नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)-
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मानवतेअंतर्गत आपल्या विभिन्न कामांत जनसेवेला प्राधान्य दिले होते. त्याचप्रमाणे जमा़अत ए इस्लामी हिंद ईशग्रंथ पवित्र कुरआन आणि अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीनुसार कार्य करत आहे. जनसेवा हे कार्य असे आहे जसे की रात्रभर ईश्वराची (अल्लाहची) उपासना करणे, असे विचार ऱफी़कुर्रहमान खान यांनी टेकाच्या सिद्धार्थनगर येथील मोठी मस्जिदजवळ संघटनेच्या कार्यालयात मोफत मेडिकल कॅम्पच्या उद्घाटन समारंभात सादर केले.
हे मोफत आरोग्य शिबीर जमा़अत ए इस्लामी हिंद नॉर्थ, मेडिकल सर्विस सोसायटी ऑ़फ इंडिया शाखा नागपूर, नागपूर महानगरपालिका तसेच क्रिसेंट हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. रफीकुर्रहमान पुढे म्हणाले की इस्लामवरील आरोपांद्वारा दहशतवादाचे नाव दिले जाते, जे अगदी चुकीचे आहे. इस्लाममधे मानवतेशी संबंधित जनसेवा आणि त्यात जीवन जगण्याची पद्धती सांगितली आहे. इस्लाममधे उपासनाच नाही तर जनसेवेला सर्वश्रेष्ठ कार्य सांगितले आहे.
मेडिकल सर्विस सोसायटी आफ इंडिया (एम एस एस) नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. नईम निया़जी यांनी आपल्या संघटनेचा परिचय करून दिला. त्यांनी सांगितले की एम एस एस विभिन्न शासकीय योजना अंतर्गत निर्धनांचे उपचार तसेच हृदय ऑपरेशन करवीत आहे. आज या शिबिरात छावनीच्या ईवर फी़जियो थेरपीच्या टीममधे सर्वेश मालू, आषुतोष, महवश सय्यद यांनी संबंधित रुग्णांची फी़जियो थैरेपी केली. ते पुढे म्हणाले, या शिबिरामध्ये ७० रुग्णांची ईसीजी, १०० रुग्णांची शुगर तपासणी व ३० रुग्णांचे एक्स रे काढण्यात आले आणि रुग्णांना मोफत औषधेही वितरित केली गेली. या शिबिरात २०० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला. संचालन शह़जाद नवैद यांनी केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नागपूर महानगरपालिका हेल्थ केअरचे सूर्यदीप आणि इंदिरा अवलकर, क्रीसेंट हॉस्पिटलचे डॉ. हसनुल बन्ना, सलीम का़जी, जुबैर अहमद व श़गु़फ्ता जुबैर त्याचबरोबर जेआईएच नॉर्थचे अध्यक्ष इरशादुर्रहमान खान, फार्मासिस्टच्या टीममधे शाबा़ज अंसारी, मोहसिन अंसारी, वसीम अंसारी व उवैस अंसारी समाजसेवक का़जी शफी़क अहमद आदींचे महत्वपूर्ण योगदान लाभले.
0 Comments