माननीय उमर (रजि.) यांचे कथन आहे.
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही माझी प्रशंसा अति करू नका, ज्याप्रमाणे खिश्चन लोकांनी मरयमपुत्र ईसा (अ.) यांच्या प्रशंसेत अतिशयोक्ती केली. मी तर अल्लाहचा एक दास आहे. म्हणून तुम्ही मला अल्लाहचा दास आणि अल्लाहचा पैगंबर म्हणत चला.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण
‘‘पदप्रतिष्ठेतील अंतराला दृष्टीसमोर ठेवून असणे आवश्यक आहे. सामान्यत: लोक आपल्या थोरांची प्रशंसा करण्यात अतिशयोक्ती करतात. याच कारणाने ईसा मसीह (अ.) यांच्या अनुयायींनी ईसा मसीह (अ.) यांना ईशपुत्र घोषित करून टाकले, आणि भक्तीच्या (बंदगी) पंक्तीत प्रेषित्वाला सामील केले. यहुदी (ज्यू) लोकांनी आदरणीय उजैर (अ.) यांना ईश्वरपुत्र म्हटले. खरे तर ईश्वराच्या ईशत्वात कोणीही भागीदार बनू शकत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांनी त्यांची प्रशंसा करताना अतिशयोक्तीने काम घेण्यास रोखले. साक्षवचन (कलमे शहादत) अर्थात ‘‘मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय दुसरा कोणी पूज्य नाही. तो एकमेव आहे, त्याचा कोणी भागीदार नाही आणि मी साक्ष देतो की मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि त्याचे पैगंबर आहे.’’ या वाक्यातील शब्द ‘अब्दुहु व रसूलुहु’ (त्याचे दास व त्याचे पैगंबर) निरंतर स्मरण करून देतात की पैगंबर व रसूल अल्लाहचा एक दास असतो जरी ते श्रेष्ठत्व व पूर्णत्वप्राप्त व्यक्ती असतात. अशा प्रकारे इस्लामने अनेकेश्वरत्वाला समूळ नष्टकेले आहे.
0 Comments