Islam Darshan
 • स्त्री आणि र्इस्लाम
 • स्त्री आणि इस्लाम
 • इस्लाम - स्त्री-पुरुष समानतेचा पहिला ध्वजवाहक

  प्राचीन काळापासून स्त्री व पुरुषादरम्यान जो भेदभाव होता हे त्याचेसुद्धा खंडन आहे. त्यात हे सत्य स्पष्ट केले गेले आहे की, प्रथम मानवाची जोडीदारीण कोणत्या अन्य जातीची नव्हती, तर त्याच्याच जातीची होती. कोणी अन्य जीव त्याच्या साहचर्यासाठी जोडून दिले गेले नव्हते, तर ती त्याच्यातूनच निर्माण केली गेली होती. या प्रथम जोडप्यापासून असंख्य पुरुष आणि स्त्रिया उत्पन्न झाल्या. त्यांच्या दरम्यान नातेगोते व संबंध प्रस्थापित झाले आणि संपूर्ण मानवजात निर्माण झाली. म्हणून दोहोंदरम्यान भेदभाव व फरक करणे म्हणजे मानवजातीची एक बाजू व दुसऱ्या बाजूदरम्यान भेदभाव व फरक करणे होय.
 • स्त्री गुलामगिरी विरुद्ध इस्लामचा आवाज

  इस्लामच्या पूर्वी स्त्रीचा इतिहास अत्याचारपीडिताचा व गुलामगिरीचा होता. तिला कमी दर्जाची व नीच मानण्यात येई. तिला सर्व उपद्रवाचे व अमंगलाचे मूळ संबोधण्यात येई. साप आणि विचवापासून जसा स्वतःचा बचाव केला जातो तसा बचाव तिच्यापासून केला जावा असा सल्ला दिला जाई. पशूप्रमाणे तिची बाजारात खरेदी व विक्री केली जाई. तिचे कोणतेही कायमस्वरूपी स्थान नव्हते व ती पुरुषाच्या अधीन होती. तिला कोणताही अधिकार नव्हता
 • उपासना

  उपासना धर्माचा जीव आहे. ही अल्लाहशी सेवकाच्या संबंधाला प्रकट करते. उपासनेच्या इतमामाने अल्लाहशी संबंध दृढ होतो. उपासनेतील उपेक्षा आणि निष्काळजीपणा या संबंधाला अधिक निर्बल करीत जातो. या उपेक्षेला नियंत्रित केले नाही, तर हा संबंध तुटूही शकतो. प्रारंभिक काळातील पुरुषांप्रमाणे महिलावर्गातसुद्धा उपासनेची फार आवड होती. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सर्व पत्नीं या बाबतीत विशेष उल्लेखनीय होत.
 • हज आणि उमराह

  इस्लामच्या मुलभूत आधारस्तंभांपैकी एक हजसुद्धा आहे. हज विशिष्ट दिवसांत काबागृहाला जाऊन विशिष्ट विधी अदा करण्याचे नाव आहे. उमराहमध्ये जवळजवळ हजसारख्याच विधि हजच्या वेळेला सोडून इतर वेळी अदा करण्यात येतात. हज व उमराहची मोठी महत्ता वर्णिली गेली आहे. हदीसमध्ये त्याला स्त्रियांचे धर्मयुद्ध (जिहाद) म्हटले गेले आहे. माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, ‘‘आम्हीसुद्धा तुम्हा सर्वांबरोबर धर्मयुद्धात सामील होऊ शकतो का?’’ ते म्हणाले,
 • दान-धर्म व अल्लाहच्या मार्गात खर्च

  पवित्र कुरआन व हदीसमध्ये नमाजनंतर सर्वांत अधिक महत्त्व अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यास दिलेले आहे. जकात (अडीच टक्केप्रमाणे दान-धर्म) त्याचेच एक कायदेशीर रूप आहे. नमाजद्वारे मनुष्य ही भावना प्रकट करतो की, त्याने हृदय व मेंदू आणि अवयव व त्याचे अंगप्रत्यांग सर्वकाही अल्लाहसमोर नतमस्तक आहेत आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करणे, या गोष्टीचे चिन्ह आहे की, तो संपत्तीला आपली मालमत्ता समजत नाही आणि ती त्या प्रत्येक ठिकाणी खर्च करण्यास तयार आहे, जेथे अल्लाहने खर्च करण्याची आज्ञा दिली आहे. अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची मागणी पुरुषाकडेही आहे आणि स्त्रियांकडेदेखील. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहच्या मार्गात खर्च करणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांना महान मोबदल्याचा वायदा केला गेला आहे.
 • अल्लाहचे नामस्मरण व जप

