भाषांतर – सय्यद ज़ाकिर अली
एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात ‘ईदुल अजहा’ म्हणजेच ‘बकरईद’च्या प्रसंगी करण्यात येणारी ‘कुरबानी’ (अर्थात पशुबळी) च्या सार्थकता आमि औचित्यासंबंध निर्माण झालेला अथवा करण्यात आलेला आहे. आपल्या मुस्लिमेतर बांधवांच्या मनात याविषयी असा प्रश्न निर्माण झालेला आहे की,
“ज्याअर्थी इस्लामने दया आणि प्रेमभावाची शिकवण दिली, त्याअर्थी मुक्या प्राण्यांवर निर्दयतेचा सुरा का ठेवण्यात येतो? ज्याअर्थी इस्लामने आपल्या अनुयायांना प्रत्येक कार्य ‘असीम दयावान व कृपावान अल्लाह’चे नाव घेऊनच सुरुवात करण्याची शिकवण दिली, त्याअर्थी मुक्या आणि निरपराध प्राण्यांचा निष्ठूरपणे वध करण्याची परवानगी कसापोटी दिली? ज्याअर्थी स्वयं कुरआनानेच आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना अशी उपाधी दिली की ते समस्त सृष्टीकरिता साक्षात दया व कृपा आहेत, तर या
सृष्टीतील निष्पाप मुके पशुपक्षी दया व कृपा असलेल्या पैगंबरांच्या दया व कृपेला पात्र नाहीत काय? कारण स्वत: प्रेषितांनीच याची परवानगी दिली आणि स्वत:देखील कुरबानी केली. एवढेच नव्हे तर ‘बकरईद’च्या महत्त्वपूर्ण सणाला अल्लाह आणि प्रेषित __मुहम्मद (स.) यांनी प्राण्यांच्या कुरबानीस (पशुबळीस) धार्मिक मान्यता देऊन टाकली. अल्लाहचे नाव घेऊन करण्यात येणारे कोणतेही वाईट कर्म हे चांगले कर्म ठरते काय?”
अशा प्रकारचे प्रश्न अथवा गैरसमज आपल्या देशबांधवांना त्रस्त करून सोडतात. त्यांचा मुस्लिम समुदायावर या गोष्टीचा पूर्ण अधिकार आहे की त्यांच्या शंका-कुशंका आणि गैरसमज दूर करण्याचा मुस्लिम समुदायाने पूर्ण प्रयत्न करावा. ही छोटीशी पुस्तिका याच अधिकारपूर्तीचा एक बाग आहे. शिवाय वाचकांचेसुद्धा हे कर्तव्य आहे की ही पुस्तिका पूर्वग्रहरहित होऊन वाचावी.
आयएमपीटी अ.क्र. 27 पृष्ठे – 15 मूल्य – 06 आवृत्ती – Oct. 2010
0 Comments