शंका : कुरआनच्या कथनात परस्पर अंतर-विरोध अथवा विरोधाभास आढळतो. परंतु कुरआन तर असे आवाहन करतो की त्यात विरोधा-भास नाही.
कुरआन एक संतुलित आणि सामंजस्यपूर्ण ग्रंथ आहे. यातील कथन आणि वक्तव्यात विसंगती नाही. हा एक असा असाधारण गुण आहे जो अन्यत्र मिळणार नाही. मुख्य रूपाने बहुविध ज्ञानव्यापक नियम-व्यवस्थेत ग्रंथात चुका अनिर्वाय असतात. कुरआन विभिन्न परिस्थितीत थोडा थोडा करून २३ वर्षाच्या कालावधीत अवतरित झाला आहे. अशा स्थितीत यात अगणित विरोधाभास आणि नियमांची भिन्नता असली पाहिजे. परंतु तसे नाही, कुरआनची एक कडी दुसऱ्या कडीसोबत याप्रकारे गुंतलेली आहे की नियम व कायदा याप्रकारे एक-दुसऱ्याबरोबर परस्पर समन्वय साधून आहेत. सामंजस्यरूप धारण केले आहे, जसे एखाद्या मशीन व यंत्राचे भाग एकमेकांत गुंतलेले असून कार्यरत आहेत. कुरआन आपल्या या गुणाचे वर्णन याप्रकारे करीत आहे,
“काय हे लोक कुरआनवर विचार करीत नाही? जर हे अल्लाहशिवाय अन्य कोणाकडून असते तर यांत पुष्कळसा विसंवाद आढळला असता.”
(दिव्य कुरआन – ४ : ८२)
कुरआनद्वारा स्थापित मानदंड हा कायमस्वरूपी मानदंड आहे. त्यात कसलाही आंतर्विरोध कुरआनच्या वर्णनात उत्पन्न होत नाही. परंतु विविध प्रसंग व वस्तूचे विवरण क्रमांक बदलल्याने जो प्रभाव वाढविण्यासाठी विशेष हेतुने केलेला आहे, काही विशिष्ट परिस्थितीत सामान्य नियम टाळून काही आदेश दिले गेले आहेत, त्यांना विरोधाभास अथवा आंतर्विरोध म्हणता येणार नाही. जगाच्या प्रत्येक कायद्यात आणि व्यवस्थेत `अपवाद’चे स्थान आहेच. भाषेच्या नियमांतसुद्धा `अपवाद’ पाहायला मिळतो. ही लवचिकता आणि सरलतेचे द्योतक आहे. असे जर नसेल तर कठोरतेचे व विविधतेचे स्वरूप प्राप्त होईल. आंतर्विरोध त्या वेळेला झाला असता जेव्हा त्याचा एक नियम दुसऱ्या नियमाला लागू पडण्यात अडचण आली असती. आंतर्विरोध नसण्याचा अर्थ असा की उद्देश आणि मौलिक नियमांत उलटफेर व्हायला नको. असे कुरआनमध्ये कोठेही आढळत नाही की, एक नियम दुसऱ्या नियमाला निष्क्रिय आणि अप्रभावी बनवेल. एका गोष्टीला सत्य ठरवून त्याच गोष्टीला दुसऱ्या ठिकाणी खोटे ठरवून देईल, असे कदापि शक्य नाही.
कुरआनात नमुद केले आहे,
“त्या दिवशी कोणत्याही मानव आणि जिन्नला त्याचा गुन्हा विचारण्याची गरज भासणार नाही.” (दिव्य कुरआन – ५५ : ३९)
याच्या विरुद्ध बऱ्याच ठिकाणी कुरआन ने नमुद केले आहे.
“तर शपथ आहे तुझ्या पालनकर्त्याची आम्ही जरूर त्या सर्वांना विचारू की तुम्ही काय करीत होतात.” (दिव्य कुरआन – १५ : ९२-९३)
आणि याचप्रमाणे,
“आणि थोडे थांबवा यांना काही विचारावयाचे आहे यांना.” (दिव्य कुरआन – ३७ : २४)
येथे पहिल्या `आयती’मध्ये प्रलय दिनी अपराध्याला विचारण्याचा नकार दिला आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या `आयती’त विचारपूस करण्याची गोष्ट सांगितली आहे. या दोन्ही बाबतीत विरोध दिसून येत आहे.
याचे समाधान असे होते की जेथे जेथे या `आयती’ आल्या आहेत त्यावेळेच्या प्रसंगाबाबत व त्याच्या मागे-पुढे घडलेल्या प्रसंगाबाबत पूर्ण गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे. अभ्यास केल्यानंतर तथ्य समोर येते आणि जाणवणाऱ्याचा विरोध संपुष्टात येतो.
एक समाधान हेच की दोन वेगवेगळ्या प्रसंगी ही गोष्ट सांगितलेली आहे. अपराध्याची चौकशी केल्यानंतर, त्याच्या कर्माचे रेकॉर्ड दाखविल्यानंतर स्पष्ट केले जाईल. मग नंतर त्याला नरकाकडे घेऊन जाताना तो काही विनंती, विनवणी करेल तर त्यावेळी त्याच्या विनवणीवर चौकशी होणार नाही. जसे पुढे कुरआनात नमूद केले आहे,
“गुन्हेगार तेथे आपल्या चेहऱ्यावरून ओळखून घेतले जातील आणि त्यांना कपाळाचे केस आणि पाय धरून फरफटले जाईल.” (दिव्य कुरआन – ५५ : ४१)
त्यांचे चेहरे स्वत:च साक्ष देतील की ते अपराधी आहेत, तसेच त्यांच्या कर्माची नोंदही त्यांना अपराधी सिद्ध करीत आहे. आता मात्र त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्याची गरज नाही. त्यांना आता फरफटत यातनागृहात नेण्यात येत आहे.
दुसरे समाधान असे की विचारल्यावर ते नकार देतील तेव्हा तर अल्लाहच्या विशाल ज्ञानापुढे त्यांचा अपराध सिद्ध झाला असेल. त्याला पुन्हा विचारण्याची गरज नाही. जर विचारणा झालीच तर अपराधींना त्यांच्या अपराधाला स्पष्ट करण्याच्या हेतूने विचारले जाईल. जगात असताना तर `हिशेबाचा दिवस’ ते अमान्य करीत. आता स्वत: पाहिला ना तो दिवस! या फटकाऱ्याने त्या अपराधींच्या यातनेत वाढ होईल. जसे वरील आयतीत आपण पाहिले आहे.
पवित्र कुरआनात एका ठिकाणी म्हटले आहे,
“हे पैगंबर (स.) यांना सांगा, काय तुम्ही त्या ईश्वराशी कुप्रâ (द्रोह) करता आणि दुसऱ्यांना त्याचा तुल्यबळ ठरविता ज्याने पृथ्वीला दोन दिवसात बनवून टाकले? तोच तर सर्व जगवासियांचा पालनवर्ता आहे. त्याने (पृथ्वीला अस्तित्त्वांत आणल्या नंतर) वरून तिच्यावर पर्वत रोवले आणि तिच्यांत समृद्धी ठेवली आणि तिच्यांत सर्व मागणाऱ्यांसाठी प्रत्येकाच्या मागणी व गरजेप्रमाणे योग्य अंदाजाने अन्नधान्याची साधने उपलब्ध करून दिली. ही सर्व कामे चार दिवसांत उरकली. मग त्याने आकाशाकडे लक्ष दिले, जे त्यावेळी धुरासमान होते. तेव्हा त्याने दोन दिवसांत आकाश बनवून टाकले.” (दिव्य कुरआन – ४१ : ९-१२)
कुरआनात अन्य सात ठिकाणी (७:५४, १०:३, ११:७, २५:५९, ३२:४, ५०:३८) असे दाखविले आहे की पृथ्वी, आकाश आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे, त्यांची निर्मिती सहा दिवसांत पूर्ण झाली. परंतु वरील `आयातीत’ पृथ्वी दोन दिवसांत, पृथ्वी वरील जीवजंतू, पर्वत इत्यादी चार दिवसांत, नंतर आकाश दोन दिवसांत बनविले. या प्रकारे सृष्टीच्या निर्मितीत आठ दिवस लागले. या गोष्टींत काही मेळ बसत नाही.
दुसरी शंका ही की धरतीची निर्मिती आकाशापूर्वी दाखविली आहे. कुरआन ७९:३० मध्ये आकाश निर्मितीनंतर पृथ्वीनिर्माण, पसरविणे, अंथरण्याची गोष्टसांगितली आहे. या दोन्ही गोष्टींत विरोधाभास जाणवतो.