  प्रेषित मुहम्मद (स) यांनी स्त्रियांना दुआ (प्रार्थना) आणि अल्लाहचे नामस्मरण व जप जपण्याचीसुद्धा ताकीद केली आहे. यसीरा बिन्ते यासिर (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘हे स्त्रियांनो ! तुम्ही ‘तसबीह’ (सुबहानल्लाह), ‘तहलील’ (ला इलाहा इल्लल्लाहु) आणि ‘तकदीस’ (सुब्बूहुन कुद्दूसुन) हा जप आवश्यक करा. बोटांच्या कांड्यावर त्यांची गणना करा. याचे कारण असे की, बोटांनादेखील विचारले जाईल व म्हणविले जाईल. नामस्मरणात निष्काळजीपणा करू नका; नाहीतर अल्लाहच्या कृपेपासून वंचित रहाल.’’ (मिश्कातुलमसाबीह किताबुद्दावात, तिर्मिजी व अबू दाऊदचे प्रमाण)
 • स्त्री भ्रूण हत्या

  पाश्चिमात्य देशांप्रमाणे नारी अत्याचार, अपमान व शोषणाच्या ज्या ज्या शापांनी भारत देखील ग्रस्त आहे, त्यांमधे अत्यंत क्लेषकारक ‘‘स्त्री भ्रूणहत्या’’ होय. आश्चर्य तर हे आहे की, अमानवतेची, क्रुरतेची व अनैतिकतेची ही सद्यस्थिती आमच्या देशाची ‘विशेषता’ बनली आहे... ज्या देशाला गर्व आहे धर्मप्रधान समाजाचा, अहिसा व अध्यात्मिकतेचा व स्त्रीत्वाच्या गौरवाचा व महिमेचा!!
 • स्त्री भ्रूणहत्येला थोपवितांना

  वर्तमान जगतातील एक गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिताग्रस्त आहे. यामुळे लिग संतुलन बिघडले आहे. मुले जास्त व मुली कमी होत चालल्या आहेत. परिणामतः समाजावर अत्यंत वाईट दुःष्परिणाम होत आहेत. समाजातील विचारवंत चिताग्रस्त असून या दुर्गुणापासून वाचण्याचा उपाय शोधत आहेत. स्वयंसेवी संघटना देखील प्रयत्न करीत असून आपल्या कुवतीनुसार उपाययोजना करीत आहेत. शासकीय स्तरावर याला थोपविण्याकरीता कायदे बनविले गेले आहेत. यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद असून देखील या समस्येचा अंत दृष्टीक्षेपात नाही. ईश निर्मित निसर्ग व्यवस्थेमधील मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या गडबडीचे व असंतुलनाचे दुःष्परिणाम मानवाला भोगावेच लागत आहेत.
 • ज्ञान-प्रतिष्ठा

  इस्लामने धार्मिक ज्ञानाची मोठी महत्ता वर्णिली आहे. ते शिकणे व शिकवण्याची खूप प्रेरणा दिली आहे आणि त्याला हर प्रकारे प्रोत्साहन ही दिले आहे. त्याचा परिणाम असा झाला की, लवकरच धार्मिक ज्ञानाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आणि फार मोठे ज्ञानी व्यक्ती उठून समोर आले. त्यात पुरुषही होते व स्त्रियासुद्धा होत्या. येथे काही विशेष महत्त्वाच्या महिलांचा उल्लेख केला जात आहे.
 • नवजात मुलीचे कलेवर आणि कुत्रा

  होय, त्या दृश्याने तेथील चहा पिणाऱ्यांना निव्वळ स्तब्धच केले नाही तर अंतर्बाह्य हलवून सोडले. सुरुवातीला कोणाचाही विश्वासच बसला नाही की कुत्र्याच्या तोंडामध्ये एका नवजात बालिकेचे कलेवर आहे. ही घटना कुरुक्षेत्रातील एस.टी. स्टँड जवळील ‘‘ज्योतिसर टूरिस्ट कॉम्प्लेक्स’’ समोरील कचरा कुंडीतील आहे, जेथे कुत्र्याने त्या नवजात बालिकेच्या शरीरामध्ये आपले दात रोवले ते हेच ज्योतिसर आहे जिथे गीता सांगितली गेली अशा विश्वास आहे. पोलिसांना सूचीत केल्यानंतर उप-अधीक्षक कमलदीप तेथे पोहोचले व नेहमीप्रमाणे सामान्य प्रक्रिये (?) द्वारे कारवाई सुरु केली.

Multimedia

 • इस्लाम फॉर आल - Eng. Taufiq Aslam Khan

 • Islam the only way to Salvation - Mateen Shaikh

 • Belive in Allah then Come in Masjid

Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]