभयच्या शिकवणी-व्यतिरिक्त वर पठण करण्यात आलेल्या आयतीमध्ये मानवांचे आणि नातलगांचे हक्क पूर्ण करण्याची विशेष शिकवण देण्यात आली आहे. समस्त मानवांना अल्लाहने निर्माण केले आहे. सर्व मानव हे एकाच माता-पित्याची संतती असल्याने आपण समस्त मानव एकाच परिवाराचे सदस्य आहोत. आपसांत बंधु आणि नातलग आहोत. म्हणून प्रत्येकाचे एकमेकांवर हक्क आहेत. हे हक्क पूर्ण करणे नितांत आवश्यक आहे. जसी अल्लाहची दासत्व हदीसद्वारा माहीत होते अल्लाह कुफ्र व शिर्कशिवाय अल्लाहस वाटल्यास इतर अपराधांची माफी देईल, मात्र मानवी हक्कांची पायमल्ली मुळीच खपवून घेणार नाही व माफ करणार नाही जोपर्यंत मनुष्य स्वत: माफ करत नाही.
विवाहप्रसंगी मानवाधिकार आणि नातलगांचे अधिकार पूर्ण करण्याची शिकवण अत्यंत महत्त्वपूर्ण असून नववधू आणि वराच्या नातलग व याप्रसंगी हजर असलेल्या लोकांसाठी अमूल्य भेट आहे. पतीने पत्नीचे हक्क पूर्ण केल्यास, मुलांनी मात्यापित्यांचे, मातापित्यांनी मुलांचे आणि नातलगांनी एकदुसऱ्यांचे आणि शेजाऱ्यांने शेजाऱ्याचे तसेच प्रत्येकाने दुसऱ्याचे हक्क जर पूर्ण केले तर या भूतलावर स्वर्गरूपी नंदनवन बहरेल.
या आयतीवरून हे स्पष्ट होते की सर्व मानव एकाच माता-पित्याची संतती असून सर्वजण एकाच परिवार आणि एकाच वंशाचे सदस्य आहेत. म्हणून वर्ण आणि वंश तसेच जाती-पातीच्या आधारे कोणीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही. त्या आधारावर वरिष्ठ-कनिष्ठ आणि उच्च-नीच भेदभाव इस्लामने नष्ट केला आहे.
0 Comments