Islam Darshan
 • इस्लाम
 • प्रेषित (स.) यांचे सोबती
 • इस्लामी विधिज्ञ माननीय अब्दुल्लाह बिन उमर(र.)

  अब्दुल्लाह बिन उमर(र.)यांची गणना मुस्लिम जणसमुदायाच्या धर्मगुरुंमध्ये होते. त्यांना सामान्यतः ‘इब्ने उमर(र.)’(अर्थात उमरपुत्र) या नावाने संबोधित करण्यात येते. कारण ते माननीय उमर फारुक(र.)ज्यांच्या बाबतीत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी गौरवोद्गार काढले, ‘‘माझ्यानंतर कोणी जर प्रेषित असते, तर ते माननीय उमर फारूक(र.)असते, परंतु माझ्यानंतर कोणीही प्रेषित नाही.’’ इब्ने उमर(र.)यांच्या आईचे नाव ‘जैनब बिते मजऊन’(र.)होते. त्या ‘जमुह’ परिवारातील ‘मजऊन’ यांच्या कन्या होत्या. प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या त्या सोबती श्रद्धावंतांच्या माता अर्थात प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या पत्नी सन्माननीय हफ्सा बिंन्ते उमर फारूक(र.)मा. अब्दुल्लाह बिन उमर(र.)यांची सख्खी बहीण होती. त्यांना प्रेषितांचे सोबती असण्याचे सौभाग्य लाभले होते.
 • माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास(र.) दिव्य कुरआनाचे प्रवक्ते

  श्रद्धावंतांची माता सन्माननीय मैमुना(र.)यांचे एक किशोरवयीन भाचे होते. त्या आपल्या या भाच्यावर जिवापाड प्रेम करीत असत. या भाच्याचेसुद्धा आपल्या मावशीवर आणि आपल्या मावसा असलेल्या आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्यावर खूप प्रेम होते. म्हणूनच ते आपल्या मावशी मावसाच्या घरीच जास्त वेळ काढीत आणि त्यांची छोटी-मोठी कामेसुद्धा हसत-बागडत करीत असत. मोबदल्यात आदरणीय प्रेषितांचा आशीर्वाद घेत असत.
 • माननीय अब्दुलाह बिन जुबैर(र.)

  आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्याकडून स्थलांतराचा आदेश मिळताच वर्षानुवर्षे इस्लामद्रोह्यांच्याअत्याचारांना बळी पडलेले बरेचसे प्रेषितसोबती आपले घरदार आणि मातृभूमीचा त्याग करून मदीना शहरी स्थलांतरित झाले. नंतर काही काळ लोटताच आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) हेसुद्धा मदीना शहरी स्थायिक झाले आणि अरब प्रदेशाचे हे प्राचीन शहर प्रेषितमय झाले. योगायोग असा झाला की, मुहाजिरीन(अर्थात स्थलांतररित) पैकी कोणालाच बर्याच दिवसांपर्यंत मूलबाळ झाले नाही. या शहरातील अतिशय नालायक असलेल्या यहूदी(‘ज्यू’) लोकांनी असा गवगवा केला की, आम्ही मुस्लिम समुदायावर जादू केल्याने त्यांना मुलबाळ होत नाही.
 • माननीय खालिद बिन वलीद(र.) ‘सैफुल्लाह’

  माननीय खालिद बिन वलीद(र.)इस्लामचे असे महान लढवय्ये, सरसेनापती आणि ध्वजवाहक आहेत की त्यांचे नाव ऐकताच छाती गर्वाने फुलते आणि नवचैतन्य निर्माण होते. खालिद बिन वलीद(र.)यांच्याकरीता स्वयं आदरणीय प्रेषितांनी ईश्वर दरबारी प्रार्थना केली होती की, ‘हे ईश्वरा! ‘खालिद’ यांना इस्लाम धर्माच्या स्वीकृतीचे भाग्य लाभू दे!’
 • माननीय अबू हुरैरा दौसी(र.)

