Home A प्रेषित A इस्लामच्या प्रेषितांची वास्तविकता

इस्लामच्या प्रेषितांची वास्तविकता

Kabah Sharif
मुस्लिम तर प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी आहेतच. ते त्यांना महानतम व अंतिम ईशदूत मानतात. आणि ते त्यांच्या प्रत्येक वचन, प्रत्येक कार्य व प्रत्येक शिकवणीवर पूर्ण विश्वास ठेवतात. त्यांनी प्रेषितांवर (ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर) कितीही श्रद्धा ठेवली व त्यांची कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे. मुस्लिमेतर विद्वान प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासंबंधी काय म्हणतात?
या शृंखलेत केवळ भारत व युरोपातील मुस्लिमेतर विद्वानांची मते व त्यांचे कथन एकत्रित केलेले आहे.

प्रत्येक विषयाच्या मुळाशी पोचण्याची नैसर्गिक प्रवृत्ती ‘इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’च्या रचनाकारांनी लिहिले आहे –
“प्रेषित मुहम्मद (स.) जरी पूर्णपणे अशिक्षित होते व अरबी भाषेच्या काव्यकलेपासून इतके अनभिज्ञ होते की कोणत्या न कोणत्या त्रुटिशिवाय एक शेर (काव्याच्या दोन ओळी) देखील ते सांगू शकत नव्हते. तरीसुद्धा स्वभावतः प्रत्येक विषयाच्या मुळापर्यंत पोचण्याची त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती होती. या गोष्टीचा संकेत देताना पवित्र- कुरआनच्या एका सुप्रसिद्ध सूरह (पवित्र कुरआनचे एक प्रकरण) मध्ये त्यांना संबोधून असे म्हटले गेले आहे –
“प्रेषित महम्मद (स.) यांना काव्य-विद्या प्रदान करण्यात आली नसून त्यांनी कवी असणेदेखील आवश्यक नाही.”
ही गोष्ट सर्वसिद्ध आहे की प्रेषित मुहम्मद (स.) (यांच्यावर ईश्वराची दया आणि कृपा असो) यांना लिहिणे-वाचणे अजिबात येत नसे आणि हेदेखील एक ऐतिहासिक सत्य आहे की ते प्रेषित होईपर्यंत कोणत्याही धर्माचा कोणताही ग्रंथ त्यांच्यापर्यंत पोचला नव्हता. याशिवाय विचारणीय गोष्ट अशी आहे की अशा विद्या व ज्ञानशून्य देश व जातीत जन्म घेऊन व त्याच वातावरणात तरूण होऊनदेखील त्यांनी इतक्या महान सार्वभौम व विश्वव्यापी धर्माचे प्रवर्तन केले. एका देशात एवढी मोठी क्रांती निर्माण केली. त्यांनी प्रवर्तीत केलेल्या धर्माने जगातील सर्व देशांवर. सर्व जाती व सर्व सभ्यतांवर वेळोवेळी प्रभाव टाकला. भारतासारखा धर्म, संस्कृती, विद्या व ज्ञानाने परिपूर्ण व संपन्न देशदेखील इस्लामच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकला नाही आणि त्यांच्यानंतर आजतागायत कोणताही इतका महान धर्म-नेता जन्माला आला नाही. सर्व पैलूंचा विचार केल्यानंतर हे मान्य करणे भाग पडते की ते ईश्वराचे प्रेषित होते आणि त्यांचे ज्ञान हे ईशज्ञान होते.”
अत्यंत तेजस्वी पुरुष एक ख्रिश्चन विद्वान मिस्टर मुल्लर प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रेषित न मानणाऱ्या लोकांना प्रश्न करतो –
“हे कसे शक्य आहे की एक धार्मिक ज्वाला जी जरी एका जंगलात प्रज्वलित झाली होती, परंतु जिने इतक्या अल्पावधीत आश्चर्यजनक रीतीने संपूर्ण आशिया खंडात अग्नीचा डोंब उठविला, ती अशा हृदयातून निघालेली असेल ज्यात त्याची काहीही उष्णता अस्तित्वात नसेल?” 

– (एजाजुत्तंजील, पृ.१२४, बहवाला ‘इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका – विषय : प्रेषित मुहम्मद (स.) व त्यांचा धर्म)
संबंधित पोस्ट
Febuary 2024 Rajab 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
29 18
30 19
31 20
1 21
2 22
3 23
4 24
5 25
6 26
7 27
8 28
9 29
10 30
11 Sha'ban 1
12 2
13 3
14 4
15 5
16 6
17 7
18 8
19 9
20 10
21 11
22 12
23 13
24 14
25 15
26 16
27 17
28 18
29 19
1 20
2 21
3 22

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *