Home A hadees A पतीचे अधिकार

पतीचे अधिकार

माननीय सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे एक महिला आली आणि आम्ही पैगंबरांजवळ बसलो होतो. `ती म्हणाली, ‘‘माझे पती सफवान बिन  मुत्तिल मला मारहाण करतात. जेव्हा मी नमाज अदा करीत असते आणि जेव्हा मी रोजा धारण करते तेव्हा मला रोजा मोडण्यास सांगतात आणि ते ‘फजर’ची (सूर्योदयापूर्वीची) नमाज  सूर्योदय होण्यापूर्वी अदा करीत नाहीत.’’ अबू सईद (रजि.) म्हणतात की सफवान तेथेच बसले होते. तेव्हा पैगंबरांनी सफवान यांना त्यांच्या पत्नीच्या तक्रारीबाबत विचारणा केली तेव्हा  त्यांनी उत्तर दिले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! नमाज अदा केल्यानंतर मारहाण करण्याच्या तक्रारीची हकीकत अशी आहे की ती दोन-दोन सूरहचे पठण करते आणि मी तिला तसे करण्यास  मनाई करतो.’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘एकच सूरह पुरेशी आहे.’’ सफवान पुन्हा म्हणाले, ‘‘रोजा मोडण्याच्या तक्रारीची हकीकत अशी की रोजा धारण करीत राहते आणि मी  तरूण मनुष्य आहे, संयम राखू शकत नाही.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘एखादी स्त्री आपल्या पतीच्या परवानगीशिवाय रोजा (ऐच्छिक) धारण करू शकत नाही.’’ त्यानंतर सफवान   म्हणाले, ‘‘सूयोदयानंतर नमाज अदा करण्याबाबत सांगायचे झाले तर आम्ही सूर्योदयापूर्वी झोपेतून न उठण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या घराण्याचे आहोत.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘हे सफवान!  जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा तुम्ही नमाज अदा करा.’’ (अबू दाऊद)

स्पष्टीकरण
(१) पतींना हा अधिकार नाही की त्यांनी आपल्या पत्नींना फर्ज (अनिवार्य) नमाज अदा करण्यापासून रोखावे. महिलेकरिता हे आवश्यक आहे की तिने पतीच्या इच्छांचा आदर करावा  आणि धर्मपरायणतेच्या उत्साहापोटी तिने मोठमोठ्या सूरहचे पठण करू नये. ऐच्छिक नमाजबाबत असे की तिने पतीच्या गरजांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पतीच्या  परवानगीशिवाय ऐच्छिक नमाज अदा करू नये. तसेच ऐच्छिक रोजादेखील पतीच्या परवानगीशिवाय ठेवू नये.
(२) सफवान बिन मुअतिल रात्रीच्या वेळी लोकांच्या शेतांमध्ये सिंचनाचे पाणी सोडण्याचे काम करीत होता. रात्रीचा अधिकांश भाग अशाप्रकारे कष्ट करण्यात जात असेल तर मनुष्याला  वेळेवर फजरच्या नमाजसाठी जाग येणे शक्य नाही. सफवान बिन मुअतिल उच्च दर्जाचे सहाबी (पैगंबर मुहम्मद स. यांचे अनुयायी – साथीदार) होते. त्यांच्या बाबतीत असे म्हणणे चुकीचे ठरेल की ते फजरच्या नमाजच्या बाबतीत निष्काळजीपणा करतील. असे योगायोगाने होत असेल की ते रात्री उशिरा झोपले असतील आणि कोणी त्यांना उठविले नसेल आणि  फजरची नमाज राहून गेली. ही परिस्थिती पाहून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे सफवान! जेव्हा तुम्ही झोपेतून जागे व्हाल तेव्हा फजरची नमाज अदा करा.’’ अन्यथा जर  पैगंबरांजवळ ते नमाजच्या बाबतीत निष्काळजीपणा व गफलत करणारे असते तर पैगंबर त्यांच्यावर नाराज झाले असते.

माननीय असमा बिन्ते यजीद यांच्या कथनानुसार, मी आपल्या काही समवयस्क मुलींसोबत बसले होते आणि आमच्या जवळून पैगंबर मुहम्मद (स.) गेले. पैगंबरांनी आम्हाला सलाम  केला आणि म्हणाले, ‘‘तुम्ही चांगला व्यवहार करणाऱ्या पतींच्या कृतघ्न बनू नका.’’ आणि मग म्हणाले, ‘‘तुम्हा महिलांपैकी काहींची अशी स्थिती असते की आपल्या आईवडिलांच्या घरी  दीर्घकाळपर्यंत कुमारिका राहतात, मग अल्लाह त्यांना पती देतो आणि त्यांना अपत्य होते, मग एखाद्या गोष्टीवरून त्यांना राग येतो आणि पतींना म्हणतात, मला तुझ्याकडून कधी  विश्रांती लाभली नाही, तू माझ्याशी कसलाही उपकार केलेला नाहीस.’’ (हदीस : अल अदबुल मुफरद)

स्पष्टीकरण
या हदीसमध्ये महिलांना कृतघ्नतेपासून वाचण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा रोग सर्वसाधारणपणे महिलांमध्येच आढळतो. म्हणून महिलांना त्यापासून अलिप्त राहण्याचा खूप प्रयत्न करायला हवा.

संबंधित पोस्ट
Febuary 2024 Rajab 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
29 18
30 19
31 20
1 21
2 22
3 23
4 24
5 25
6 26
7 27
8 28
9 29
10 30
11 Sha'ban 1
12 2
13 3
14 4
15 5
16 6
17 7
18 8
19 9
20 10
21 11
22 12
23 13
24 14
25 15
26 16
27 17
28 18
29 19
1 20
2 21
3 22

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *