इस्लामने आवश्यकतेपेक्षा अधिक धन जमा करण्यास निषिद्ध ठरविलेआहे. इस्लामची अपेक्षा आहे की जो काही माल आपल्याजवळ आहे एक तर त्याला आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यावर खर्च करा अथवा दुसऱ्यांदा द्या. ते आपल्या गरजेच्या वस्तू विकत घेतील आणि अशा प्रकारे पूर्ण संपत्ती समाजात फिरत राहील एका ठिकाणी जामा राहणार नाही.परंतु तुम्ही जर असे करत नाही आणि जमा करण्याची जिद्द करता तर आपल्या त्या जमा केलेल्या संपत्तीतून कायद्याप्रमाणे अडीच टक्के रक्कम प्रति वर्ष काढून घेतली जाईल आणि तिला त्या लोकांच्या सहय्यतेत खर्च केले जाईल जे आर्थिक संघर्षात भाग घेण्याच्या योग्य नाहीत किंवा संघर्ष अथवा प्रयासाव्यतिरिक्त जे आपला पूर्ण वाटा मिळण्यापासून वंचित आहेत याचे नाव जकात आहे. याच्या प्रबंधाची पद्धत इस्लामने प्रस्तुत केली आहे. जकात समाजाच्या संयुक्त कोषात जमा केली जाते. कोषागार त्या सर्व लोकांच्या गरजांचा जबाबदार बनून जातो ज्यांना मदतीची गरज आहे ही समाजासाठी विम्याची अतिशय चांगली पद्धत आहे. यामुळे त्या सर्व बिघाडांचे उच्चाटन होऊन जाते जी सामूहिक मदत आणि सहयोगाला समुचित प्रबंधन असल्याने निर्माण होत असतात. भांडवलदारी व्यवस्थेत जी वस्तू लोकांना संपत्ती जमा करण्यावर आणि तिला लाभदायक कामांमध्ये लावण्यावर विवश करीत असते आणि जिच्या कारणास्तव जीवन विमा आदींची गरज असते ती ही आहे की प्रत्येक व्यक्ती जीवन व्यवस्थेत आपल्या साधनावरच निर्भर असते. ती वृद्ध झाली आणि काहीही शिल्लक ठेवले नसेल तर उपाशी मरेल. मुलाबाळांसाठी काही सोडल्याविनाच जर कोणी व्यक्ती मेली तर ते दारोदार भटकतील आणि भिकेचा तुकडा ही मिळवू शकणार नाहीत. आजारी पडल्यावर शिल्लक नसेल तर उपाय सुद्धा करू शकणार नाही.
घर जळाले अथवा व्यवसायात तोटा झाला किंवा कोणती आणखी आपत्ती आली तर कुठूनही त्याला साह्यता मिळण्याची आशा नाही. याचप्रकारे भांडवलदारी व्यवस्थेमध्ये जी वस्तू श्रमिक वर्गाच्या लोकांना भांडवलशाहीचा गुलाम बनण्यावर आणि त्याच्या अटीवर काम करण्यासाठी विवश करून टाकत असते. जो काही कष्टाचा मोबदला भांडवलदार देतो त्याला गरीब माणूस जर घेणार नाही तर उपाशी राहिल. भांडवलशाहीच्या इनामा पासून तोंड फिरवून त्याला दोन वेळची भाकरी मिळणे कठीण आहे. मग हा मोठा तिरस्कार जो आज भांडवलदारी व्यवस्थेच्या जग विळख्यात आहे की, एकीकडे लाखो करोडो माणसे वंचितावस्थेत आहेत आणि दुसरीकडे जमिनीची उपज आणि कारखान्यात बनलेल्या सामानाचे ढीग लागलेले आहेत. परंतु त्याला विकत घेतले जाऊ शकत नाही. लाखो टन गहू समुद्रात फेकला जातो आणि भुकेल्या मानवांच्या पोटापर्यंत पोहोचत नाही. याचे कारण हेच आहे की वंचित लोकापर्यंत जीवन सामग्री