माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे कथन आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे अल्लाह! मी मनुष्य आहे म्हणून ज्या मुस्लिम व्यक्तीला मी वाईट म्हणेन, त्याला मारेन किंवा धिक्कारेन तर यास त्याच्यासाठी तुझ्या दयेचा वर्षाव होण्याचे निमित्त बनव आणि यास त्याच्यासाठी उत्कृष्ठतेचे साधन बनव.’’
स्पष्टीकरण
मनुष्य असल्याकारणाने पैगंबर मुहम्मद (स.) यांना रागसुद्धा येत असे, परंतु ही दयालुतेची पराकाष्ठा आहे की पैगंबरांनी अल्लाहशी प्रार्थना केली, ‘‘जर मी एखाद्या मुस्लिमाला वाईट म्हणेन किंवा त्याला मारेन अथवा त्याचा धिक्कार करीन तर यास त्याच्यासाठी तुझ्या दयेसाठी निमित्त बनव आणि त्यास उत्कृष्ठता प्रदान कर.’’
एका कथनाद्वारे कळते की पैगंबर मुहम्मद (स.) नेहमी म्हणत, ‘‘हे अल्लाह!मी ज्या मुस्लिमाला वाईट संबोधित करेन तर तू कयामतच्या दिवशी यास त्याच्यासाठी तुझ्या सान्निध्याचे साधन बनव.’’ (हदीस : मुस्लिम)
एका हदीसमध्ये आहे, ‘‘यास त्याच्यासाठी त्याच्या अपराधांचे प्रायश्चित्त बनव.’’
0 Comments