Home A blog A मदरसा हे ज्ञानमंदिर

मदरसा हे ज्ञानमंदिर

नागपूर (शोधन सेवा) – ’मस्जीद तसेच मदरशांमध्ये काही तरी रहस्यमय सुरू असते. विशेषत: मदरशांमधून मुस्लिम धर्मातील मुलांवर एकांगी संस्कार केले जातात आणि त्यांना कट्टरतेकडे वळविले जाते,’ असाच समज समाजातील अनेक घटकांमध्ये आहे. परंतु वास्तविकता याउलट असून मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना इस्लाम धर्माची मूलभूत तत्त्वे तसेच इतर विषय शिकविले जातात. त्यामुळे मदरसा ही संशयास्पद कृत्यांची जागा नाही, तर ते एक प्रकारचे ज्ञानमंदिरच आहे,’ असे प्रतिपादन सैय्यद हाजी नदवी यांनी व्यक्त केले. 
’जमात-ए-इस्लामी-हिंद’ तर्फे रविवार,28 ऑक्टोबर रोजी  जाफरनगर येथील जामिआ हुसैनिया या मदरसामध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी नदवी बोलत होते. यावेळी राजेंद्र सिंह, महादेव विठौले, योगेश जान बंधु, आशीष जगनीत, रूपेश सोनावाला, प्रयोग श्रीराव,  प्रा. मदावे, बोरकर, मि.बावनकुड़े ,विलास खड़से  गुरुदेव सेवा मंडल चे अध्यक्ष आदी उपस्थित होते. नदवी म्हणाले, मदरशांबाबत मुस्लिमेतर समाजात बरेचसे गैरसमज आहेत. तेथे नेमके काय सुरू असते, याबद्दल समाजातील प्रत्येकालाच जिज्ञासा असते. ही जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी आणि मदरशांबाबत असलेले गैरसमज दूर सारण्याच्या उद्देशाने ’मदरसा परिचय आणि चहापाणी’ या अनोख्या मोहिमेची 
सुरुवात ’जमात ए इस्लामी   
हिंद’ने सुरूवात केली आहे. मदरसा परिचयाचा हा देशातील पहिलाच प्रयोग असून, त्यासाठी नागपूरची निवड करण्यात आली. ’जमात ए इस्लामी हिंद’ने यापूर्वी ’मस्जीद परिचय’ असा उपक्रम राबविला. नागपूरसह संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबविण्यात आला. आता जमाततर्फे ’मदरसा परिचय आणि चहापाणी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात मुस्लिमेतर बांधवांना मदरशांमध्ये थेट प्रवेश दिला जात आहे. तेथे नेमके काय घडते, विद्यार्थ्यांना काय शिकविले जाते, विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध असतात, हे सगळे थेट बघता येणार आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनेक हिंदू बांधवांनी हिरिरीने सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांनी मदरशातील व्यवस्था आणि तेथील कार्यपद्धती जाणून घेतली. मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना पहाटेच्या (फजर) च्या नमाजापासून मशिदींमध्ये सुरू होणारे धार्मिक परिचालन, अरबी भाषेतील कुरआन पठणाचे शिक्षण, दररोज पाचवेळा, तर शुक्रवारी दुपारी अदा करण्यात येणारी सामूहिक नमाज आदींबाबत माहिती देण्यात येते. याखेरीज त्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक विषयसुद्धा शिकविले जातात. या मदरशांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालय आणि कम्प्युटर प्रयोगशाळेचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. 
गैरसमज दूर सारणे आवश्यक 
कार्यक्रमात सहभागी झालेले पं. वासुदेव दिवेदी म्हणाले ’मदरसा आणि मशिदींबाबत बरेच गैरसमज आहेत. सहसा येथे इतरांना प्रवेशच नसतो, अशी धारणा असल्याने येथे नेमके काय चालते, हा कुतुहलाचा विषय असतो. त्यामुळे जमाततर्फे सुरू करण्यात आलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे आणि यात सहभागी होऊन मला खरच आनंद झाला. येथील व्यवस्था आणि कार्यपद्धती बघून सगळे गैरसमज दूर झालेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमाअतचे सदस्य, मदरश्याचे शिक्षक मुफ्ती मोहम्मद साबिर, मौलाना रहमतुल्लाह , मौलाना फखरुल हसन, मौलाना अब्दुल रहीम, मौलाना सैयद नाशीत हुसैन, मुफ्ती बिलाल अहमद, आधुनिक शिक्षाचे  शिक्षक  मोहम्मद साकिब क़ाज़ी सलीम, अब्दुल अलीम, मोहम्मद आतिफ़, कारी नौशाद, कारी सलमान, मोहम्मद राग़िब मोहम्मद सोहेल व  दीनियात चे  शिक्षक हाजी अशफ़ाक, मौलाना मुदस्सिर, माज़ अहमद,  कारी इसहाक अहमद यांनी परिश्रम घेतले. हाफ़िज़ शाकिरुल अकरम फ़लाही यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांच्या प्रश्नांची  उत्तर दिले.
संबंधित पोस्ट
September 2024 Safar 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
26 21
27 22
28 23
29 24
30 25
31 26
1 27
2 28
3 29
4 Rabi'al Awwal 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *