जगातील सगळ्यात कठीण काम लहान मुलांचे संगोपन करणे हे आहे. बाळाला जन्माला घालणे आणि त्याचे संगोपन करणे हा एक फुलटाईम मदर्स जॉब आहे. हे काम जगातील सर्वात महत्वाचे काम आहे.
कारण हे काम व्यवस्थित झाले तर भविष्यात आदर्श समाज निर्माण होतो आणि जर का हे काम व्यवस्थित नाही झाले तर भविष्यात निर्माण होणारा समाज हा दिशाहीन होऊन जातो. सर्वशक्तीमान अल्लाह ने या महान कार्यासाठी स्त्रीची निवड केलेली आहे. तिची मानसिक आणि शारीरिक रचना या कामाच्या अनुरूप केलेली आहे. या कामाचे महत्व समजाऊन सांगताना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्त्रीचा दर्जा हा पुरूषापेक्षा तीन पटीने मोठा असल्याची ग्वाही दिलेली आहे. मात्र ही गोष्ट सुशिक्षित/उच्च शिक्षित जाहील (अडाणी) लोकांच्या लक्षात येणार नाही. कोणी स्त्री वेतन घेऊन आईचे कर्तव्य बजावेल, अशी अपेक्षा करणेच मुदलात मुर्खपणाचे लक्षण आहे.
साधारणपणे नौकरी करणाऱ्या स्त्रीया एकतर बाळ जन्माला घालायला उत्सुक नसतात. जन्माला घा-तलेच तर बाळाला प्ले ग्रुपमध्ये टाकून किंवा घरी एखादी महिला नोकरीला ठेवून बाळाला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकून निघून जातात. बाळाला सांभाळ करण्याची कठीण जबाबदारी थोड्याश्या वेतनावर करतांना अशा महिलांच्या नाकी नऊ येते. मग त्या बाळांना शांत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात. कधी मारहाण करतात, कधी झोपेच्या गोळीचा तुकडा त्यांना खाऊ घा-लतात, कधी अफू तर कधी अल्कोहलयुक्त खोकल्याचे औषध त्यांना पाजवितात. एकदा बाळ झोपलं की मग अशा स्त्रीया मस्त टि.व्ही. पाहत बसतात. बाळाच्या आईला परत आल्यानंतर सकृतदर्शनी बाळ व्यवस्थित दिसते. पण नियमितपणे झोपेची गोळी, अफू,अल्कोहोल युक्त खोकल्याचे औषध इत्यादी दिल्यामुळे बाळाची शारीरिक आणि बौद्धीक वाढ खुंटते. ही गोष्ट मूल मोठं झाल्यावर लक्षात येते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आईने आईची जबाबदारी कुठल्याही कारणासाठी टाळू नये. मग लाखो रूपयांच्या वेतनाची नोकरीही बाळाच्या स्वास्थ्यापुढे महत्वहीन ठरते. याचा महिलांनी विचार करणे खारघरच्या या घटनेनंतर आवश्यक झालेले आहे.
इस्लामने बाळाच्या संगोपणाची महान जबाबदारी आईवर अशीच नाही सोपविली. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटंले आहे की, माँ की गोद बच्चे की पहली दर्सगाह होती है. अर्थात आईच्या कुशीत बाळाची पहिली शाळा असते. एवढेच नव्हे तर विज्ञानाने हे सिद्ध झालेले आहे की, आईच्या शरिराचा संपर्क आणि स्नेह बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी अत्यावश्यक असतो. नोकरी करणाऱ्या स्त्रीचा स्पर्श हा आईच्या स्पर्श आणि स्नेहाची बरोबरी करूच शकत नाही, हे या सुशिक्षित अडाणी लोकांच्या लक्षातच येत नाही. यांनी आपल्या गरजा एवढ्या उंचीवर नेवून ठेवलेल्या आहेत की, महिलांना काम केल्याशिवाय, त्यांची पूर्तताच होऊ शकत नाही.
घराची कामे करणे आजकाल काही घराण्यांमध्ये हलकेपणाचे लक्षण मानले जाते. फक्त नोकरपेशा महिलाच नव्हे तर उच्च उत्पन्न गटातील काही गृहिणी सुद्धा घरातील काम करणे म्हणजे कमीपणाचे लक्षण समजतात. म्हणून अशा घरांमध्ये लहान मुलांना सांभाळण्यासाठी, स्वयंपाक व इतर कामांसाठी एक किंवा एकापेक्षा जास्त महिलांना नोकरीवर ठेवले जाते. अशा नोकरपेशा महिला/ पुरूषांमुळे अनेक कुटुंबांना अनेक वेळेस अपरिमित नुकसान सोसावे लागलेले आहे. अशा नोकरांकडून टीप दिली गेल्याने अनेकवेळेस घरावर डाके पडलेले आहेत. वृद्धांची हत्या झालेली आहे. अनेक महिलांवर बलात्कार झालेले आहेत. लहान मुले किडनॅप झालेली आहेत. कमी वेतनामुळे नाराज कामगार महिला अशी कृत्य करतात.
स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या महिलांनी पूर्वगृह बाजूला ठेवून इस्लामने महिलांना कोणते अधिकार दिलेले आहेत व त्यांचे कोणते कर्तत्व सांगितलेले आहे याचा अभ्यास करावा आणि आपल्या बाळाची देखभाल स्वतः करावी, हीच अपेक्षा.
0 Comments