Home A blog A प्रेषित इब्राहीम (अ.) आणि बकरीद

प्रेषित इब्राहीम (अ.) आणि बकरीद

पूर्ण जगामध्ये इस्लामि कॅलेंडर नुसार जिल्हज्जा या बाराव्या महिन्याच्या दहा तारखेला बकरीद ईद साजरी करण्यात येते या ईदच्या दिवसाला आणि या महिन्याला इस्लाम मध्ये अन्यन साधारण महत्व आहे याच महिन्यामध्ये इस्लामच्या अनुयायांसाठी जे पात्र आहेत अर्थात जे हज यात्रेसाठी अरबस्थानातील मक्का याठिकाणी जाऊ शकतात खर्च करण्याची आर्थिक ऐपत आणि शारीरिक ऐपत धारण करतात त्यांच्यासाठी हज यात्रा आवश्यक आहे, हज यात्रा ही एक उपासना विधी आहे ती या महिन्यात आठ ते बारा या ठराविक तारखांना ठराविक पद्धतीने करावयाची असते याच हज यात्रेदरम्यान दहा ते बारा या तारखांना जगातील इस्लामचे संपूर्ण अनुयायी ज्यांना शक्य आहे ते अल्लाहच्या नावाने जनावरांची कुर्बानी करतात आणि गोर गरीबांमध्ये वितरित करतात 

जगभरातील मुस्लिम बांधव बकरीद मध्ये जनावरांची कुर्बानी का करतात हे जाणून घेण्यासाठी प्रेषित इब्राहीम अलै सलाम यांच्या जीवनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आज पासून सुमारे चार हजार वर्षापूर्वी अर्थात ईसा पूर्व 2100 वर्षापूर्वी आदरणीय इब्राहीम यांचा जन्म इराकमधील उर शहरात आजर  नावाच्या प्रमुख महांताच्या घरी झाला जे राजपुरोहित तर होतेच मूर्ती बनवून विकण्याचा त्यांचा व्यापारही होता. त्यांच्याकडे अपार संपत्ती होती परंतु हे सर्व मूर्तिपूजक होते स्वतःला चंद्रवंशी व सूर्यवंशी म्हणून घेत मूर्ति तयार करणे आणि तिच्यासमोर नतमस्तक होणे ही बाब आदरणीय इब्राहीम आलै सलाम यांना पटत नव्हती म्हणून ते आपल्या वडिलांना विविध प्रश्न विचारीत परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. प्रेषित इब्राहीम आलै सलाम यांनी लोकांना विविध प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सर्वांना काही ना काही गरजा आहेत माझा अल्लाह, ईश्वर गरजवंत नाही तो एकमेव आहे जमीन आणि आकाशामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्यांचा निर्माता, सर्वांना निर्माण करणारा ,जन्म देणारा, पालन पोषण करणारा, मृत्यु देणारा माझा तुमचा आणि विश्वाचा अल्लाह, ईश्वर आहे तो एकच आहे म्हणून त्यांनी  इतर देवी-देवतांचा इंकार केला येथूनच त्यांची पहिली परीक्षा सुरू झाली.   तेथील राजाने त्यांना जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठावली पुजाऱ्याचा मुलगा म्हणून अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु अल्लाह, ईश्वरा वरील तो एक असल्याचा दृढ विश्वास असल्यामुळे ते डगमगले नाहीत माघार घेतली नाही वडिलांनी घरातून काढून टाकले. राजाच्या आदेशाने अतिशय मोठा अग्निकुंड तयार करण्यात आला अग्निकुंडाची आग भयंकर होती तरीपण पर्वता पेक्षा अधिक दृढ हृदय बाळगणाऱे एका ईश्वरावर विश्वास ठेवणारे प्रेषित इब्राहीम विचलित झाले नाहीत त्यांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केले “ज्यांना तुम्ही ईश्वरत्वात भागीदार ठरविता त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही”.

