Home A प्रेषित A प्रेम व ममता, शौर्य व वीरतेचा असीम आवाज

प्रेम व ममता, शौर्य व वीरतेचा असीम आवाज

madina
मुस्लिम तर प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी आहेतच. ते त्यांना महानतम व अंतिम ईशदूत मानतात. आणि ते त्यांच्या प्रत्येक वचन, प्रत्येक कार्य व प्रत्येक शिकवणीवर पूर्ण विश्वास ठेवतात. त्यांनी प्रेषितांवर (ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर) कितीही श्रद्धा ठेवली व त्यांची कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे. मुस्लिमेतर विद्वान प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासंबंधी काय म्हणतात?
या शृंखलेत केवळ भारत व युरोपातील मुस्लिमेतर विद्वानांची मते व त्यांचे कथन एकत्रित केलेले आहे.

जर्मन इतिहासकार डोश लिहितो –
“हर्ष व विषाद प्रेम व ममता, शौर्य व वीरतेची ती विशाल पुकार जिचा तरल ध्वनि आमच्या कानात प्रवेश करतो ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात पूर्ण आवाज बाळगत असे. प्रेषित मुहम्मद (स.) यांना सर्वात जास्त सुभाष्य व उच्च-भाष्य लोकांशी केवळ बरोबरीचे करावी लागेली नाही तर त्यांच्यावर श्रेष्ठत्वदेखील प्राप्त करावे लागले आणि आपल्या कथनाच्या सुभाष्यतेला व उच्चतेला आपल्या प्रेषित्वाच्या दाव्याचा पुरावा म्हणूनदेखील सिद्ध करावे लागले. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यापूर्वी कवींनी विपुल प्रमाणात प्रेम काव्याची रचना केलेली होती. अन्तराने प्रेमीच्या दशेचे चित्रण एका प्रसिद्ध कथेत केले होते. ज्याला प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अरबस्थानच्या कवींचा सरदार परंतु नरकवासियांचा नेता म्हणून संबोधिले, त्या ‘इमरुलकैस’ ने प्रेमाच्या नितांत उच्च व दिव्य-कोटीच्या पदांची रचना केली होती आणि मद्यपान व चंद्रमुखी, रजतवदनी प्रेमिकांच्या प्रशंसेत भाषेची सुलभता व अलंकाराची नदी प्रवाहित केली होती. परंतु प्रेषित मुहम्मद (स.) यांनी प्रेम-काव्यही छंदबद्ध केले नाही. या नश्वर जगातील सुख-दुखांना छंदबद्ध केले नाही. अरबस्थानाच्या पाणीदार तलवारीची चमक, वेसणधारी उंट किंवा अरबस्थानातील ईर्ष्या, द्वेष व सूड उगविण्याची इच्छा अथवा एखाद्या जाती व घराण्याच्या बापजाद्यांच्या शौर्य कथांना त्यांनी छंदबद्ध केले नाही की एखादे विशेष वर्णन केले नाही की ज्या योगे हे ज्ञात व्हावे की त्यांच्या दृष्टीने मानव शरीरात काहीही तथ्य नाही. व त्याच्या नशिबी केवळ विनाश आहे. सारांश असा की त्यांनी लोकांना कविता व वाङ्मय प्रकार शिकविले नाहीत तर त्यांना इस्लाम शिकविले व अशाप्रकारे शिकविले की पृथ्वी व आकाशाला भेटून स्वर्ग व नरकाला साकार करून दाखविले.”
– (एजाजुत्तंजील, पृ. ६३)
संबंधित पोस्ट
June 2024 Zul Qa'dah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 19
28 20
29 21
30 22
31 23
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 30
8 Zul Hijjah 1
9 2
10 3
11 4
12 5
13 6
14 7
15 8
16 9
17 10
18 11
19 12
20 13
21 14
22 15
23 16
24 17
25 18
26 19
27 20
28 21
29 22
30 23

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *