Home A hadees A मानवी उत्पत्तीचा कालचक्र

मानवी उत्पत्तीचा कालचक्र

हजरत अब्दुल्ला (रजी.) कथन करतात की, हजरत मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘तुमच्यामधील प्रत्येकाचा नुतफा (माद्दा) आपल्या आईच्या उदरात जमा होतो. नंतर चाळीस  दिवस घट्ट स्वरूपात रक्त म्हणून राहतो. नंतर चाळीस दिवस लोथळ्याच्या स्वरूपात असतो. त्यानंतर अल्लाह तआलाकडून एका फरिश्तेला (देवदूत) पाठविण्यात येते, आणि त्याला चार  बाबी लिहिण्याचा आदेश दिला जातो. आयुष्यातील क्रियाकर्मे (अमल), त्याची उपजीविका, आयुष्य आणि सत्चरित्र वा दुराचरित्र, या चार बाबी लिहून त्यामध्ये (रुह) आत्मा फूंकला जातो. यानुसार ती व्यक्ती आयुष्यातील सतकर्मे करीत असते इथपावेतो की त्याच्यामध्ये आणि जन्नतमध्ये (स्वर्ग) फक्त एक हात एवढे अंतर बाकी राहते.
त्यानंतर व्यक्तीवर त्याचे दुष्कर्म याचा पगडा बसतो, त्यानुसार तो दुष्कर्म करीत जातो इथपर्यंत की त्याच्यामध्ये आणि जहन्नम (नरक) मध्ये केवळ एका हाताचे अंतर बाकी उरते.  त्यानंतर त्याच्यावर त्याचे नशीब (तकदीर) चे प्रभुत्व वरचढ ठरते, त्यामुळे तो जन्नतवासीयाप्रमाणे कृती करीत राहतो.’’

भावार्थ-
डॉक्टर मुहम्मद अली अलबार यांनी गर्भ-वृद्धी शास्त्र (एम्बोयोलॉजी) च्या संशोधनास लक्षात घेता, कुरआन व हदीसने प्रस्तूत केलेल्या सत्यांना आपल्या, ‘खल्कुल इन्सान बैनत – तिब  वल कुरआन’ या अरबी भाषेतील ग्रंथामध्ये स्पष्टीकरण सादर करीत. गर्भपाताच्या समस्येविषयी लिहितो, ‘‘गर्भपात नेहमी आकार येण्यापूर्वी होतो आणि या अवस्थेस वैद्यकिय  परिभाषेत ‘इंद्रिय संपन्न-उत्पत्ती’ (ऑरगॉनो जेनिसीस) म्हंटले जाते. गर्भधारणेनंतर चौथ्या आठवड्यापासुन याचा आरंभ होतो आणि आठव्या आठवड्यांपर्यंत पडत असतो. तात्पर्य   गर्भाशय (वोम्ब) एक नैसर्गिक कारखाना घडवितो. अर्थात अशारितीने घडवितो की, घडविणाऱ्याचे हात दिसुन येत नाही. परंतु एक थेंब (वीर्याचा), ज्या उत्थानात्मक अवस्थांमधून जाऊन  मनुष्य रूप अंगीकारण्याच्या अवस्थेत पोहोचतो. ही मोठी विचीत्र प्रक्रीया आहे जी विचारचिंतनाचे आवानह करते, आणि विचार करणाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करते की, या मागे  एक सर्वज्ञ आणि सर्वसमर्थ शक्तिचा हात आहे. गर्भात जीव टाकला जातो आणि तो ऐकणारा व पाहणारा मनुष्य बनतो. प्रथम एक निर्जीव गोळा होता नी आता एक परिपूर्ण मनुष्य  झाला. रक्ताच्या गोळ्यास पाहून हे अनुमान लावले जाऊ शकत नाही की हा गोळा असे अस्तित्व धारण करील. ज्याला पृथ्वीच्या प्रतिनिधीत्वाचा सन्मान लाभेल. परंतु काही  महिन्यांच्या अवधीत एवढे जबरदस्त परिवर्तन घडून येते की तो एक नवीन सृष्ट-जीव बनून उदयास येतो. रक्ताचा गोळा (अलक) वगैर सर्व सामान्यपणे अवलोकनात येणारी बाब होती  म्हणजे गर्भपाताच्या स्थितीत लोक हे पाहात असत की गर्भाची प्राथमिक अवस्था कशी राहते व नंतर त्यात कसे स्थित्यंतर घडून येते. कुरआनचा युक्तीवाद याच सामान्य अवलोकनात  येणाऱ्या गोष्टीवर आहे. राहिले आजचे गर्भवृद्धीशास्त्र, ज्याने आश्चर्यजनक रहस्ये उलगडली आहेत. तर हा जणू कुरआनच्या संकेतांचा खुलासा होय व याद्वारे कुरआनचे हे प्रमाण  अधीक जास्त स्पष्ट झाले आहे की, हे अवलोकन कुरआनच्या त्या निवेदनाबाबत विश्वास निर्माण करते की मनुष्याला त्याचा पालनकर्ता दुसऱ्यांदा उठविल. गर्भाचे या विविध  परिस्थितीतून व स्वरूपातून जाऊन मनुष्य बनणे सृष्टीनिर्मात्याच्या निर्मितीचा डोळस पुरावा होय. तसेच याद्वारे निर्मात्याचे वैभवही व्यक्त होते की तो मोठे नैपुण्य बाळगणारा आहे  आणि त्याच्या कृपालाभाला कसलीही मर्यादा नाही.

संबंधित पोस्ट
September 2023 Safar 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 11
29 12
30 13
31 14
1 15
2 16
3 17
4 18
5 19
6 20
7 21
8 22
9 23
10 24
11 25
12 26
13 27
14 28
15 29
16 Rabi'al Awwal 1
17 2
18 3
19 4
20 5
21 6
22 7
23 8
24 9
25 10
26 11
27 12
28 13
29 14
30 15
1 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *