ही गोष्ट सर्वसिद्ध आहे की प्रेषित मुहम्मद (स.) (यांच्यावर ईश्वराची दया आणि कृपा असो) यांना लिहिणे-वाचणे अजिबात येत नसे आणि हे देखील एक ऐतिहासिक सत्य आहे की ते प्रेषित होईपर्यंत कोणत्याही धर्माचा कोणताही ग्रंथ त्यांच्यापर्यंत पोचला नव्हता. याशिवाय विचारणीय गोष्ट अशी आहे की अशा विद्या व ज्ञानशून्य देश व जातीत जन्म घेऊन व त्याच वातावरणात तरूण होऊन देखील त्यांनी इतक्या महान सार्वभौम व विश्वव्यापी धर्माचे प्रवर्तन केले. एका देशात एवढी मोठी क्रांती निर्माण केली, त्यांनी प्रवर्तित केलेल्या धर्माने जगातील सर्व देशांवर, सर्व जाती व सर्व सभ्यतांवर वेळोवेळी प्रभाव टाकला. भारतासारखा धर्म, संस्कृती, विद्या व ज्ञानाने परिपूर्ण व संपन्न देशदेखील इस्लामच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकला नाही आणि त्यांच्यानंतर आजतागायत कोणताही इतका महान धर्म-नेता जन्माला आला नाही. सर्व पैलूंचा विचार केल्यानंतर हे मान्य करणे भाग पडते की ते ईश्वराचे प्रेषित होते आणि त्यांचे ज्ञान हे ईश्वरीय ज्ञान होते.
अत्यंत तेजस्वी पुरूष एक ख्रिश्चन विद्वान मिस्टर मुहलर प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रेषित न मानणाऱ्या लोकांना प्रश्न करतो –
हे कसे शक्य आहे की एक धार्मिक ज्वाला जी जरी एका जंगलात प्रजवलित झाली होती, परंतु जिने इतक्या अल्पावधीत आश्चर्यजनक रीतीने संपूर्ण आशिया खंडात अग्नीचा डोंब उठविला, ती अशा हृदयातून निघालेली असेल ज्यात त्याची काहीही उष्णता अस्तित्वात नसेल? (एजाजुत्तंज्रील, पृ.121, बहव-ाला इन्सा्नलोपीडिया ब्रिटानिका- विषय : प्रेषित मुहम्मद (स) व त्यांचा धर्म).
असामान्य शक्ती – संपन्न मनुष्य
मिस्टर टॉम्स कार्यालय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर खोटे दोष लावणाऱ्या लोकांचा खरपूस समाचार घेताना लिहितो – होय, असे कदापि नाही, हा तीक्ष्ण दृष्टीचा मनुष्य जो जंगली देशात जन्मला होता, जो मनमोहक काळे डोळे व प्रफुल्ल, शिष्टतापूर्ण व विच-ारशील स्वभावाबरोबर आपल्या मनात मान-सन्मानाच्या इच्छेविरूद्ध काही अन्य विचार बाळगत होता, तो एक शांतिमय आणि असामान्य शक्तीशाली आत्मा होता आणि त्या लोकांपैकी होता जे सत्यवान असण्याशिवाय अन्य काही असूच शकत नाहीत. ज्याला स्वतः निसर्गाने खरा व सत्यप्रिय म्हणून जन्मास घातले होते. या काळात अन्य लोक अंधविश्वास व संस्काराचे पालन करीत होते आणि त्यावरच संतुष्ट होते. हा मनुष्य त्य विश्वास व संस्काराचे पालन करू शकत नव्हता व आपल्या आत्मा व पदार्थाच्या तथ्यांच्या ज्ञानाशिवाय तो अन्य लोकांपेक्षा भिन्न होता. जसे की मी वर्णन केले आहे की, सर्वशक्तीमानाचे रहस्य आपल्या प्रताप व सौंदर्यासह त्यावर प्रकट झाले होते आणि या तथ्यावर ज्याचे वर्णन करण्यास वाक्शक्ती असमर्थ आहे आणि ज्याने आपल्यासाठी ममी येथे आहेफ म्हणून प्रयोग केला. प्राचीन कथा त्यावर पडदा घालू शकल्या नाहीत आणि असले तस्य ज्यास एखादे पर्यायी श्रेष्ठतर शब्द न मिळाल्यामुळे आम्ही मसत्यफ नाव ठेवले आहे, ते वास्तविकतः ईश्वरी चिन्हांपैकी एक चिन्ह आहे. अशा माणसाचे कथन एक वाणी आहे जी एखाद्या संबंधाविना थेट ईश्वरी प्रकृतीच्या हृदयातून निघते, जी मानव ऐकतात आणि जी ऐकण्यासाठी व वस्तूंच्या तुलनेसाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे, कारण याच्या तुलनेत जे काही आहे तुच्छ आहे. सुरूवातीपासूनच त्याच्या हृदयात हजच्या प्रसंगी व दररोज इकडे-तिकडे भ्रमण करताना त्यांच्या मनात विभिन्न प्रकारचे हजारो विचार येत असत. उदाहरणार्थ – ममी काय आहे? लोक ज्याला जग म्हणतात व ज्यात मी रा-हतो ही अथांग गोष्ट काय आहे? जीवन काय आहे? मृत्यू काय आहे? मला कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे व काय केले पाहिजे? ज्याचे उत्तर (म्नकाच्या) हिरा व (सीरियाच्या) सीना पर्वताच्या मोठमोठ्या दगडांच्या ढिगाऱ्यांची व निर्मम निर्जन वाळवंटाने व जंगलाने काहीही दिले नाही आणि डोक्यावर गुपचूप प्रदक्षिणा घालणाऱ्या आकाशाने सुद्धा आपल्या निळा प्रकाश देणाऱ्या नक्षत्रांसह काहीही सांगितले नाही. परंतु, जरी कुणी सांगितले असेल तर केवळ त्यांच्याच आत्म्याने व ईश्वरी ज्ञानाने सांगितले जे त्याच्यात होते.
0 Comments