Islam Darshan

एकेश्वरत्व आहे तरी काय?

Published : Thursday, Feb 04, 2016

जगातील लोक कोणत्या ना कोणत्या धर्माचा स्वीकार करतात, मात्र त्यांना विश्वनिर्मात्याबाबत योग्य ते ज्ञान प्राप्त नसते व त्यांच्या आराधनेचा मार्गही योग्य नसतो. इस्लामच असा एकमेव धर्म आहे जो विश्व व मानवजातीची निर्मिती करणाऱ्या ईश्वराचे खरे स्वरुप एकेश्वरवादाद्वारे प्रस्तुत करतो. इस्लाम योग्य ते आचरणाचे पाठ देतो. त्यामुळे मुस्लिमांना जगात विशेष स्थान प्राप्त होते. मुस्लिम केवळ एकाच सर्वशक्तिमान ईश्वराची उपासना करतात. म्हणूनच त्यांची समाजात वेगळीच छाप पडते. मात्र ही अत्यंत विचित्र व खेदजनक बाब आहे की, मुस्लिम आपल्या विशेष सामाजिक स्थानाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी स्वतःला फार मोठ्या ईश्वरीय कृपेपासून वंचित करून घेतले आहे. एकेश्वरत्व समजून घेणे व आपल्या अपत्यांना समजावून देऊन त्यांचे मन एकेश्वरवादाच्या ज्ञानाने प्रकाशित करणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत हे मौलिक ज्ञान प्राप्त होत नाही, इतर कोणत्याच उपायाने मानवी आचार-विचार सुधारणार नाहीत.

‘तौहीद’ म्हणजे केवळ ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे असा अर्थ होत नाही. जगात असा कोणताच समाज नव्हता व आजही नाही जो ईश्वराच्या अस्तित्वाचा इन्कार करतो. जगात फार पूर्वीपासून नास्तिक अस्तित्वात आहेत. रशियाचे नास्तिकत्व तर सर्वांना माहीतच आहे. पण रशियाचे नास्तिक शासक एक पंचमांश नागरिकांनासुद्धा ईश्वराच्या अस्तित्वाचा इन्कार करण्यास राजी करू शकले नाहीत. आश्चर्य म्हणजे ते गेले चाळीस-पन्नास वर्षे नास्तिकतेचा प्रचार करीत आहेत व या प्रचारासाठी शक्ती व संपत्तीचा बेछूट व्यय करीत आहेत. गंमतीची गोष्ट अशी की, मागच्या जागतिक युध्दात जेव्हा जर्मन फौजा विजयी होत रशियात शिरु लागल्या तेव्हा स्टालिनने स्वतः जनतेस आवाहन केले की, मस्जिद व चर्चमध्ये जाऊन ईश्वराची प्रार्थना करा की, त्याने आमची रक्षा करावी. याचाच अर्थ असा की, जे लोक ईश्वराच्या अस्तित्वाचा इन्कार करतात, तेच वेळ पडल्यास ईश्वरासमोर हात पसरून दयेची याचना करतात. सारांश मानव कधीही ईश्वराच्या अस्तित्वाचा इन्कार करू शकला नाही.

‘तौहीद’ (एकेश्वरत्व) म्हणजे एकमेव ईश्वराचीच उपासना करणे असे होते. जगातील कोणताही समाज सर्व शक्तींना (आराध्यांना) ईश्वर मानत नाही. भारतातील अनेकेश्वरवादी परमात्मा हाच ईश्वर आहे असे मानतात. भूतकालीन झरतुश्ती (इराणी अग्निपूजक) ईश्वर एक आहे असे मानत असत. कुरआन मक्कावासी अश्रध्दावंताना विचारतो की, त्यांना कोणी जन्म दिला ? ते उत्तर देतात ‘ईश्वराने !’ त्यांना पुन्हा विचारले जाते की, धरती व आकाश कोणी निर्माण केले ? ते पुन्हा म्हणतात, ‘ईश्वराने!’ पुरातन कालापासून आजपर्यंत माणूस दिशाभूल करणाऱ्यांमुळे गोंधळला गेला आहे. सर्वांना माहीत आहे की, ‘ईश्वर एक आहे’, तरीही ते अनेक शक्तींची (ईश्वरांची) पूजा करण्याची चूक करीत असतात.

संबंधित लेख

  • सुशिक्षित मुस्लिमांची बौध्दिक गुलामगिरी

    ईश ग्रंथ ‘कुरआन’ व प्रेषित मुहम्मद(स.) यांचे उपदेश(अहादीस) मानवाच्या मार्गदर्शनासाठी जगाच्या अंता(कयामत) पर्यंत ईश्वर सुरक्षित ठेवणार आहे. त्यांच्याद्वारे मानवास दुष्कर्मापासून(सैतानी प्रवृत्तीपासून) दूर ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या आधारे जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील अडीअडचणीत मानवाचे मार्गदर्शन होत राहणार आहे. परंतु ही दुर्दैवी माणसे आपल्या धर्माच्या तत्त्वांचा अज्ञानामुळे विघातक नवविचारांनी अत्यंत प्रभावित होत आहेत. त्यामुळे जगातील सबळ प्रगत देशांकडून दिल्या गेलेल्या घोषणांचा प्रतिध्वनी लगेच येथेही ऐकू येत आहे.
  • विश्वस्वामी

    याच्या अगदी टोकावर आपण सर्वजण उभे आहोत इतिहासाच्या अशा महत्त्वपूर्ण प्रसंगापैकी आहे. पृथ्वीचा खरा स्वामी एखाद्या देशात एखादी व्यवस्था संपुष्टात आणून दुसर्या व्यवस्थेचा निर्णय घेत असतो. सकृद्दर्शनी ज्याप्रकारे अधिकारसूत्राच्या हस्तांतरणाची बाब पूर्ण होत असल्याचे दिसत आहे, परंतु देशाची व्यवस्था खुद्द देशवासीयांच्या स्वाधीन केली जाण्याचे हे निर्णायक पाऊल आहे, अशी कुणाची फसगत होऊ नये. परकीय लोक जे बाहेरून राज्य करीत होते ते परत जात आहेत म्हणून देशव्यवस्था खुद्द देशवासीयांच्या हातात आली पाहिजे हे अगदी स्वाभाविक आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]