Islam Darshan
 • इस्लाम
 • इस्लाम परिचय
 • इस्लामचा उगम

  भूतलावर जेव्हापासून मानवी जीवनाची सुरुवात झाली, त्याच वेळी मनुष्यासाठी ‘इस्लाम’ चा आरंभ झाला. ‘इस्लाम’ चा अर्थ अल्लाहचे आज्ञापालन करणे आहे. इस्लाम मानवासाठी जन्मजात धर्म आहे. मनुष्यजातीचा निर्माणकर्ता आणि पालनकर्ता अल्लाहच आहे. मनुष्यांसाठी मुलभूत कर्तव्य हेच आहे की त्यांनी रचयिताचे आज्ञापालन करावे.
 • सृष्टीचे विविध स्वरूपी स्पष्टीकरण

  ही सृष्टी काय आहे, कशाकरिता अस्तित्वात आली आणि हिची नियमबद्ध कार्यव्यवस्था कशावर टिकलेली आहे? या प्रश्नांचे सामान्यतः चार स्वरूपात विश्लेषण करण्यात येत आहे. या सृष्टीची वास्तविकता ही एक भ्रामक कल्पना आहे. ही सृष्टी कधी निर्माण झालीच नाही. ती अनादी असून चिरकाल आहे. ही सृष्टी आपोआप निर्माण झाली आणि आपोआपच चालू आहे. या सृष्टीची निर्मिती एका असामान्य व जबरदस्त निर्माणकर्त्याने केली असून त्याच्याच नियमानुसार या सृष्टीचे प्रत्येक कार्य चालू आहे.
 • ईश्वराच्या अस्तित्व विषयासंबंधी निराधार प्रश्न

  एखादे सुंदर, विविध रंगांच्या व विविध प्रकारच्या फुलांनी नटलेल्या नंदनवनात वावरत असताना आपल्या बुद्धीत नंदनवन फुलविणार्या व त्याची जोपासना करणार्या माळ्याविषयी विचार आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याने हे सुंदर नंदनवन फुलविण्याकरिता जमिनीची मशागत केली, पाणी देऊन सुपीक बनविली, कष्ट पणाला लावले आणि विविध प्रकारच्या फुलझाडांची कौशल्यपूर्ण पेरणी करून हे अतिसुंदर नंदनवन अस्तित्वात आणले.
 • इस्लामी क्रांतीचे स्वरुप

  १४ एप्रिल १९७६ साली ‘इस्लामिक कौंसिल ऑफ युरोप’ तर्फे लंडनमध्ये एक आंतर्राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात जगभरातून धार्मिक विद्वान व विचारवंतांनी इस्लामच्या विविध विषयांवर निबंध सादर केलेत. मला सुद्धा या अधिवेशनात निमंत्रित केले गेले होते. परंतु आजारपणामुळे मी या अधिवेशनात भाग घेऊ शकलो नाही. तरी पण यासाठी एक निबंध लिहून पाठविला होता. जो या अधिवेशनात सादर करण्यात आला.(अबुल आला)
 • इस्लाम कोणता समाज निर्माण करतो?

  इस्लाम आदर्श समाजाची निर्मिती करतो. तिथे शांति व स्वास्थ्य असते. तेथे उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्यता जात-पात किवा श्रीमंत-गरिबात कसलाही भेदभाव अगर पक्षपात केला जात नाही. तेथे माणूस दुसर्या माणसांचा दास नसतो. प्रत्येकाला खरेखुरे स्वातंत्र्य प्राप्त असते. प्रत्येक माणूस ताठ मानेने व अभिमानाने चालू शकतो. कोणीही भुकेलेला, उघडा-नागडा अथवा निराधार नसतो. लोक एकमेकांना आश्रय देणारे असावेत. प्रत्येकाला न्याय मिळावा. महिलांना आदर-प्रतिष्ठा मिळते. त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि त्यांना पुरुषांच्या कामवासनेला बळी पडावे लागू नये. अवैध कृत्ये करणार्यांना दहा वेळा विचार करावा लागतो. तेथे नीतीमूल्यांचा आदर केला जातो. तेथे तरुणाचे चारित्र्य विश्वास ठेवण्यासारखे असते आणि ते विधायक कार्यात गढलेले असतात. तेथे भलेपणाच्या कामात चढाओढ केली जाते आणि माणसे स्वच्छतेच्या आणि परिपूर्णतेच्या दिशेने पुढे जात असतात.
 • इस्लाम व दहशतवाद

  आपला स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर करण्याची पद्धत जुनी आहे. कधी कधी व्यक्तीकडून ते काम झालेले आहे, कधी लोकांच्या समूहाकडून ते झाले आहे, तर कधी कधी सत्ताधीशांकडून व सरकारांकडूनही ते झाले आहे. आधुनिक युगाचा इतिहास हे स्पष्टपणे दर्शवितो की दहशतवादाचा आरंभ युरोपातून झालेला आहे आणि तेथेच त्याला राजकारणाचे साधनही बनविण्यात आले आहे.
 • इस्लाम व जिहाद

  पाश्चात्य साम्राज्यांनी मध्ययुगीन कालखंडापासून जिहाद विरूद्ध प्रचंड प्रचार केला, जिहादचे भयानक चित्र रेखाटले आणि लोकांची मते कलुषित करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. हे सर्व अशा वेळी झाले, जेव्हा त्यांच्या स्वतःच्याच अत्याचारांनी अर्धे जग पीडित बनले होते. आजसुद्धा युरोप आणि अमेरिका स्वतःच्या आर्थिक आणि राजकीय हितासाठी तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रे बाँबफेकी विमाने व आधुनिक शस्त्रास्त्रानिशी वाटेल त्या देशावर हल्ला करून तुटून पडतात. त्यांचे तसे कृत्य अगदी तर्कसंगत व योग्य आहे, असे सभ्य व शिष्ट शब्दात जगाला पटविण्याचे प्रयत्न केले जातात पण इस्लाम व जिहाद हे शब्द त्यांच्या कानांवर पडल्याबरोबर दुष्प्रचाराची ‘टेप रेकॉर्ड’ लगेच सुरू केली जाते.
 • इस्लाम व मानवजात

  वर्ण, वंश, जात, धर्म, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रांमध्ये विभागले गेलेल्या या जगातील मानवजातीसंबंधी इस्लामचा दृष्टिकोन एक विशेष महत्व बाळगतो. इस्लाम मानवांसमोर विश्वबंधुत्वाचा विचार मांडतो. माणसांना तो आठवण करून देतो की माणवाची उत्पत्ती एका पुरुषापासून व एका स्त्रीपासून झालेली आहे. जगात आज जितकी माणसे आहेत, ते सर्व एकाच माता-पित्याची संतती आहे. या सर्वांचा निर्माणकर्ता एकच असून ते सर्व एकाच घटकापासून निर्मिलेले आहेत. म्हणून उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्पृश्य-अश्पृश्य या निराधार व चुकीच्या विचारधारणा असून इस्लामी समाजात त्यांना कसलेही स्थान नाही. पवित्र कुरआनचे फर्मान आहे,
 • इस्लाम व त्याचा अर्थ

  मुहम्मद(स.) मार्फत इस्लाम आम्हापर्यंत पोहोचला आहे, ‘इस्लाम’ हा अरबी भाषेचा शब्द आहे. त्याचा एक अर्थ ‘आज्ञापालन’ व दुसरा ‘शांति’ असा आहे. मुस्लिम आज्ञाधारकाला संबोधले जाते. अर्थात अल्लाहचा आज्ञाधारक, त्याचे आदेश मानणारा, त्याच्यासमोर नतमस्तक होणारा. अल्लाहने जितके पैगंबर धाडले. त्या सर्वांनी एकेश्वरवादाचीच शिकवण दिली. कोणीही पैगंबराने त्यांची स्वतःची उपासना करण्याचा आदेश दिला नाही. कोणीही स्वतःला ईश्वर अथवा त्याचा अवतार म्हटले नाही. ही गोष्ट अत्यंत विस्मयकारक ठरली की अधिकांश माणसांनी त्या पैगंबरांनाच खोटे ठरविले, त्यांचे म्हणणे ऐकले नाही. उलट त्यांचा छळ केला. त्यांना क्लेश-यातना दिल्या आणि त्यांचे निधन झाल्यावर त्यांना पूज्य म्हणून घोषणा केली. त्यांच्या मूर्ती घडवू लागले आणि त्यांच्या मूर्तीशीच सहाय्यांच्या याचना भाकू लागले व त्या मूर्तींची पूजा करु लागले. वास्तवतः सर्व पैगंबरांचा एकच धर्म होता- इस्लाम, माणसांना ईश्वराचा आज्ञाधारक असणे, हाच सर्वांचा परम हेतू होता. ही गोष्टही उल्लेखनीय आहे की सर्व जगाचा धर्म इस्लामच आहे.
 • माणसाला धर्माची गरज आहे काय?

  या धरतीवर वास्तव करणार्या एकूण सर्व प्राणीमात्रात मानव सर्वांहून श्रेष्ठ आहे. त्याची शक्ती व त्याचे प्रभुत्व मूलतः त्याच्या विचारशक्तीत आणि बुद्धीत आहे. त्याला बुद्धी व ज्ञानाची असीम कुवत देऊन त्याच्या श्रेष्ठत्वाची घोषणा जणू निसर्गानेच केली आहे. आपल्या सर्व श्रेष्ठत्वा-निशीही माणूस आपल्या गरजापोटी अगतिक व असहाय्य असल्यासारखा राहातो. जोवर त्याच्या गरजांची पूर्तता होत नाही, तोवर तो चिंताक्रांत व दुःखी राहतो. त्याच्या गरजा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चालू राहतात आणि काही गरजा तर त्याच्या मृत्यूनंतरही उरतात.

Multimedia

 • इस्लाम फॉर आल - Eng. Taufiq Aslam Khan

 • Islam the only way to Salvation - Mateen Shaikh

 • Belive in Allah then Come in Masjid

Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]