Islam Darshan
 • इस्लाम
 • मिश्र लेख
 • अनुभूती

  सध्या अमेरिकेने अफगाणिस्तानवर आपल्या पूर्ण शक्तीनिशी हल्ला चढविलेला आहे. त्याची काय उद्दिष्टे आहेत? यावर विभिन्न प्रकारे लोक आपले विचार मांडीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत मतभेद असणे मानवाची प्रकृतीसुद्धा आहे आणि त्याचा अधिकारदेखील. परंतु काही मौलिक गोष्टी अशा आहेत ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अत्यंत खेदाची गोष्ट अशी आहे की नवीन ख्रिश्चन (इसवी) शतकाचा प्रारंभच एका भयंकर युद्धाने होत आहे. गत शतकाच्या शेवटी सर्वजण कल्पना करीत होते की पुढील शतक कसे असेल आणि त्यात मानवाचे भविष्य किती उज्ज्वल होण्याची संभावना आहे.
 • अमेरिकेची दहशतवादाविरुद्ध मोहीम, इस्लाम आणि मुस्लिमांचा दृष्टिकोन

  अकरा सप्टेंबर २००१ चा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस होता. या दिवशी अमेरिकेच्याच वेगवेगळ्या विमानतळावरुन चार विमानांनी उड्डाण केली. यांच्यापैकी एका विमानाने न्यूयॉर्कमधील अमेरिकेचेच नव्हे तर जगाचे सर्वात मोठे व्यापारी केंद्र वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या एकशे दहा मजल्याच्या गगनचुंबी इमारतीला टक्कर मारली आणि तिला जमीनदोस्त करुन टाकले आणि दुसरे विमान अमेरिकेचे राजनीतिक केंद्र वॉशिग्टनमधील संरक्षण मंत्रालय पेन्टॅगॉनच्या किल्ल्यासारख्या शहरावर विजेप्रमाणे कोसळले आणि त्याला राख बनवून टाकले. हे सर्व काही केवळ ४५ मिनिटात घडले. या घटनेने केवळ अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हलवून सोडले.
 • अमेरिकेची भयंकर दुर्घटना - कोण जबाबदार?

  वर्ल्ड ट्रेड सेंटर व पेन्टॅगॉनचा विध्वंस आणि पाशविकता व निष्ठुरपणाच्या या कृतीची जितकी निदा केली जाईल तितकी ती थोडीच आहे. मानवी स्वभाव याचा तिरस्कार करतो. इस्लामची नैतिक मूल्ये आणि मुस्लिमांचा सदाचारी स्वभाव अशा प्रकारच्या सर्रास कत्तलीचा तीव्र निषेध करतो. निष्पाप लोकांचे जीव घेणे आणि तेही अशा प्रकारे की त्यांच्या शरीराच्या चिध्या उडाव्यात किवा त्यांना आगीत फेकून देणे की त्यानी मृत्यूच्या कुशीत हुंदके देऊन-देऊन मरुन जावे हे दयाळू धर्माच्या स्वभावाविरुद्ध आहे. म्हणूनच मानवाच्या शरीराच्या नाक-कानसारख्या अवयवांना कापण्याची प्रेषितांनी मनाई कली आहे. या शिकवणीच्या फलस्वरुप मुस्लिमांची ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहे की त्यांनी दहशतवादाला बळी पडलेल्या लोकांच्या दुःखात सामील व्हावे.
 • अमेरिकन दहशतवाद व पाशवी सूड

  वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या घटनेनंतर तीन चार आठवड्याच्या सर्वसंमत तयारीनंतर अखेर अमेरिकन संयुक्त संस्थानांनी अफगाणिस्थानवर हल्ला चढविला. या युद्धाचे वैशिष्ट्य असे आहे की ही दोन तुल्यबळ शक्तींदरम्यानची युद्ध मोहीम नाही, तर जगातील सर्वांत बलाढ्य शक्तीचे जगाच्या सर्वांत निर्बळ आणि दारिद्र्यग्रस्त देशाविरुद्ध हे युद्ध आहे. इंग्लंडच्या पार्लमेंटमधील एक लेबर सदस्य एम्. पी. जॉर्ज गॅलोवे यांनी या युद्धाचे उदाहरण असे दिले आहे, ’’जणू माइक टायसन एका पाच वर्षाच्या मुलाविरुद्ध मैदानात उतरला आहे.’
 • दहशतवाद आाणि पाश्चात्यांचे हिसक संकल्प

  आणि हे विसरुन गेले आहेत की आजपर्यंत खुद्द अमेरिकेत आय.आर.ए. या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना आश्रय प्राप्त होते आणि क्युबा ते लॅटिन अमेरिकेतील अनेक देश व इराक, लिबिया व इराण वगैरे देशात दहशतवाद करणारे कित्येक सशस्त्र टोळ्यांसाठी अमेरिका केवळ आश्रयस्थान होते असे नव्हे तर सी.आय.ए. आणि विशिष्ट लॉबी अनिर्बंधपणे त्यांचे प्रशिक्षण व त्यांना शस्त्र सज्ज करण्याची व्यवस्था करीत राहिल्या आहेत
 • हिदुस्थानाची प्राचीन परंपरा

  दिव्य कुरआनने प्रदान केलेल्या प्रकाशात जेव्हा आम्ही हिदुस्थानाच्या प्राचीन आणि आधुनिक परंपरा व रूढीचे निरीक्षण करतो तेव्हा त्यात आम्हाला सत्याच्या उरलेल्या खाणाखुणा ठळकपणे दिसतात. विविध रूढी परंपरा आणि कल्पनांमुळे सत्याला किती का शंकास्पद केले असले तरी सत्याच्या खाणाखुणा पूर्णपणे पुसल्या गेल्या जात नाही.

Multimedia

 • इस्लाम फॉर आल - Eng. Taufiq Aslam Khan

 • Islam the only way to Salvation - Mateen Shaikh

 • Belive in Allah then Come in Masjid

Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]