Islam Darshan
 • इस्लाम
 • इस्लामी व्यवस्था
 • नैतिक व्यवस्था

  मनुष्याचे बाह्य आचरण हे अंतरंगाचे प्रतिबिंब असते. मनुष्याचा नैतिक दर्जा त्याच्या माणुसकी स्वभावावर परिणाम करतो. म्हणूनच आध्यात्मानंतर नैतिकतेला महत्त्व देण्यात आले आहे. मनुष्याच्या नैतिक आचरणाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. नैतिकव्यवस्था हा धर्माचा अर्क आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कथन आहे, ‘‘मला या धरतीवर यासाठी पाठविण्यात आले आहे की मानवतेचा आदर्श बनावे.’’ धर्मनिष्ठेचे दुसरे नाव नैतिक आचरण आहे.
 • मानवजातीचे मूळ एक आहे

  पवित्र कुरआनने वारंवार हे सत्य स्पष्ट केले आहे की मानवजातीचा प्रारंभ एकाच जीवापासून झालेला आहे. त्याच्यापासून त्याची जोडी निर्माण केली आणि नंतर त्या दोघांपासून त्यांचा वंश वृद्धिगत झाला. परिवार आणि टोळ्या अस्तित्वात आल्या. जाती व जमातींनी जन्म घेतला आणि मानव वस्ती पृथ्वीच्या वेगवेगळ्या प्रदेशात व क्षेत्रात वाढत गेली.
 • सामाजिक नैतिकता

  सामाजिक नैतिकतेला विभिन्न रूपांमध्ये धार्मिक जीवनाची ओळख आणि उपासनेचा एक उद्देश सांगितले गेले आहे. याला मोमिन व्यक्तींची विशिष्टता सांगून कुरआनने हे स्पष्ट करून टाकले आहे की ईश्वराने सत्य धर्म(इस्लाम) अवतरित केला आहे की मनुष्याने त्यावर आचरण करून एकीकडे उपासनेचा हक्क अदा करावा आणि दुसरीकडे मानवाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनास सुधारले जाऊ शकेल. काही ठिकाणांवर तर मानवांमध्ये सत्य व न्यायाची स्थापना आणि सद्व्यवहाराला या धर्मास अवतरित करण्याचा उद्देश घोषित केला गेला आहे.
 • इस्लामची नैतिक व्यवस्था

  माणसामध्ये नैतिक संवेदना ही एक नैसर्गिक आहे. ती काही गुणांना पसंत व काही गुणांना नापसंत करते. ही संवेदना वैयक्तिकरीत्या माणसामध्ये कमी अधिक प्रमाणात असली तरी मानवी बुद्धीने सामुदायिकपणे नेहमी नीतीच्या काही गुणांना चांगले आणि काही गुणांना वाईट ठरविलेले आहे. सत्य, न्याय, वचनपालन व विश्वासपात्रता यांना नेहमी मानवी नीतीमध्ये प्रशंसेस पात्र मानले गेले आहे आणि कोणत्याही काळात असत्य, अत्याचार, वचनभंग व विश्वासघात यांना पसंत केले गेले नाही. सहानुभूती, दया, उदारता व मनाचा मोठेपणा यांची नेहमीच कदर केली गेली आहे.
 • इस्लाम आणि मानवजातीची एकता

  भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळातील सर्व माणसांना जर एका ठिकाणी एकत्र जमा केले गेले आणि त्यांना त्यांच्या भावना व अनुभव आणि त्यांच्या गरजांच्या बाबतीत प्रश्न विचारला गेला तर सर्वांची उत्तरे एकसारखी असतील. कोणताही माणूस असा निघणार नाही जो आनंद व दुःखाच्या भावना आणि नैसर्गिक आवश्यकतांपासून मुक्त असेल अथवा त्याच्या भावना दुसऱ्यांच्या भावनांपासून आणि त्याच्या नैसर्गिक गरजा दुसऱ्यांच्या नैसर्गिक गरजांपासून भिन्न असतील. परंतु असे असून सुद्धा माणसे वेगवेगळ्या जाती व टोळ्यांत विभाजित झाले आहेत आणि प्रत्येक जात दुसऱ्या जातीशी युद्धात निमग्र आहे.
 • इस्लामची नैतिक जीवनव्यवस्था

