– नसीम गाज़ीभाषांतर – हुसेनखान चांदखान पठान
अज़ान आणि नमाज़संबंधी लोकांना माहिती नसल्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. इस्लामसंबंधीच्या अचूक माहिती अभावी इस्लामच्या या पवित्र आणि कल्याणकारी उपासनापद्धतीच्या बाबतीत बेधडक अयोग्य टीका केली जाते आणि त्याबाबतीत खरी माहिती मिळविण्याचे प्रयत्नसुद्धा केले जात नाहीत. अशावेळी ही बाब अधिक दु:खदायक होते. समाजातील अनेक थरांतील लोक हीच नीति स्वीकारतात, त्यात शिक्षितही आहेत आणि सामान्यजन सुद्धा आहेत.
एकमेकांच्या धर्माबद्दल खरी माहिती नसणे यात आजच्या अनेक सामाजिक अल्लाहप्रती आपली भक्ती दर्शविण्यासाठी, त्याच्या दास्यत्वाची (भक्तीची) कर्तव्ये पार पाडण्यासाठी, त्याच्या उपकाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, अल्लाहच्या श्रेष्ठत्वाची आणि सत्तेची स्वीकृती दर्शविण्यासाठी आणि या सर्व बाबी सतत स्मरणात राहण्यासाठी इस्लामने ज्या उपासनापद्धती निर्धारित केल्या आहेत, त्या सर्वांत महत्ववपूर्ण उपासनापद्धत नमाज आहे. नमाजचे महत्व आणि तिच्या आवश्यकतेचा उल्लेख, कुरआन या अल्लाहकडून अवतरीत झालेल्या ग्रंथात आणि प्रेषित मुहम्मद (स) यांच्या हदीसमध्ये खूप वेळा आला आहे. दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणे इस्लामच्या प्रत्येक अनुयायांवर (स्त्री व पुरुष) बंधनकारक आहे. इस्लामच्या कोणाही अनुयायाने नमाज सोडणे (नमाज अदान करणे) अधर्म ठरविले गेले आहे. नमाजशिवाय इस्लामचा अनुयायी होण्याची कल्पनासुद्धा केली जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.
आयएमपीटी अ.क्र. 70 पृष्ठे – 16 मूल्य – 6 आवृत्ती – 8 (2014)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/0pdw60sao2yzdl8j1aeij8o84glylr8e
0 Comments