Home A एकेश्वरवाद A निर्दोष शक्ती

निर्दोष शक्ती

जगाच्या प्रत्येक धर्मात ईश्वराची कल्पना आहे. उपासनेची कल्पना आहे. शुद्धतेचे काही समान असलेले प्रकार प्रत्येक धर्मात आढळतात. प्रत्येक धर्मात आपल्या मानलेल्या उपास्यांसमोर नमले जाते, मस्तक टेकले जाते, त्याच्याच नावे बळी दिला जातो, त्याच्याचसाठी उपाशी राहिले जाते, नजराणे दिले जातात. इस्लाम या सर्व प्रकारांना एका ईश्वरासाठी निश्चित करतो. तो म्हणतो “हे पर्वत, या नद्या, हे चंद्र, हा सूर्य, ही दूध देणारी जनावरे, हे चावणारे सर्प, विंचू, हे सर्व तुमच्यापेक्षा निम्नतर आहेत. त्यांना तुमच्या सेवेसाठी निर्मिले आहे. त्यांच्यापैकी कोणासमोर तुमचे हात पसरणे, तुमच्या प्रतिष्ठित मस्तकाचे नमणे; तुमच्या मस्तकाचा अपमान आहे, कृतघ्नता आहे, नीचपणा आहे, अनेकेश्वरत्व आहे. तुमच्यासमोर फरिश्त्यांना (देवदूतांना) नतमस्तक करविले गेले. तुमच्या प्रतिष्ठित मस्तकाला ही गोष्ट शोभा देते की, त्याने कुणासमोर कदापि नमू नये आणि आपल्या निर्मात्या व स्वामीसमोर अवश्य नमावे. जर तुम्ही पूर्ण एकाग्रतेने आपल्या एकमेव ईश्वर ज्याचा कोणीही सहभागी नाही. अशा अल्लाहच्या समोर नम्र राहाल तर त्याच अर्थाने स्वत:देखील अद्वितीय व्हाल.”
या दृष्टिकोनाने म्हणजे ईमान (श्रद्धा) व उपासनेच्या वर्तुळात मुस्लिमांची फार मोठी संख्या एकेश्वरत्वाच्या आवश्यकता पूर्ण करीत आहे. ते संतुष्ट आहेत आणि समजतात की, “आम्ही एकेश्वरत्वाच्या निकडी पूर्ण करीत आहोत.” तर खात्रीने या वर्तुळाच्या सीमेपर्यंत त्यांचा संतोष अगदी बरोबर आहे. यात कोणतीही मतभिन्नता नाही. निश्चितपणे या दृष्टिकोनाने म्हणजे श्रद्धा व उपासनेत ते एकेश्वरत्वाच्या निकडी श्रद्धापूर्वक पूर्ण करीत आहेत. वाणीने व कृतीनेसुद्धा. परंतु जसे प्रारंभीच सांगितले आहे मानवाच्या अस्तित्वाचा आणखी एक दृष्टिकोन आहे.
मानव हा एका समुदायाचा अंश, एक सामाजिक अस्तित्व आहे. तो एकटा जन्माला तर आला आहे; परंतु एकटा राहत नाही आणि राहूही शकत नाही. जेथे एकाचे दोन झाले की समाजरचना सुरू झाली आणि सामूहिकतेच्या निकडीसमोर येऊ लागल्या. आपापसातील प्रेम, दयाभाव, समदुःखीभाव, ऐक्य व प्रेम, सहानुभूती व दुःख, विमोचन, त्याग व निष्ठा, यासारखे गुण एका चारित्र्यसंपन्न समाजासाठी आवश्यक व उत्तम गोष्टी होत. परंतु आणखी एक गोष्ट सामूहिकतेसाठी आवश्यक आहे आणि ती म्हणजे अत्याचार! मानवाची खुद्द आपली सामूहिक आवश्यकता आहे की, एखादी शक्ती अशी असावी जिने मानवाच्या हक्क व सीमांची निश्चिती करावी आणि त्यांना सामर्थ्य व शक्तीनिशी ठरवलेल्या सीमांचे पालन करणारे ठेवावे. जर अशी एखादी शक्ती विद्यमान नसेल तर मानवाचा अजाणपणा, त्याची इच्छा आणि त्याचा स्वार्थ दुसऱ्यांच्या सीमेवर अतिक्रमण करील. जी व्यक्ती तुलनेने अधिक शक्तिमान असेल ती विनावेसणीच्या बैलाप्रमाणे ज्या हिरव्या शेतात