  सत्य, प्रामाणिकपणा, न्याय, दया, सद्व्यवहार, वचनपूर्ती, क्षमा, वैध प्राप्तीवर समाधान, अवैध कमाईचा निषेध, आंतरबाह्य आचरणामध्ये एकता ही सदाचारी विश्वमानवतेची उत्तमोत्तम गुणवैशिष्ट्ये आहेत. ही गुणवैशिष्ट्ये ज्या व्यक्तींमध्ये व समाजांमध्ये आढळून येतात, ते मानवतेचे आधारस्तंभ आणि आश्रयदाता असतात. असत्य, धोकेबाजी, वचन पराङमुखता, अन्याय, निर्दयता, ढोंग, दुराचार ही अत्यंत वाईट अशी गुणधर्मे आहेत.
 • नैतिक अवस्था भयंकर प्रमाणात खालावली आहे

  एखादा गैरफायदा उचलताना, एखादे लाभदायक खोटे बोलताना आणि एखादी नफा देणारी बेइमानी करताना केवळ या जाणिवेने की, अशा प्रकारे कोणाचा हक्क मारणे नैतिक दृष्टीने वाईट आहे म्हणून संकोच बाळगणारे आमच्यात किती टक्के लोक आहेत? जेथे कायद्याच्या पकडीतून वाचण्याची आशा असते तेथे केवळ नैतिक संवेदनेपोटी एखाद्या अपराधापासून किवा दुष्कृत्य करण्यापासून परावृत्त राहणारे असे किती टक्के लोक आहेत? ज्या ठिकाणी आपल्या व्यक्तिगत फायद्याची आशा नसेल तेथे इतरांशी भलाई, सहानुभूती, हक्कपूर्तता आणि परोपकाराचे वर्तन करणारे असे किती लोक आहेत?
 • प्रतिष्ठेचा मापदण्ड केवळ सदाचार आहे

  मनुष्याचे दुर्दैव असे आहे की त्याने रंग व वंश, घराणे व टोळी, राष्ट्र व स्वदेश आणि भाषा व कथनातील तफावतीला निसर्गाच्या निशाण्या समजून त्यांच्यापासून बोध घेतला नाही, तर त्यांना प्रतिष्ठा व अवमान आणि उच्चता व नीचतेचे प्रमाण बनवून टाकले, वस्तुतः प्रतिष्ठा व अवमानाचा संबंध रंग, रूप, राहणीमान व वार्तालापाशी नाही तर अल्लाहवरील विश्वास व कृतीशी आहे.
 • मानवी जीवनात कोणत्या गोष्टीमुळे बिघाड उत्पन्न होतो

  मानवी जीवनात ज्या गोष्टीमुळे बिघाड उत्पन्न होतो त्यांना आपण चार प्रमुख शीर्षकांखाली एकत्र करू शकतो. १. ईश्वराची भीती नसणे २. ईश्वरी मार्गदर्शनाची उपेक्षा ३. स्वार्थीपणा ४. विषण्णता अथवा कुमार्गाचे अवलंबन.
 • तर या पापांना आता वाईट सुद्धा समजले जात नाही.

  ज्या नैतिक वाईट गोष्टींना व्यक्तिगत जीवनात लोक वाईट समजतात, त्यांना सामुहिक बाबतीत अवलंबण्यास संकोच करीत नाहीत, तर या पापांना आता वाईटसुद्धा समजले जात नाही. उदा. विजेची चोरी आता शहरांत सर्वत्र आहे. टॅक्सच्या चोरीसाठी अगणित कारणे प्रचलित झालेले आहेत. सरकारच्या विभिन्न योजनांसाठी ज्या रकमा मंजूर करण्यात येतात, त्यांचा मोठा भाग नोकरशाहीच्या खिशात जातो.

Multimedia

 • इस्लाम फॉर आल - Eng. Taufiq Aslam Khan

 • Islam the only way to Salvation - Mateen Shaikh

 • Belive in Allah then Come in Masjid

Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]