पोहोचविण्याचा कोणताही प्रबंध नाही. या सर्वामध्ये क्रयशक्ती निर्माण केली जावी आणि ती आपली गरज आणि इच्छेनुसार वस्तू विकत घेणे योग्य होऊन जावेत. सारांश हा की व्यापार उद्योग आणि कृषी अशा प्रत्येक उद्योगाची प्रगती व्हावी इस्लाम जकात आणि बैतुलमाल अर्थात सरकारी खजिना याद्वारे सर्व बिघडाना दूर करतो. बैतूलमाल प्रत्येक वेळी आपल्या मागे सहाय्यकाच्या भूमिकेने हजर आहे. आपणास काळजी करण्याची गरज नाही. आपणास गरज असेल तेव्हा बायतुल माल मधून आपला हक्क घेऊन यावा. मग बँक डिपॉझिट आणि जीवन विमा पॉलिसीची काय गरज. आपण आपल्या मुलाबाळांना सोडून समाधानाने जगाचा निरोप घेऊ शकता. आपल्या मागे सरकारी खजिना त्यांचा जवाबदार आहे. आजारपण वृद्धत्व आणि प्राकृतिक संकटे मग ती आसमानी असो वा जमिनी प्रत्येक परिस्थितीत बैतुलमाल आपला स्थाई सहाय्यक आहे. भांडवल शाही आपणास आपल्या अटीवर काम करण्यासाठी विवश करू शकत नाही. बैतूलमाल अस्तित्वात असताना आपणास भूक, निवारा आणि निर्धनतेचे कोणतेही भय नाही. बैतूलमाल धन कमविण्यात पूर्णतः असमर्थ अथवा कमी निर्मिती करणाऱ्या लोकांना गरजेचे सामान विकत घेण्यास सक्षम बनवून टाकतो. या प्रकारे मालाचे उत्पादन आणि त्याची खपत यामध्ये निरंतर संतुलन बनून राहते. आता याची आवश्यकता उरत नाही की आपण आपल्या दिवाळखोरीपणाला जगभरातील लोकांच्या डोक्यावर थोपवावे आणि शेवटी दुसऱ्या ग्रहापर्यंत पोहोचण्याची गरज पडावी. जकात व्यतिरिक्त दुसरा उपाय जो एका ठिकाणी साठलेल्या संपत्तीला फैलावण्यासाठी इस्लामने अवलंबिला आहे तो वारसा हक्काचा कायदा आहे. इस्लाम शिवाय अन्य कायद्यांचा झुकाव याकडे आहे की जी संपत्ती एका व्यक्तीने साठविली आहे ती त्याच्या मृत्यूनंतरही साठवलेली राहावी. इस्लाम या विपरीत हि पद्धत अवलंबवीत की ज्या संपत्तीला एक व्यक्ती साठवूण -साठवून एका ठिकाणी कैद करत राहिला होता, तो मरताच ती वाटून दिली जावी. इस्लामी कायद्यात मुले -मुली ,आई वडील, भाऊ बहिण आणि पत्नी सर्व एका व्यक्तीचे वारस आहेत. आणि एका नियमानुसार सर्वांमध्ये पैतृक संपत्तीचे वाटणे जरुरीचे आहे. जवळचे नातेवाईक अस्तित्वात नसतील तर लांबचे नातेवाईक शोधले जातील आणि त्यांच्यामध्ये ही संपत्ती वाटण्यात येईल. कोणी नातेवाईकच नसतील तेव्हा सुद्धा व्यक्तीला कोणास आपल्या जीभेने म्हटलेला मुलगा मानण्याचा हक्क नाही. या स्थितीत पूर्ण समाज त्याचा वारस आहे. त्याची साठवलेली सर्व संपत्ती बैतुलमाल मध्ये जमा केली जाईल या प्रकारे मग कोणी व्यक्ती करोडो अथवा अब्जावधीची संपत्ती जमा करो, त्याच्या मृत्यूनंतर दोन-तीन पिढ्यांमध्ये ती सर्व लहान लहान तुकड्या मध्ये वाटून दिली जाईल आणि संपत्तीचा प्रत्येक साठा क्रमशः वितरित होत राहील.
मी येथे इस्लामच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थांचा उल्लेख केलेला नाही. पृथ्वीचा प्रबंध औद्योगिक विवाद त्यांचे जे नीपटारे तथा उद्योग धंद्यासाठी धन गोळा करण्याच्या ज्या पद्धती इस्लामच्या सिद्धांतानुसार अवलंबिल्या जिऊ शकतात आणि ज्यांच्यासाठी इस्लामी कायद्यात पूर्ण संभावना सुद्धा ठेवली गेलेली आहे. त्यांना या संक्षिप्त लेखात प्रस्तुत करणे कठीण आहे. मग इस्लामने ज्याप्रकारे आयात-निर्यातीचा कर आणि देशाचे व्यापारी माल आणण्यावर आणि घेऊन जाण्याच्या प्रतिबंधाना हटवून गरजेच्या सामानांचा स्वतंत्र विनिमयाचा मार्ग अवलंबिला आहे. त्याचा मी उल्लेख करू शकलो नाही. या सर्वापेक्षा हे सांगण्याची संधी सुद्धा मिळाली नाही की प्रशासनिक व्यवस्था सिविल सेवा आणि सेनेच्या खर्चांना संभावित सीमेपर्यंत घटवून आणि न्यायालयाच्या स्टॅम्प ड्युटी ला पूर्णपणे हटवून इस्लामने समाजावरुन त्या आर्थिक ओझ्याला इतके हलके केले आहे की, करांना आर्थिक प्रशासनाच्या सीमेहुन वाढलेल्या खर्चामध्ये खपून टाकण्याऐवजी समाजाच्या सुख सुविधा आणि फायद्यासाठी खर्च करण्याची संधी प्रदान केलेली आहे. यामुळे इस्लामची अर्थव्यवस्था मानवासाठी किती मोठी कृपा बनून जाते. पक्षपात सोडून दिला जावा आणि वाडवडिलांपासून अज्ञांतापूर्ण संकीर्णता वारसाहक्कात मिळालेली आहे तसेच गैर सलामी शासनयंत्रणेने आपले प्रभुत्व जमविल्याने जो प्रभाव बुद्धीवर पडला आहे, त्याला दूर करून स्वतंत्र अन्वेक्षणात्मक दृष्टीने या व्यवस्थेचे अध्ययन केले जावे. आशा, आहे की एकही न्यायप्रिय व्यक्ती असा भेटणार नाही की जे मानवाच्या आर्थिक हितासाठी या व्यवस्थेला सर्वात अधिक उपयोगी, योग्य आणि बुद्धीसंगत स्वीकार करणार नाही. परंतु जर कोणाला हा गैरसमज असेल की इस्लामच्या संपूर्ण धोरणात्मक नैतिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेतून फक्त तिच्या आर्थिक प्रणालीस घेऊन सफलतेने चालविले जाऊ शकते तर मी त्याला निवेदन करीन की कृपया या गैरसमजाला मनातून काढून टाकावे. या आर्थिक व्यवस्थेचा घनिष्ठ संबंघ इस्लामच्या राजनैतिक, न्यायिक, कायदेविषयक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्थेशी आहे. मग या सर्व गोष्टीचा पाया इस्लामच्या नैतिक व्यवस्थेवर कायम आहे आणि ती नैतिक व्यवस्था ही स्वतःवर कायम नाही तर ती पूर्णपणे या गोष्टीवर टिकून आहे की आपण एका सर्वशक्तिशाली आणि सर्वज्ञ अल्लाहवर श्रद्धा ठेवावी आणि स्वतःला त्याच्यासमोर उत्तरदायी समजावे. मृत्यूनंतर पार लोकिक जीवनाला मानावे आणि हे सुद्धा स्वीकार करावे की परलोकात अल्लाच्या न्यायालयासमोर जीवनाच्या सर्व कामांना परखले जाईल आणि तपासणी नुसार बक्षीस अथवा शिक्षा मिळेल. हेही मानावे लागेल की पैगंबर मुहम्मद सल्लम यांनी जे नियम आणि कायदे आपल्यापर्यंत पोहोचले आहेत, त्याचा एक भाग आर्थिक व्यवस्था सुद्धा आहे, ती पूर्णतः अल्लाहच्या आदेशावर आधारित आहे, यावर दृढ विश्वास ठेवा जर या धारणा, नैतिक व्यवस्था आणि संपूर्ण जीवन प्रणालीस आपण जसेच्या तसे स्वीकारले नाही तर केवळ इस्लामी अर्थव्यवस्था एक दिवसहि आपल्या योग्य आत्म्याने चालू शकणार नाही आणि न तुम्ही तिच्यापासून कोणतेही उल्लेखनीय लाभ उठवू शकाल.
(भाग – ४ समाप्त)
– अब्दुल मजीद खान
नांदेड, Mob. 9403004232
0 Comments