हुमेरा आणि सिद्दीका यांची उपाधी उम्मे अब्दुल्लाह. अब्दुल्लाहची आई आएशा (रजि.) होती. या कुरैश खानदानातील बनू तैइम या कबिल्यातील होत्या. आईचे नाव उम्मे रुमान बिन्ते आमीर (रजि.) होते. त्या एक महान माननीय साहबीया होत्या. पैगंबरांना पैगंबरी मिळून चार वर्षे झाली, तेव्हा शव्वाल महिन्यात त्या जन्मल्या होत्या. माननीय आएशा (रजि.) यांचे बालपण माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) यांच्या छत्रछायेत गेले. त्या लहानपणापासूनच बुद्धिमान व चाणाक्ष होत्या. बालपणीची प्रत्येक गोष्ट त्यांना आठवत होती. तेवढी स्मरणशक्ती इतर साहबी साहबीयांची नव्हती.
पैगंबरांशी विवाह होण्यापूर्वी माननीय आएशा (रजि.) यांचे लग्न जूबेर बिन मतआम यांच्या मुलाशी ठरले होते. परंतु त्या मुलाच्या आजीच्या सांगण्यावरुन हा विवाह जुबेरने मोडला. कारण माननीय अबू बकर (रजि.) यांचे सर्व कुटुंबीय मुस्लिम झाले होते. खुला बिन्ते हकीम (रजि.) यांनी पैगंबरासाठी आएशा (रजि.) यांना विवाह करण्याबाबत संदेश दिला. अबू बकर (रजि.) यांनी आश्चर्याने विचारले, “मी त्यांचा मानलेला भाऊ आहे. भावाच्या मुलीबरोबर लग्न होऊ शकते काय?” पैगंबरांना (स.) येऊन खुला (रजि.) ने विचारले असता पैगंबर म्हणाले, “अबू बकर (रजि.) माझे धर्मबंधु आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलीशी विवाह होऊ शकतो.” ऐवूâन अबू बकर (रजि.) खूश झाले. आपली मुलगी पैगंबरांची पत्नी होणार याचा त्यांना आनंद झाला. हा विवाह पार पडला. पाचशे दिरहम महर देऊन अबू बकर (रजि.) यांनी स्वत:च निकाह पढवून हा विवाह संपन्न केला.
एकदा अरबस्तानात शव्वाल महिन्यात प्लेग पसरला व त्याने वस्त्या उजाड झाल्या होत्या. माननीय आएशा (रजि.) यांचा विवाह याच महिन्यात झाला व काही वर्षांनंतर याच महिन्यात सासरी त्यांची पाठवणी केली गेली. तेव्हापासून या महिन्याला अशुभ समजणे बंद झाले. माननीय आएशा (रजि.) यांच्याशी विवाहाची शुभवार्ता पैगंबर (स.) यांना स्वप्नात दिली गेली होती. स्वप्नात त्यांनी पाहिले की एकजण रेशमी कपडात गुंडाळलेली एक वस्तु पैगंबरांना दाखवीत म्हणाला, “ही वस्तु तुमची आहे.” पैगंबर (स.) यांनी ती उघडली तर त्यात माननीय आएशा (रजि.) यांचा चेहरा दिसला. हा विवाह अत्यंत साधेपणाने झाला. त्या म्हणत, “मी मैत्रिणीबरोबर खेळत होते तेव्हा माझ्या आईने घराबाहेर जाण्यास प्रतिबंध करेपर्यंत मला त्या विवाहाची काहीच कल्पना नव्हती.” जेव्हा त्या जन्मल्या तेव्हा आई-वडील मुस्लिम होते. त्यामुळे त्याच्या जन्मापासूनच इतर धर्माचे संस्कार त्यांना मिळाले नाहीत.
0 Comments