इस्लाममध्ये स्त्रीचे स्थायी अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्त्व पतीच्या व्यक्तिमत्त्वात विलीन होत नाही, अथवा ती आपल्या पतीची सेविका वा दासी बनत नाही.
पत्नीच्या बाबतीत कुरआनने म्हटले आहे,
“अल्लाहच्या संकेतांपैकी हे आहे की, त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा उत्पन्न केली. निश्चितच यात बरीच संकेताचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे चिंतन व मनन करतात.” (दिव्य कुरआन, 30 : 21)
आणखी एके ठिकाणी अल्लाहची आज्ञा आहे,
“पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहेत. या आधारावर की, अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व दिले आहे आणि या आधारावर की, पुरुष आपली संपत्ती खर्च करतात. मग ज्या प्रामाणिक स्त्रिया आहेत, त्या आज्ञाधारक असतात आणि पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाहच्या देखरेखीत व संरक्षणात त्यांच्या हक्कांचे रक्षण करतात.” (दिव्य कुरआन, 4 : 34)
कधीकधी माणसाला एखादी गोष्ट आवडत नसते, परंतु त्यात सद्वर्तनाचे अगणित पैलू असतात. स्त्रियांच्या बाबतीत कुरआन स्पष्टोक्ती आहे,
“त्यांच्याशी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा. जर त्या तुम्हाला नापसंत असतील तर शक्य आहे की, एखादी गोष्ट तुम्हाला पसंत नसेल परंतु अल्लाहने त्यांच्यातच बरेचसे भले ठेवले असेल.” (दिव्य कुरआन, 4 : 19)
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या एका साथीदांराने त्यांना पत्नीच्या अधिकारांच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले,
“जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तिलाही खायला द्या, जेव्हा तुम्ही वस्त्रे घ्याल तेव्हा तिलाही वस्त्रे द्या. (रागाच्या भरात) तिच्या तोंडावर मारू नका आणि तिला बरे-वाईट बोलू नका (तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास) तिला घरातून हाकलून न देता घरातच तिच्याशी अलिप्त राहा.” (हदीस : अबू दाऊद)
एका विशिष्ट प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आज्ञा केली,
“कोणत्याही ईशभक्ताने (मोमीन) कोणत्याही धर्मपरायण (मोमीना) पत्नीचा द्वेष करू नये. जर तिची एखादी सवय वाईट वाटत असेल तर दुसरी चांगली वाटेल.”
(हदीस : मुस्लिम)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
“”ईमानधारकांपैकी परिपूर्ण ईमानधारक तीच व्यक्ती आहे जिचा स्वभाव (वर्तणूक) चांगला असेल आणि तुमच्यापैकी उत्तम तोच आहे जो आपल्या पत्नींशी सत्यनिष्ठ आहे आणि चांगली वर्तणूक ठेवून आहे.” (हदीस)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एके ठिकाणी आणखी फर्माविले आहे,
“”हे विश्व जीवन व्यतीत करण्याचे साधन आहे आणि त्याचे सर्वांत उत्तम साधन सदाचारी पत्नी आहे.’ (हदीस : मुस्लिम)

0 Comments