माननीय अबूत्तुफैल यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना जिइर्राना या ठिकाणी मांस वितरीत करताना पाहिले. तेवढ्यात एक महिला आली आणि पैगंबरांच्या जवळ गेली तेव्हा त्यांनी आपली चादर अंथरली, त्यावर ती महिला बसली. मी विचारले, ‘‘ही कोण आहे?’’ लोकांनी मला सांगितले, ‘‘ही पैगंबरांची आई आहे ज्यांनी त्यांना दूध पाजले आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)
माननीय अबू बकर (रजि.) यांची कन्या माननीय असमा (रजि.) यांच्या कथनानुसार, कुरैश आणि मुस्लिमांदरम्यान (हुदैबियाचा तह) तह झाला होता त्या काळात माझी आई (माता रजाई) माझ्याजवळ आली आणि तिने अजून इस्लामचा स्वीकार केलेला नव्हता म्हणजेच अनेकेश्वरवादी होती. मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘माझी आई माझ्याजवळ आली आहे आणि मी तिला काहीतरी द्यावे असे तिला वाते. तर मग मी तिला काही देऊ शकते काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अवश्य. तुम्ही तिच्याशी दयाद्रतेने वागा.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय इब्ने उमर (रजि.) याच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘नातेवाईकांशी प्रतिनातेसंबंध प्रस्थापित करणारा मनुष्य पूर्ण दर्जाचा शिष्टाचारी नाही. दुसऱ्या नातेवाईकाने एखाद्या मनुष्याशी संबंधविच्छेद केला तेव्हा तो त्या नातेवाईकाशी आपला संबंध प्रस्थापित करतो आणि त्यांचा आदर-सन्मान करतो, तोच मनुष्य पूर्ण दर्जाचा शिष्टाचारी
होय. (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण
नातेवाईकांच्या आदरातिथ्याच्या बदल्यात आदरातिथ्य करणे हा कमाल दर्जाचा शिष्टाचार नव्हे. नातेवाईकांनी एखाद्या मनुष्याशी संबंधविच्छेद करतात आणि तो मनुष्य त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. ते याचे कसलेही हक्काधिकार देऊ इच्छित नसले तरी हा त्यांचे सर्व हक्काधिकार प्रदान करण्यास तयार असतो, हाच मनुष्य खरा शिष्टाचारी आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी कमाल दर्जाच्या संयमाशिवाय शक्य नाही. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! माझे काही नातेवाईक आहेत त्यांचे हक्काधिकार मी अदा करीत आहे आणि ते माझ्या हक्काधिकार अदा करीत नाहीत. मी त्यांच्याशी शिष्टाचाराने वागतो आणि ते माझ्याशी वाईट वर्तणूक करतात. मी त्यांच्याशी सहिष्णुता व सहनशीलतेने वागतो आणि ते माझ्याशी असभ्यतेने वागतात.’’पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘जर तू असाच आहे जसा तू म्हणत आहेस तर तू त्यांच्या चेहऱ्यावर शाई लावत आहेस आणि जोपर्यंत तू या स्थितीत असशील अल्लाह त्यांच्या तुलनेत नेहमी तुझा साहाय्यक राहील.’’ (हदीस : मुस्लिम)
0 Comments