माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांचे कथन आहे.
ते सर्व अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे ऐकणे व आज्ञापालनासाठी प्रतिज्ञा करीत असत तेव्हा ते म्हणत, ‘‘असेसुद्धा सांगा की जितके काही माझ्याकडून शक्य आहे.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण
हदीसकथन करणाऱ्यांचे वर्णन आहे की जेव्हा आम्ही यावर प्रतिज्ञा घेत असू की आम्ही आदेशपालन करू आणि त्यास स्वीकारू आणि त्यानुसार अनुसरण करू. तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) असे सांगत असत, ‘‘तुमच्या प्रतिज्ञेत या शब्दांची भर टाका की आम्ही आज्ञापालन आमच्या सामथ्र्यानिशी करू.’’ ही खरे तर पैगंबरांची करुणा होती. त्यांची अपेक्षा होती की एखादे कार्य त्या व्यक्तीच्या सामथ्र्यापलीकडचे असेल तर तो मनुष्य त्या कार्यासाठी अल्लाहकडे अपराधी ठरू नये.
0 Comments