राजाच्या आदेशाने शिपायांनी प्रेषित इब्राहीम यांना धगधगत्या अग्निकुंडात फेकून दिले. आदरणीय इब्राहीम अल्लाचे प्रेषित होते अल्लाहने त्यांचे रक्षण केले. अग्नीला आदेश दिला ” हे अग्नी, थंड हो शांती, सुरक्षा, सुखदायी हो इब्राहीम साठी ” अल्लाह, ईश्वराच्या आदेशाने अग्नी इब्राहीम साठी थंड व शांत बनली अग्नित फेकून देणे इतके महाभयंकर होते की, त्याजागी आदरणीय प्रेषित यांना त्या लोकांमध्ये वास्तव्य करणे अशक्य होते. म्हणून अल्लाने त्यांना स्वदेश त्यागाचा आदेश दिला उर शहराला सोडून निघून जावे.  प्रेषित इब्राहीम यांनी आपली पत्नी व पुतण्या लूत अलैसलाम यांना सोबत घेऊन आपला देश सोडला त्यांनी राजपुरोहिताची गादी, धनसंपत्ती सोडून सीरिया , पॅलेस्टाईन, इजिप्त आणि अरबस्तानातील विविध देशात फिरत राहिले. अल्लाहलाच माहित या प्रवासात त्यांना किती अडचणी आल्या असतील. ते धनसंपत्ती कमविण्याच्या चिंतेत भटकत नव्हते तर लोकांना प्रत्येकाच्या गुलामगिरीतून मुक्त करून फक्त एका अल्लाचे, ईश्वराचे गुलाम बनावे हा संदेश देत होते. आज सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि आमची ही परीक्षि आहे. या भ्रमंतीमध्ये लोकांना सत्याची जाणीव करून देताना त्यांना कोठेही शांती लाभली नाही. वर्षानुवर्षे विना बिऱ्हाड भटकत राहिले. अशाच प्रकारे तारुण्य निघून जाऊन केस पांढरे झाले आणि जीवणाची दुसरी परीक्षा सुरू झाली. वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत त्यांना संतती प्राप्त झाली नव्हती. अल्लाहने त्यांना 86 व्या वर्षी संतती दिली. ते करत असलेल्या कार्यास पुढे नेण्यासाठी कोणीतरी वारस हवा म्हणून त्यांनी अल्लाकडे प्रार्थना,  संततीची याचना केली होती.पुत्र प्राप्ती नंतर अल्लाहने त्यांची दुसरी परीक्षा घेतली म्हातारपणी पुत्ररत्न प्राप्तीचा आनंद काही औरच होता. कृतज्ञता व्यक्त केली याच काळात अल्लाहचा आदेश मिळाला की काबागृहासाठी जागा निश्चित केलेली आहे तुम्ही तिकडे जा. आपल्या पत्नीला व लहान मुलाला घेऊन आज काबागृह जिथे उभा आहे तेथे पोहोचले हा परिसर निर्जन निर्जल ओसाड निर्मनुष्य होता.

या ठिकाणी दूरदूरपर्यंत वस्ती आणि पाणीही नव्हते. अल्लाहाने पुन्हा आदेश दिला पत्नी व मुलाला येथे सोडून निघूनजा. आदरणीय इब्रहिम  अल्लाहच्या आज्ञेपुढे नतमस्तक झाले विरान वाळवंटात निर्मनुष्य जागी आपल्या पत्नीला, लहान मुलाला सोडून जाताना त्यांच्या मनस्थितीची कल्पनाही केली जाऊ शकत नाही म्हातारपणी नुकतेच  पुत्रप्राप्ति झाली होती की हा आदेश प्राप्त झाला.

पुढे गेल्यावर काबागृहाकडे तोंड करून प्रार्थना केली “हे माझ्या निर्माणकर्त्या प्रभू, मी अशा निर्जन व ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागास तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे. हे पालनकर्त्या प्रभू असे मी अशासाठी केले आहे की, या लोकांनी येथे नमाज कायम करावी म्हणून तू लोकांच्या हृदयांना यांच्याकडे आकर्षित कर आणि यांना खावयास फळे दे कदाचित ते कृतज्ञ होतील ” प्रेषितांची पत्नी आणि लहान मुल आदरणीय  इस्माईल त्या वाळवंटात एकटे पडले थोडं फार अन्नपाणी होती ते संपले अन्नपाणी नाही म्हणून आईला दूध एत नव्हते. मुलाची परिस्थिती वाईट होती भुकेने व्याकुळ होते कोठे पाणी मिळते काय किंवा कुणीप्रवासी दिसतील तर पाणी मागता येईल कारण मुल रडत होते म्हणून आई हजरा त्या ठिकाणी असलेल्या दोन टेकड्या सफा ,मरवा यावर चढून इकडे तिकडे पाहत होती, प्रार्थना करत होती, दोन्ही टेकड्या मध्ये त्यांनी सात फेऱ्या मारल्या टेकडीवर जात पुन्हा मुल एकटे आहे म्हणून धावून परत येत. जीव कासावीस होत होता मूल रडत होते अल्ला पाहत होता दोन्ही टेकड्यांमध्ये किमान 450 मीटर अर्थात चौदाशे 80 फूट एवढं अंतर होतं 7व्या फेरी  मध्ये 3.15 किमी अंतर त्यांनी पार केलं होतं. शेवटी सातव्या फेरीनंतर त्या ठिकाणी देवदूतांनी पाण्याचा झरा निर्माण केला.  जो जमजम च्या नावाने आजही अस्तित्वात असून जगातील सर्वात वैज्ञानिक दृष्टीने शुद्ध असून अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. दरवर्षी कोट्यवधी लिटर पाणी संपूर्ण जगातून येणारे लोक घेऊन जातात. पाण्यासाठी आईची ती पराकाष्ठा जगभरातील अनुयायासाठी हज यात्रेतील आवश्यक परंपरा म्हणून अनिवार्य केली  गेली.त्या सात फेऱ्या तशाच पूर्ण केल्याशिवाय हजपूर्ण होत नाही. दुसऱ्यापरीक्षेमध्ये ही प्रेषित इब्राहीम यशस्वी झाले. पाण्यामुळे त्या ठिकाणी वस्ती झाली होती. अधून मधून प्रेषित मुलास भेटण्यासाठी येत. अशाप्रकारे मुलगा, प्रेषित इस्माईल 14 वर्षाचे झाले. आतापर्यंत अल्लाहने प्रेषित इब्राहीम यांना ज्या ज्या परीक्षेत आजमावले त्या सर्व परीक्षेमध्ये ते खरे उतरले. 