इच्छिल त्यात तो घुसेल आणि त्याला रोखणारा कुणीच असणार नाही. लोकांची न अब्रू सुरक्षित राहील, न प्राण न वित्त, यालाच अराजकता असे म्हणतात. इतिहासात एखादासुद्धा दिवस असा आढळत नाही की, एखादा मानवी समाज अशा अराजकतेच्या अवस्थेत राहिला असेल. प्रत्येक काळात सुसंस्कृत मनुष्य कोणा न कोणा शक्तीच्या आधीन राहिलेला आहे. कोणती न कोणती शासक शक्ती त्याला सामर्थ्य व शक्तीनिशी ठरलेल्या सीमेच्या बंधनांत ठेवणारी राहिली आहे. मग ती शासक शक्ती एखाद्या मानवी समाजातून वर आलेली असो अथवा कुठून बाहेरून येऊन आच्छादली असो. यापेक्षा वेगळी स्थिती अर्थात अराजकता अव्यवहार्यच नव्हे तर अकल्पनीय आहे. साम्यवादी तत्त्वज्ञानात अवश्य एका अशा स्थितीचे स्वप्न पाहिले अथवा दाखविले गेले आहे की, जेव्हा शक्तीने आर्थिक समानता आणली जाईल तेव्हा मानवी मूल्ये बदलतील आणि स्वार्थ व चुकीच्या इच्छांना मूठमाती मिळेल. त्यानंतर मनुष्याला याची गरज भासणार नाही, की एखाद्या शक्तीने त्याला बळजबरीने आपल्या सीमेत ठेवावे आणि ही शक्ती जिचे दुसरे नाव शासन आहे, वाळलेल्या पानाप्रमाणे गळून पडेल. परंत ही एक काल्पनिक गोष्ट आहे व मी या अर्थाने तिला साम्यवादी तत्त्वज्ञान म्हटले आहे की ही कल्पना जगतातील एक कल्पनेची भरारी आहे. व्यावहारिक जगताशी याचा काडीमात्र संबंध नाही. एवढेच नव्हे, तर साम्यवादी व्यवस्थेने तर आणखीनच ही गोष्ट स्पष्ट केली आहे की, मनात स्वत: आपल्या नैसर्गिकतेच्या दृष्टीने या गोष्टीचा मोताद आहे की, त्याचे एखादे आश्रय स्थान असावे, ज्याप्रमाणे स्त्रीच्या नैसर्गिकतेची गरज आहे की तिला एक छत्रछाया असावी, एक पांघरून असावे की, ज्याच्या छायेत राहून तिने शांतता प्राप्त करावी. याच झाकणाला ‘पती’ म्हणून संबोधतात. अगदी याचप्रमाणे मानवी समाजाची आवश्यकता, त्याच्या स्वभावाला एका पतीची आवश्यकता आहे, ज्याच्या छायेत त्याने निश्चिंत होऊन राहावे, ज्याचे आज्ञापालन करावे. एवढेच नव्हे तर महिलांमध्ये अशी उदाहरणे सापडतात की, एखाद्या मागासलेल्या अथवा प्रगत महिलेने कोणत्या न कोणत्या प्रकारे आपले संपूर्ण आयुष्य पतिविना व्यतीत करावे. परंतु मानवी समाज एखाद्या शासक शक्तीविना एक दिवससुद्धा जीवित राहू शकत नाही. असे एखादे उदाहरण वर्तमान काळात मिळत नाही, न इतिहासात, न मानवी बुद्धी अशा स्थितीची कल्पना करू शकते. मानवी समूहाची ही आवश्यकता विविध काळांत आणि विविध प्रदेशांत विविध पद्धतींनी पूर्ण होत राहिली आहे.
संबंधित पोस्ट
Febuary 2024 Rajab 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
29 18
30 19
31 20
1 21
2 22
3 23
4 24
5 25
6 26
7 27
8 28
9 29
10 30
11 Sha'ban 1
12 2
13 3
14 4
15 5
16 6
17 7
18 8
19 9
20 10
21 11
22 12
23 13
24 14
25 15
26 16
27 17
28 18
29 19
1 20
2 21
3 22

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *