Home A एकेश्वरवाद A आदर्श जीवनपद्धती

आदर्श जीवनपद्धती

धर्म व जग एक असण्याचा हा अर्थ पूर्णत: चुकीचा आहे, जो बहुतेक धर्मपरायण लोक लावतात, की उपासना तर अल्लाहची करावी. अनिवार्य धार्मिक कृत्ये व पैगंबर मुहम्मद (स.) यांनी केलेली कामे तर अल्लाहच्या आज्ञेनुसार अदा केली जावीत. उरल्या जागतिक बाबी, जशा राजनीती, सामाजिकता, अर्थकारण, सामूहिकता वगैरे. तर या बाबतीत त्याचप्रमाणे कृती केली जावी जशी दुसरे लोक करतात. राजनीतीत तशाच प्रकारे भाग घेतला जावा जसा एखाद्या अन्य व्यक्तीचा सर्वसत्ताधिकार मानणारे घेतात आणि समाधान मानावे की, इस्लामी राजनीतिचा हक्क अदा झाला. जर हे बरोबर असेल तर ही गोष्ट या टोकापर्यंत पोचेल की, ‘बिस्मिल्लाह’ (आरंभ करतो, अल्लाहच्या नावाने) म्हणून उजव्या हाताने दारू पिणे, पैगंबर मुहम्मद (स.) च्या कृतीचे अनुकरण ठरेल. राजनीतिक व्यवस्था इस्लामी असो अथवा गैरइस्लामी त्याचा पाया घातला जातो सर्वसत्ताधिकाराने, पहिले पाऊल म्हणून सर्वसत्ताधिकाराची समस्या सोडविली जाते. कोणत्याही राजनीतिक व्यवस्थेसंबंधी पहिला प्रश्न असा असतो की, त्यात सर्वसत्ताधिकारी कोणाला मानले गेले आहे? या प्रश्नाच्या उत्तरानेच इस्लामी राजनीती दुसऱ्या राजनीतीपेक्षा भिन्न आहे हे स्पष्ट होते. इस्लाममध्ये रूपावर अधिक चर्चा नाही. सांस्कृतिक व वैचारिक उन्नतीने कोणतेही रूप धारण करावे. जर त्यात सर्वसत्ताधिकारी म्हणून अल्लाहला मानले असेल आणि त्यात नागरिकाची स्तिती वेसणरहित उंटाची नसेल. आपल्या स्वामीच्या इच्छेच्या अधीन एका सहाय्यकाची आहे, तर ती इस्लामी राजनीती होय. जर अल्लाहशिवाय कुणा दुसऱ्याचा सर्वसत्ताधिकार मानला जात असेल, तर ती इस्लामी राजनीती नव्हे. मग ती चालविणारी चाळीस दिवस जप-तप करण्यामध्ये लागलेली व्यक्ती असो अथवा हातात पवित्र कुरआन धारण करणारे धर्मपंडित असोत. कारण ज्या प्रकारे अल्लाहच्या उपासनेत इतर कोणाला सामील करणे अनेकेश्वरत्व आहे, तसेच त्याच्या सर्वसत्ताधिकारी असण्याच्या त्याच्या गुणात सामील करणे अथवा स्वत: सामील होणे अनेकेश्वरत्व व त्याच्याशी बंडखोरी आहे. “ला इलाहा इल्लल्लाहु”चा अर्थ जेथे अल्लाहशिवाय इतर कोणी उपास्य नाही असा आहे, तेथेच अल्लाहशिवाय अन्य कोणीही शासनकर्ता नाही असासुद्धा आहे. यापैकी एक मान्य करणे आणि दुसरे अमान्य करणे एकेश्वरत्वाच्या श्रद्धेच्याच काय बुद्धीच्यासुद्धा उलट आहे. जर हे अनेकेश्वरत्व आहे, तर हा मोठा अत्याचार आहे. “इन्नशिर्का लजुलमुन अजीम’ अर्थात नि:संशय अनेकेश्वरत्व मोठा जुलूम आहे. या मोठ्या जुलमासह जर नकळत नसेल तर उपासना, नामस्मरण मी सांगू शकत नाही की, अल्लाहच्या तराजूत किती वजन प्राप्त करू शकतील. महान अल्लाह नि:संशय क्षमा करणारा व दयाळू आहे. परंतु जर तो तसाच भोळा-भाबडा असता, जसा की आमचे भोळे-भाबडे धार्मिक लोक त्याला समजतात, की केवळ तोंडी जमाखर्च करणाऱ्यांना तो आपल्या प्रामाणिक लोकांच्या समूहात सामील करून घेईल, तर किती चांगले झाले असते! पण वस्तुस्थिती अशी आहे की, एक मूर्ख मनुष्यदेखील जेव्हा एखाद्याला मित्र बनवितो तेव्हा त्याच्या सुंदर वर्णनशैली व दीर्घ वर्णनाने समाधानी होत नाही, तर त्याला विविध पद्धतीने तपासतो व पारखतो.
तर बंधुनो! “एकेश्वरत्व काय आहे?” चे हे उत्तर. याचा अर्थ असा की, महान अल्लाहच्या उपास्याच्या गुणाला व त्याच्या सर्वसत्ताधिकारीच्या गुणाला वेगवेगळे ठेवले जाऊ नये आणि असेही केले जाऊ नये की, त्याच्या उपास्याच्या गुणाला व्यावहारिकरीत्या मानले जावे आणि त्याच्या सर्वसत्ताधिकारीच्या गुणाला केवळ डोक्यात व पुस्तकात राहू दिले जावे. त्याचे व्यावहारिक स्वरूप असेच होऊ शकते की, आम्ही आपल्या उपासनेच्या भावनेला आणि आपल्या सर्वसत्ताधिकाराच्या आवश्यकतेला दुसऱ्या सर्वसत्ताधिकाराच्या दावेदाराकडून व आपल्या सर्वसत्ताधिकाराच्या दाव्याकडून तोंड फिरवून आणि एकाला दुसऱ्यात समाविष्ट करून आपल्या जुलूम करणाऱ्याला महाकोपी, शुचिर्भूत व पवित्र, अत्यंत मेहरबान व दया करणाऱ्या अल्लाहच्या हुजुरात सादर करावे. जर या दोघांना वेगवेगळे केले तर दोघे निर्जीव होतील. हा अल्लाहचा सर्वसत्ताधिकारदेखील एवढी मोठी कृपा आहे व त्यात इतकी विपुलता आहे की त्यांची गणना करणे अशक्य आहे, ज्याप्रमाणे त्याच्या अन्य बक्षिसांची गणना संभव नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अल्लाहचा सर्वसत्ताधिकार मान्य करवून त्याच्या आज्ञा लागू करण्याची शक्ती प्राप्त करण्यासाठी जी युद्धे केली, तह केले, करार केले आणि एक राज्यप्रमुख म्हणून ते सर्वकाही आपल्या विशिष्ट शैलीत व अत्यंत पावित्र्य व शुचिर्भूततेने केले, जे अन्य सर्वसत्ताधिकाराच्या दावेदारांचे प्रतिनिधी करतात. तर मग त्यांना शासनाची रूची आणि ऐश्वर्याचा शौक होता काय? मग हे सर्वकाही त्यांनी का केले? ही गोष्ट स्पष्ट आहे की, बालकाचे शिक्षण केवळ प्रेम व ममता आणि प्रलोभन व प्रोत्साहनाने होत नाही, तर तंबी व शिस्तपालनाचीसुद्धा गरज असते. अगदी तसेच प्रत्येक चिंतन कृतीची व्यवस्था आपल्या गरजेप्रमाणे लोक तयार करण्यासाठी शक्तीचा प्रयोग करतात. इस्लामसुद्धा हेच करतो. अल्लाहच्या आवडीची माणसे तयार करण्यासाठी जेथे धर्मावरील दृढ श्रद्धा व सदाचार, प्रलोभन व प्रोत्साहन आणि धार्मिक प्रवचन व उपदेश आवश्यक आहे, तेथे शक्तीचा सोटासुद्धा आवश्यक आहे. आता ही गोष्ट प्रकाशमान दिनाप्रमाणे स्पष्ट झालेली आहे की, शक्तीचा हा सोटा जर अल्लाहच्या सर्वसत्ताधिकारी असण्याशी व त्याच्या प्रसन्नताप्राप्तीशी जोडलेला असेल, तर ही अल्लाहची मोठी कृपा आहे. जर हा सोटा या गोष्टीपासून मुक्त होऊन अपात्र हातात गेला तर माणसासाठी तितकेच मोठे संकट ठरेल.
पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जीवनाचा अभ्यास या प्रकाशात करा. आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की, जर माणसांची एखादी जमात त्या सत्य उपास्यांच्या सेवेत निमग्न होऊन त्याच्याच सर्वसत्ताधिकाराची गुलाम बनल्यास तिला या जगात असा सन्मान व प्रतिष्ठा, अशी शांतता व पवित्र जीवन मिळेल जे एखाद्या अन्य पद्धतीने मिळू शकत नाही. अल्लाहचा गुलाम आणि तो निराश्रित असावा, हे कसे शक्य आहे? आणि अशातली गोष्ट नव्हे की कधी काळी असे घडले होते, तर –
‘आज भी हो जो इब्राहीम सा ईमा पैदा।
आग कर सकती है अंदाजे गुल्सिता पैदा॥’
अर्थात – जर आजसुद्धा पैगंबर इब्राहीम (अ.) सारखी अढळ श्रद्धा निर्माण झाली तर पैगंबर इब्राहीम (अ.) यांना आगीत टाकले असता अल्लाहच्या कृपेने ती आग एका उद्यानात परिवर्तित झाली होती. तसला चमत्कार पुन्हा घडेल व आजदेखील आग उपवनात बदलेल.
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *