Islam Darshan

इष्ट मंगलमय वचन; कल्म-ए-तैय्यबा

Published : Thursday, Feb 04, 2016

ज्यांवर इस्लामचा पाया आधारलेला आहे. त्या पाचही श्रद्धांचे विवरण या एका वचनातच सामावलेले आहे ते वचन म्हणजे,
‘‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर्रसूलुल्लाह’’
(अल्लाहखेरीज कोणीही आज्ञापालनास व उपासनेस पात्र नाही. मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत.)
मुखातून जेव्हा तुम्ही ‘लाइलाहा इल्लल्लाह’ उच्चारता तेव्हा एकूण सर्व खोट्या उपास्यांचा व नियंत्यांचा त्याग करून केवळ एकाच अल्लाहचे दास्यत्व पत्करल्याचा तुम्ही कबुलीजबाब देत असता. तसेच तुम्ही ‘मुहम्मदुर्रसूलुल्लाह’ म्हणता तेव्हा आदरणीय मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत, या गोष्टीच्या सत्यतेबद्दल तुम्ही कबुली देत असता. प्रेषित्वाची कबुली दिल्यानंतर ही गोष्ट तुम्हांवर आपोआपच अनिवार्य ठरते की, तुम्ही ईशत्वासंबंधी ईशसत्ता व ईश्वराच्या गुणवत्तेसंबंधी, त्याच्या ‘फरिश्त्या’ (दूता) संबंधी, ईश्वरी ग्रंथासंबंधी, ईश्वराच्या सर्व प्रेषितांसंबंधी, तसेच ‘आखिरत’ (पारलौकिक जीवन) संबंधी, जी शिकवण मुहम्मद (स.) यांनी दिलेली आहे, त्यावर अंतःकरणापासून व निष्ठापूर्वक श्रद्धा (ईमान) बाळगावी. अल्लाहच्या आज्ञांचे पालन करण्याची व उपासनेची जी पद्धत त्यांनी दाखवून दिली त्यानुसार आचरण करावे, हे तुम्हावर अनिवार्य ठरते.(१)
१) सूरह अल बकरा, आयत २८५, सूरह अन निसा आयत १३६ आधारित आहेत. यात शंका नाही की ‘हदीस’ मध्ये ‘तकदीर’ला सुद्धा श्रद्धेत (ईसान) सामील केले आहे आणि अशा प्रकारे मौलिक श्रद्धा पाचऐवजी सहा होतात. खरे तर ‘तकदीर’वर ईमान धारण करणे अल्लाहवर ईमानधारण करण्याचाच भाग आहे आणि कुरआनमध्ये याचा उल्लेख याचसाठी आला आहे. म्हणून या धारणेला मी एकेश्वरत्वाच्या व्याख्येतच समाविष्ट केले आहे. याच प्रकारे हदीसमध्ये जन्नत, जहन्नुम, सिरात व मिजानला वेगवेगळ्या धारणा म्हणून उल्लेखले आहे. खरे तर हे सर्व ‘आखिरत’वर ईमान धारण करण्याचाच भाग आहे.

संबंधित लेख

  • इस्लामच्या वारसा कायद्याचा मूळ आधार

    वारसांच्या वाटपात इस्लामने हेच प्रमाण ठेवले आहे. या संदर्भात जो कायदा मूलाधाराचा दर्जा बाळगतो, त्यापेक्षा अधिक न्यायपूर्ण कायदा, मानवजातीला आजतागायत उमजू शकलेला नाही, ‘लिकुल्लिन हस-वहाजति ही’ अर्थात प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार दिले जावे. जेव्हा माणसाच्या गरजेचे माप त्याच्यावरच्या सामाजिक जबाबदाऱ्यांवर असते. परंतु धनार्जनाच्या बाबतीत इस्लाम स्त्री-पुरुषामध्ये कोणताही भेदभाव करीत नाही, वेतनात स्त्री-पुरुषात काही फरक करीत नाही. तसेच व्यापारातील नफा वाटपात भेदभाव करीत नाही.
  • इस्लाम संस्कृती व आध्यात्मिक तसेच व्यावहारिक जीवन

    मानवी आत्म्याचे पावित्र्य एक पवित्र ध्येय आहे. सर्व मानवी प्रयत्नाचे तेच लक्ष्य आहे व मानव संस्कृतीचे प्रमुख ध्येय तेच आहे. इस्लाम आत्म्याच्या पावित्र्यालाच पुरेसे मानत नसून ज्याला वर्तमान युगातील खरा आनंद मानले जाते त्या सर्व जाहीर बाबींनाही त्याबरोबरीने शिल्लक ठेवतो. म्हणूनच पराजित देशातील एकेश्वरवादाच्या विरुद्ध नसणाऱ्या व लोकांना भल्या व चांगुलपणाच्या कामापासून न रोखणाऱ्या सर्व संस्कृतीना, आपल्या अंमलाच्या कृपाछत्राखाली इस्लामने वाढ केली.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]