शंकेचे निरसन :
या दोन प्रकारच्या शंकांचे निरसन याप्रकारे आहे. वरील `आयतीत’ पृथ्वीच्या निर्माणाचे सविस्तर वर्णन आहे. नंतर संक्षिप्त रूपाने पुनरुक्ती आहे. दोन दिवसांत पृथ्वीrच्या निर्मितीनंतर पर्वत, वनस्पती, जीव-जंतू इत्यादींच्या निर्मितीसाठी अतिरिक्त दोन दिवस लागले. एवूâण चार दिवस झाले. पृथ्वीच्या निर्मितीनंतर जीव-जंतूसाठी चार दिवस नाही लागले. मग दोन दिवसांत आकाशाची निर्मिती या प्रकारे एवूâण चार अधिक दोन असे सहा दिवस झाले.
येथे दिवसाचा अर्थ एक दीर्घकाळ, जसे कुरआनमध्ये स्पष्ट केले आहे ,
“ एक अशा दिवसात ज्याचे प्रमाण तुमच्या गणनेनुसार एक हजार वर्ष आहे.” (दिव्य कुरआन ,३२:५)
पृथ्वीrची निर्मिती व आकाश निर्मिती यात पहिले काय? याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. दोन्ही कथनांप्रमाणे असे प्रतीत होते की दोन्हींचे निर्माणकार्य एकत्रित झाले आहे. काही निर्मिती आकाशची व काही निर्मिती धरतीची. जेव्हा एकाच्या निर्मितीची चर्चा सुरू असताना असा अर्थ नाही की दुसरी निर्मिती पूर्ण झाली आहे. जेव्हा कोणी आपले घरकाम सुरू करतो तर जमिनीवर, भिंतीवर, छतावर प्रत्येक भागात थोडे थोडे काम मागे पुढे सुरू राहते, जेवढे निर्माणासाठी जरूरीचे आहे. यावरून निर्माणकार्याची कल्पना केली जाऊ शकते.
एक दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की मागे-पुढे वर्णन करण्याचा अर्थ असा की निर्माणकार्याकडे लक्ष वेधणे होय. काळाच्या दृष्टिकोनातून पहिले वर्णन केलेले निर्माणकार्य पहिले असेल असे नाही.
एका व्यक्तीने स्वत:चे घर उभारले. नंतर त्याने बंगला बांधला. त्यानंतर विहीर खणली. एका मित्राला आपल्या निर्माणकार्याचा परिचय करून देताना म्हणतो, हे मित्रा!ही पाहा विहीर, तो पाहा बंगला ज्याचे बांधकाम मी करून घेतले आणि ते पाहा एक मोठे घर जे मी माझ्या मिळकतीने उभारले. कोणाचेही सहाय्य लाभलेले नाही.
या वर्णाने त्याचा हेतू फक्त हाच की मोठमोठाली कामे एक-एक करून तुमच्या समोर मांडली. इथे त्याचा हेतू असा नाही की पहिले कोणते काम केले व नंतर काय केले. पुन्हा मी घर बनविले. याचा अर्थ असा नाही की यापूर्वी वर्णन केलेल्या वस्तूचे निर्माण केल्यानंतर घर बनविले. इथे `पुन्हा’ने तात्पर्य असे की “नंतर हेही” याचप्रकारे कुरआनमध्ये धरतीनंतर आकाशनिर्मितीचा उल्लेख आहे, पण त्याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे धरतीची निर्मिती अल्लाहने केली आहे. त्याचप्रकारे आकाशाची निर्मितीही अल्लाहने एकटेच केली आहे.
एक असेही मत आहे की, “आकाशाच्या निर्मितीनंतर धरतीला अंथरणे”चे वर्णन (कुरआन ७९:३०) प्रमाणे असे सिद्ध होत नाही की धरतीच्या निर्मितीचे वर्णन आहे. धरती फार पूर्वी तयार झाली. नंतर हजारों वर्षानंतर पर्वत, समुद्र व सपाटीकरण झाले. धरतीच्या `अंथरूणा’चा अर्थ असा की भूतल जीवांसाठी उपयोगी होणे होय. म्हणून निर्माणकार्य नंतरचे असे म्हणता येणार नाही.
समाधानासाठी विवरण हे असंभव नाही. म्हणून `आयती’मध्ये विरोध मानणे आवश्यक नाही.
0 Comments