माननीय जुंदुब बिन सुफियान (रजि.) यांचे कथन आहे.
कोणत्यातरी युद्धात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या करंगळीला दुखापत झाली आणि रक्त वाहू लागले तेव्हा आपल्या करंगळीला उद्देशून ते म्हणाले, ‘‘तू तर एक रक्तरंजित करंगळी आहेस. तुला जी दुखापत झाली आहे ती ईशमार्गात झालेली आहे.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण
म्हणजे हा त्रास जो ईशमार्गात झाला आहे त्यावर मी खेद व्यक्त का करावा?ईशमार्गात प्राणसुद्धा पणाला लावले जाऊ शकते. ईशमार्गावर मार्गस्थच्या मार्गाला संकट रोखू शकत नाही आणि ईशमार्गावर मार्गस्थ या मार्गात होणाऱ्या कष्टांविषयी दुसऱ्याकडे तक्रारसुद्धा करीत नाहीत.
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांचे कथन आहे.
मी जणूकाही अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना एका पैगंबरांचा वृत्तान्त सांगताना पाहात आहे, ज्यांची त्यांच्या लोकसमुदायाने हत्या केली होती. ते आपल्या मुखावरील रक्त साफ करत होते आणि सांगत होते, ‘‘हे अल्लाह! तू माझ्या देशबांधवांना क्षमा कर कारण त्यांना माहीत नाही की ते काय करीत आहेत.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण
खरेतर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या स्वत:चा हाच वृत्तान्त आहे. लोकांनी त्यांना ताईफ शहरात सत्य आवाहन करताना आणि उहुद युद्धाप्रसंगी जखमी केले होते. परंतु पैगंबरांनी त्या वेळी असामान्य धैर्याने काम घेतले होते. पर्वताच्या ईशदूताने जेव्हा पैगंबरांना विचारले, ‘‘तुम्ही इच्छिले तर ताईफ शहराच्या बाजूचे दोन्ही पर्वत या वस्तीवर उलटून देऊ?’’ (म्हणजे वस्तीतील सर्व लोक चिरडून मरतील.)
तेव्हा पैगंबरांनी सांगितले, ‘‘नाही! मला आशा आहे की या लोकांच्या संततीत असे लोक जन्माला येतील जे एक ईश्वराची पूजा करतील आणि एकेश्वरत्वात दुसऱ्या कोणालाही भागीदार करणार नाहीत.’’
(हदीस : मुस्लिम, बुखारी, नसई) शारीरिक कष्टाव्यतिरिक्त पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मानसिक त्राससुद्धा सहन केला आहे. एकदा पैगंबरांना सूचना प्राप्त झाली की एक मनुष्य सांगत आहे की संपत्तीवाटपात पैगंबरांनी ईशभय व अंतिम दिनाला दृष्टीसमोर ठेवले नाही,
तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहची कृपा मूसा (अ.) यांच्यावर होवो, त्यांना यापेक्षासुद्धा जास्त त्रास दिला गेला आणि त्यांनी संयम बाळगला होता.’’ (हदीस : मुसनद अहमद, तिर्मिजी, अबू दाऊद)
0 Comments