आता तिसरी परीक्षा सुरू झाली होती. मुलास भेटावयास गेले असताना आपल्या मुलास त्यांनी जे सांगितले ते कुराणाच्या शब्दात खालील प्रमाणे आहे “तो मुलगा जेव्हा त्यांच्यासमोर धावपळ करण्याच्या वयात आला तेव्हा एके दिवशी प्रेषित इब्राहीम यांनी त्याला सांगितले हे माझ्या मुला मी स्वप्नात पाहतो की, मी तुझा बळी देत आहे आता सांग तुझा काय विचार आहे, मुलाने सांगितले हे पिताजी जी काही आज्ञा आपणास दिली जात आहे तसे करा अल्लाहाने इच्छिले तर आपणास मी  धैर्यशील आढळेल. पूर्ण विश्व पिता पुत्राचा संवाद स्तब्ध होऊन ऐकत होता. कुराणाची स्पष्टोक्ती आहे “सरते शेवटी जेव्हा या दोघांनी अल्लाच्या आज्ञापालनात मान तूकविली आणि प्रेषित इब्राहीम यांनी पुत्राला ओणवे केले.” पुत्राला ओणवे करणे यासाठी 

की बळी देताना पुत्राच्या चेहऱ्याकडे पाहून प्रेषित यांचे याचे प्रेम उफाळून येऊ नये आणि त्यांचे हात डगमगायला नको. पुत्राच्या गळ्यावर सुरी फिरवणार तोच अल्लाहने आवाज दिला, आकाशवाणी झाली कुराणात आहे “आणि आम्ही पुकारले हे इब्राहीम तू स्वप्न साकार केलेस,आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो निश्चितच ही एक उघड परीक्षा होती.” परीक्षा तर होतीच परंतु अल्लाहने आदरणीय इस्माईल यांना वाचविले. ह्या परीक्षेत आदरणीय प्रेषित इब्राहीम खरे उतरल्यानंतर त्यांना अल्लाहने जे बक्षीस दिले त्याचा उल्लेख कुराणाच्या शब्दात “आम्ही एक मोठे बलिदान देऊन त्या मुलाची सुटका केली आणि त्याची प्रशंसा व गुणगाण भावी पिढ्यांत सदैव ठेवले.  सलाम आहे इब्राहीम अलैसलाम वर आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. अल्लाहने एक सुदृढ मेंढा बळी देण्याचा आदेश दिला हे याच्या साठी होते की आदरणीय इब्राहीम आपल्या मुलाचा बळी देत होते परंतु अल्लाहने योग्य वेळी त्यांना रोखले ह्याचे बक्षीस अल्लाहने अशाप्रकारे दिले की या बलिदानास आदरणीय प्रेषित इब्राहीम यांची परंपरा आणि कार्य घोषित केले. बलिदानाची ही परंपरा श्रद्धावंतासाठी अंतिम दिनापर्यंत जिवंत ठेवली.प्रत्येक वर्षी याच दिवशी म्हणजे या महिन्याच्या दहा तारखेला जनावरांची कुर्बानी दिली जाते. ही कुर्बानी करताना आदरणीय इब्राहीम यांचे ते बलिदान आठवते जे त्यांनी उर शहरापासून येथपर्यंत केले होते कुर्बानीचा उद्देश ईश्वराचे आज्ञापालन आहे म्हणून जगभरातील मुस्लिम बांधव बकरीदच्या दिवशी विश्वाच्या अल्लाहच्या नावाने जनावरांची कुर्बानी देतात. गोर गरीबांमध्ये वाटतात. ही एक उपासना आहे जी अल्लाच्या आदेशानुसार इब्राहीम आले सलामच्या परंपरेनुसार प्रतीकात्मक देण्यात येते. तसे पाहिले तर हजरत इब्राहीम यांचे पूर्ण जीवन कुर्बानीची, बलिदानाची गाथा आहे. जगातील प्रत्येक वस्तू पेक्षा आपल्या म्हातारपणात प्राप्त झालेल्या मुलांच्या जीवनापेक्षा निर्माणकर्त्या अल्लाचा आदेश महत्त्वाचा आहे. आणि हेच अल्लाच्या दासाचे कर्तव्य आहे. माणसाची परीक्षा आहे आमचं सुध्दा कर्तव्य आहे पालन कर्त्याचा निर्माण कर्त्या, मालकाचा आदेश सर्वपरी म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले जीवन जगावे त्यातच आमचं आमच्या विश्वासचे कल्याण आहे.

– अ. मजीद खान

नांदेड, 

Mo. 9403004232

संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *