Islam Darshan

नवजात मुलीचे कलेवर आणि कुत्रा

Published : Thursday, Feb 04, 2016

होय, त्या दृश्याने तेथील चहा पिणाऱ्यांना निव्वळ स्तब्धच केले नाही तर अंतर्बाह्य हलवून सोडले. सुरुवातीला कोणाचाही विश्वासच बसला नाही की कुत्र्याच्या तोंडामध्ये एका नवजात बालिकेचे कलेवर आहे. ही घटना कुरुक्षेत्रातील एस.टी. स्टँड जवळील ‘‘ज्योतिसर टूरिस्ट कॉम्प्लेक्स’’ समोरील कचरा कुंडीतील आहे, जेथे कुत्र्याने त्या नवजात बालिकेच्या शरीरामध्ये आपले दात रोवले ते हेच ज्योतिसर आहे जिथे गीता सांगितली गेली अशा विश्वास आहे. पोलिसांना सूचीत केल्यानंतर उप-अधीक्षक कमलदीप तेथे पोहोचले व नेहमीप्रमाणे सामान्य प्रक्रिये (?) द्वारे कारवाई सुरु केली.

‘दैनिक भास्कर’ (१८ मार्च २००९, हिसार आवृती) नुसार निव्वळ मुलगी असल्यामुळे तिला हे अतीभयानक व निर्मम हाल झेलावे लागले. कुठे गेली मातेची ममता? आईबापांची संतानाप्रतिच्या नैसर्गिक प्रेमाची, वात्सल्याची तिरडी कोणी उचलली? इतका रानटी बनला हा चंगळवादी समाज? वेळोवेळी डोळ्यांसमोर येणारे स्त्रीभ्रूण हत्येचे आकडे समाजाच्या क्रूरतेला उघड करतात. बापाच्या कर्तव्याबाबत देखील प्रश्न निर्माण झाले आहेत. मुलींच्या घटणाऱ्या सरासरी बाबतीची आकडेवारी समोर असून देखील वृत्तपत्रे व मिडिया ढिम्म आहे तर सर्व समाजधूरीण असे स्थीतप्रज्ञ आहेत जणु मुके, बहिरे आणि अंध झाले आहेत. कधी कधीतरी असे वाटते की यांना नकारात्मक मुद्यांशीच घेणे देणे असून मानवरुपामध्ये मानवतेचे शत्रु आहेत की काय?

उपलब्ध आकडेवारीनुसार पंजाब, हरियाणा प्रांतामध्ये स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण सर्वाधिक असून त्यामुळे स्त्री पुरुष प्रमाण चिताजनकरित्या खाली घसरले आहे. काही दिवसांपूर्वीच हरियाणातील एका गावामध्ये जिवंत मुलीचा जन्म ही मोठी बातमी बनली कारण कित्येक वर्षानंतर हे घडले होते. या गावामध्ये मुलीला जीवंतच राहू दिले जात नव्हते. मुलगी घरामध्ये असणे स्वतःचा व कुळाचा अपमान समजले जाई व जावई करून घेणे हे नाक कापण्यासारखे मानले जाई. अरब द्वीपकल्यामधे प्रेषित मुहम्मद (स.) साहेबांच्या आगमनापूर्वीच्या अज्ञानकालामध्ये अशीच परिस्थिती होती. इस्लामने या विषम स्थितीला पूर्णपणे बदलून टाकले आणि मुलींना यथायोग्य पालनपोषण व सन्मान भेटू लागला. इस्लामच्या शिकवणीतील एक उल्लेखनीय तत्व स्त्रीयांची प्रतिष्ठा व सन्मान आहे.

पवित्र कुरआन मानवतेकरिता ईश्वराचा संदेश व मार्गदर्शन आहे. याच्या ८१ व्या अध्यायामध्ये अंतिम प्रलयाचे दृष्य रेखाटले आहे. त्या दिवशी इतर प्रश्नांबरोबर हे देखील विचारले जाईल ‘‘जेव्हा जीवंत गाडल्या गेलेल्या मुलीला विचारले जाईल की, तुला कुठल्या गुन्ह्यामुळे मारले गेले?’’ (कुरआन अत तकवीर : ८, ९) जगत-उद्धारक प्रेषित मुहम्मद (स.) नी सांगितले, ‘‘तुम्हांपैकी एखाद्याच्या तीन मुली अथवा बहिणी असतील आणि जर तो त्यांच्या बरोबर सद्व्यवहाराने वागत राहिला तर तो निःसंशय स्वर्गामध्येच जाईल. (तिरमिजी)

संबंधित लेख

  • कन्या - भ्रूणहत्या

    मानव जीवनाच्या अवमानतेचे एक अत्यंत घृणास्पद रूप नवजात कन्या शिशुंची हत्या आहे. भारतात या युगातसुद्धा काही राज्यांमध्ये जसे केरळ, ओरिसा, बिहारमधे हा प्रकार आहे की माता स्वतः मोलकरणीच्या मदतीने आपल्या नवजात मुलींची निर्मम पध्दतींनी जन्माच्या काही महीन्यानंतर या भयाने हत्या करून टाकते की यांच्यामुळे हुंड्याचा प्रबंद करावा लागेल.
  • सर्वंकष न्याय व्यवस्था म्हणजे काय?

    या संक्षिप्त लेखात मी आपणापुढे सर्वंकष न्यायव्यवस्था म्हणजे काय व ती कशा प्रकारे अंमलात आणली जावी याबाबत खुलासा करीत आहे. मात्र जे लोक साम्यवादास सामाजिक न्यायव्यवस्था कायम करण्याचा एकमेव मार्ग मानून तिचाच अवलंब करण्याचा आग्रह करीत आहेत, ते आपली चूक मान्य करून आपला हट्ट सोडून देतील. याबद्दल मी साशंक आहे. कारण जोपर्यंत अज्ञानी केवळ अज्ञानी वा असमंजस असतो तोपर्यंत त्यांच्यात सुधारणा होण्याची शक्यता असते.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]