  माननीय अबू हुरैरा(र.)हे प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या अशा महान त्यागी सोबत्यांपैकी एक होते ज्यांनी आदरणीय प्रेषितांचे सान्निध्य मिळविण्यासाठी आपले वतन, घरदार आणि संपत्तीचा त्याग केलेला होता. प्रेषितांचे शिष्यत्व त्यांना जगाच्या संपूर्ण संपत्तीपेक्षाही जास्त मौलिक होते. प्रत्यक्ष प्रेषितांकडून धर्मशिक्षण घेऊन त्यांनी लाखो विद्यार्थ्यांची ज्ञानतृष्णा विझविली.
 • माननीय अमरु बिन आस(र.) - इजिप्तजेते

  एकदा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना एका लष्करी मोहिमेच्या नेतृत्वासाठी अतिशय बुद्धिमान आणि युद्धकुशल शूरवीराची गरज भासली, म्हणून त्यांनी माननीय अमरु बिन आस(र.)यांना प्रेषितदरबारी हजर राहण्याचे आदेश दिले. माननीय अमरु बिन आस(र.)आदेश मिळताच प्रेषितदरबारी हजर झाले. आदरणीय प्रेषितांनी म्हटले,
 • माननीय झैद बिन साबित(र.) अन्सारी

  प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मक्का शहर त्याग करून मदीना शहरात वास्तव्य केले आणि संपूर्ण मदीना शहर प्रेषितत्वाच्या सुगंधाने ढवळून निघाले. सर्वत्र मदीना शहरात आनंदाचे वातावरण होते. एके दिवशी काही सोबत्यांनी बारा वर्षे वयाचा एक गोंडस आणि निरागस मुलगा प्रेषितदरबारी हजर केला आणि आदरणीय प्रेषितांना म्हणाले,
 • माननीय अम्मार बिन यासिर तय्यबुल मुतय्यिब(र.)

  आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या दरबारी एकदा माननीय अली(र.)हजर होते. एवढ्यात एक अत्यंत देखणी देहयष्टी, रुंद आणि उंच शरीर, सुंदर आणि बोलके डोळे असलेला एक तरुण आत येण्याची परवानगी मागत होता. त्यांचा आवाज ऐकून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) म्हणाले,
 • माननीय हस्सान बिन साबित अन्सारी(र.) - इस्लामी कवि

  अरब समाजाचा आणि जगातील इतर राष्ट्रांचासुद्धा इस्लामपूर्व काळ हा अगदीच मार्गभ्रष्ट काळ होता. लिहिण्या-वाचण्याची कमतरता असलेल्या अरब समाजात मात्र कवनशास्त्र खूप प्रगत होते. अरब लोक अशिक्षित व असंस्कृत तर होतेच, परंतु अख्ख्या जगामध्ये कवनशास्त्रात त्यांचा कोणी स्पर्धक नव्हता. उच्च भाषाशैली आणि कविता त्यांच्या स्वभावातच होती. जणू अगदी लहानलहान मुलेसुद्धा कवनशास्त्रात तरबेज असत. एवढेच नव्हेतर गुलामांनासुद्धा कवनशास्त्रावर कमालींचे प्रभुत्व होते. त्या काळात मोठमोठी कविसंमेलने होत असत. या कविसंमेलनात दूरदूरचा प्रवास करून पुरुष व महिला मोठ्या संख्येत सहभागी होत असत.
 • माननीय नोअमान बिन बशीर अन्सारी (र.)

  धर्मावरील प्रेम ईश्वराचे महान वरदान आहे. स्त्री असो की पुरुष, मूल असो की वृद्ध, ईश्वर ज्याला इच्छितो त्याला हे वरदान देतो. प्रेषितत्वाच्या अंतिम काळात मदीनावासीयांनी एका निरागस मुलामध्ये धर्मश्रद्धा आणि प्रेषितप्रेमाचा एक विचित्र स्वभाव अनुभवला. हा मुलगा नेहमी प्रेषितदरबारी हजर राहात असून मोठ्या तल्लीनतेने आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांची वचने ऐकत असे. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) भाषणासनावर विराजमान होत असत, तेव्हा हा मुलगा त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे भाषण अगदी तन्मयतेने ऐकत असे.

Multimedia

 • इस्लाम फॉर आल - Eng. Taufiq Aslam Khan

 • Islam the only way to Salvation - Mateen Shaikh

 • Belive in Allah then Come in Masjid

Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]