Islam Darshan

कन्या - भ्रूणहत्या

Published : Thursday, Feb 04, 2016

मानव जीवनाच्या अवमानतेचे एक अत्यंत घृणास्पद रूप नवजात कन्या शिशुंची हत्या आहे. भारतात या युगातसुद्धा काही राज्यांमध्ये जसे केरळ, ओरिसा, बिहारमधे हा प्रकार आहे की माता स्वतः मोलकरणीच्या मदतीने आपल्या नवजात मुलींची निर्मम पध्दतींनी जन्माच्या काही महीन्यानंतर या भयाने हत्या करून टाकते की यांच्यामुळे हुंड्याचा प्रबंद करावा लागेल.

टाईम्स ऑफ इंडिया(२२ सप्टेंबर १९९९) मध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला आहे, ज्यामध्ये सांगितले गेले आहे की राजस्थनच्या एका गावात ११०(एकशे दहा वर्षांनी) पहिल्या वेळेस तिथल्या एका मुलीचे लग्न झाले. यासाठी की बाडमेर जिल्हाच्या या देवार गावात एका लांब कालावधीपर्यंत मुलीच्या जन्माचा रिपोर्ट मिळाला नाही. या स्थितीचे दुःखद कारण हे आहे की कोवळ्या निष्पाप मुली गळा दाबून किवा विष देऊन मरणाच्या दारात फेकल्या जातात. वृत्तपत्रानुसार आधुनिक पध्दतीचा भ्रूणहत्या करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

हुंड्यांच्या कारणामुळे नव वधूं हत्येच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये बरोबर येत राहतात.

संबंधित लेख

  • स्वप्नसृष्टीतील इच्छांचा शेवट

    सतत स्वप्नसृष्टीत रंगून राहण्याच्या संदर्भात असे म्हणता येईल की, त्यापासून लाभाऐवजी हानीच होते. कारण जगात काही व्यक्तींना योग्यतांची व क्षमतांची अशी काही ईश्वरी देणगी असते की, त्यामुळे त्यांना विपुल प्रसिद्धी व लोकप्रियता लाभते. या उलट काही लोकांना मनातून प्रसिद्धीची व ख्यातीची तर उत्कट इच्छा असते; पण ती प्राप्त होण्यासाठी आवश्यक असणारी योग्यता व क्षमतेचा त्यांच्यात अभाव असतो.
  • इस्लामचा दुसरा स्तंभ नमाज

    नमाज कर्तव्यपूर्तीतील पहिली महत्त्वाची पायरी आहे. दुसरे कोणतेही कर्तव्य याबरोबरीचे नाही. श्रध्दावंताचे (मुस्लिम) प्रत्येक कृत्य आज्ञाधारकता आहे. परंतु प्रार्थनेचे (नमाज) कृत्य सर्व कृत्यांपेक्षा श्रेष्ठतम आहे. नमाज प्रार्थना म्हणजे अल्लाहशी दृश्य स्वरुपात आणि परिणामस्वरूपात शरणागती आहे. नमाजकडे एक दृष्टीक्षेप या सत्यतेला स्पष्ट करते. नम्रता, लीनता, स्तुती आणि स्तुतीगान हे सिध्द करते की दास्यतेचे आणि विनम्रतेचे दुसरे एखादे असे नमाजच्या स्वरूपातील उदाहरण मिळणे अशक्य आहे. नमाजमध्ये झुकून दोन्ही हाथ बांधून उभे राहणे, कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होणे, नम्रतेने नतमस्तक (सजदा) होणे आणि सातत्याने स्तुतीगान आणि प्रेमपूर्वक अल्लाहची भीती बाळगून असणे ही सर्व नमाजची अंगभूत लक्षणे आहेत. दिव्य कुरआन आणि प्रेषितकथन (हदीस) हे नमाजच्या सद्गुणांनी आणि सर्वोत्कृष्ठतेने भरलेले आहेत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]