Islam Darshan

स्त्री गुलामगिरी विरुद्ध इस्लामचा आवाज

Published : Thursday, Feb 04, 2016

इस्लामच्या पूर्वी स्त्रीचा इतिहास अत्याचारपीडिताचा व गुलामगिरीचा होता. तिला कमी दर्जाची व नीच मानण्यात येई. तिला सर्व उपद्रवाचे व अमंगलाचे मूळ संबोधण्यात येई. साप आणि विचवापासून जसा स्वतःचा बचाव केला जातो तसा बचाव तिच्यापासून केला जावा असा सल्ला दिला जाई. पशूप्रमाणे तिची बाजारात खरेदी व विक्री केली जाई. तिचे कोणतेही कायमस्वरूपी स्थान नव्हते व ती पुरुषाच्या अधीन होती. तिला कोणताही अधिकार नव्हता. ती पुरुषाच्या दया व कृपेवर जिवंत राही. इस्लामने तिच्या गुलामगिरीविरूद्ध इतका बुलंद आवाज उठविला की, संपूर्ण जग त्याने निनादून गेले आणि आज कोणाचेही धाडस नाही की, तिच्या पूर्वस्थितीला त्याने बरोबर आणि योग्य ठरवावे। त्याने संपूर्ण शक्तीनिशी उद्घोष केला -

‘‘लोकहो ! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा, ज्याने तुम्हाला एका जिवापासून निर्माण केले व त्याच्यापासूनच त्याची जोडी बनविली आणि त्या दोघांद्वारे अनेक पुरुष व स्त्रियांचा विस्तार केला आणि अल्लाहचे भय बाळगा ज्याच्याद्वारे तुम्ही एक दुसऱ्याकडून सहाय्याची याचना करता आणि नातसंबंधांचा आदर करा. निःसंशय अल्लाह तुम्हाला पाहत आहे.’’ (सूरतुन्निसा - १)

ही त्या गोष्टीची घोषणा होती की, जगाने माणसामाणसात जो फरक केला आहे तो निखालस खोटा आहे. त्याला कोणताही आधार नाही. संपूर्ण मानवजातीची निर्मिती एकाच माणसापासून झालेली आहे. सर्वांचे मूळ एकच आहे. जन्मतः कोणीही सज्जन अथवा दुर्जन नाही, कोणीही उच्च कुळाचा अथवा नीच कुळाचा नसतो, सर्वजण बरोबरीचे व समान योग्यतेचे मालक आहेत. वंश, टोळी, रंग, जात, देश, राष्ट्र, भाषा आणि व्यवसायाच्या आधारे त्यांच्यात भेदभाव करणे चुकीचे व अयोग्य होय.

संबंधित लेख

  • सृष्टीचे विविध स्वरूपी स्पष्टीकरण

    ही सृष्टी काय आहे, कशाकरिता अस्तित्वात आली आणि हिची नियमबद्ध कार्यव्यवस्था कशावर टिकलेली आहे? या प्रश्नांचे सामान्यतः चार स्वरूपात विश्लेषण करण्यात येत आहे. या सृष्टीची वास्तविकता ही एक भ्रामक कल्पना आहे. ही सृष्टी कधी निर्माण झालीच नाही. ती अनादी असून चिरकाल आहे. ही सृष्टी आपोआप निर्माण झाली आणि आपोआपच चालू आहे. या सृष्टीची निर्मिती एका असामान्य व जबरदस्त निर्माणकर्त्याने केली असून त्याच्याच नियमानुसार या सृष्टीचे प्रत्येक कार्य चालू आहे.
  • जातीय दंगली व आपली जबाबदारी

    देशात जातीय दंगलींचे जे चक्र चालू आहे, ते तत्कालिक आहे असे वाटत होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रयत्नात ज्या जाती परस्पराविरुध्द उभ्या टाकल्या होत्या, त्यांच्या भावनांचा तो तात्कालिक उद्रेक आहे आणि काळ लोटल्याबरोबरच तो उद्रेकही थंड होईल, असे वाटत होते. तसे घडले नाही. ही एक दुःखद गोष्ट आहे. जातीय दंगलींचे चक्र सतत चालू राहिले. आता या दंगलींचे स्वरुप असे झाले आहे, की पोलीस बळ आणि पुढार्यांची आवाहने, त्यांचे निवारण करण्यास अपुरे पडत आहेत, किबहुना ही समस्या इतकी संवेदनशील व गांभीर्याची बनली आहे की, ज्या लोकांना त्यांची कटुता व असहनीयता जाणवते, त्यांच्यासाठी हे आवश्यक झाले आहे की त्यांनी केवळ आवाहने करण्यापुरते व आवाहने ऐकण्यापुरते मर्यादित राहू नये.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]