Islam Darshan

‘मुस्तलक’ कबिल्याविरुद्ध कारवाई

Published : Wednesday, Feb 03, 2016

‘मुस्तलक’ कबिल्याविरुद्ध कारवाई म्हणजे हिजरी सन पाचमधील एक अतिशय महत्त्वपूर्ण घटना होय. हा कबिला खूप उपद्रवी आणि भांडखोर होता. प्रेषितांना सूचना मिळाली की, हा कबिला बंड करण्याच्या तयारीत आहे. प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आदरणीय प्रेषितांनी ‘माननीय बुरैदा(र)’ यांना पाठवून मिळालेली सूचना खरी असल्याचे समाधान करून घेतले. ‘शाबान’ महिन्याच्या तीन तारखेस आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) लष्करासह जलद गतीने ‘मुरैसीअ’ या ठिकाणी पोहोचले. शत्रूपक्ष लढण्यासाठी येणारच होता, परंतु प्रेषितांना अचानक आलेले पाहताच त्याचे आवसान गळाले. शत्रूचे संपूर्ण सैन्य घाबरले आणि अभय देण्याची मागणी केली. शत्रूच्या या लष्करात ‘माननीय जुवैरिया’सुद्धा होत्या. त्यांनी मोठ्या आवाजात इस्लाम स्वीकारण्याची घोषणा केली आणि प्रेषितांनी त्यांना त्यांच्या स्वइच्छेने आपल्या विवाहबंधनात घेऊन सन्मान दिला. या ठिकाणी शत्रूपक्षास युद्ध न करताच पराभवाचे तोंड पाहावे लागले. ‘माननीय जुवैरिया(र)’ या कबिल्याच्या सरदाराची कन्या होती.

मुस्लिम समुदायाच्या या विजयामुळे इस्लामद्रोही असलेल्या दांभिकजणांचा जळफळाट झाला. सूड आणि द्वेषापोटी दांभिकांनी मदीना शहरातील मुस्लिम समुदायात कलह निर्माण करण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु आदरणीय प्रेषितांनी जातीने लक्ष घालून दांभिकांची कूटनीती उद्ध्दस्त केली.

संबंधित लेख

  • प्रेषित मुहम्मद(स) ‘हज’च्या प्रसंगीची घोषणा

    तबूक युद्धावरून परतल्यावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) काही महिण्यांसाठी मदीना शहरीच वास्तव्यास राहिले. यादरम्यान त्यांनी माननीय अबू बकर(र) यांच्या नेतृत्वाखाली तीनशे जणांना ‘हज’ यात्रेवर रवाना केले. माननीय अबू बकर(र) हज यात्रेस रवाना झाल्यावर ‘सूरह-ए-बरात’ची आयत अवतरली, ज्यामध्ये इस्लाम विरोधकांसाठी वचनभंग करण्याबाबतीत वर्णन होते. तो संदेश ‘हज’ संमेलनात पोहोचविण्याकरिता आदरणीय प्रेषितांनी आपले व्यक्तिगत सचीव माननीय अली(र) यांना रवाना केले की, जेणेकरून ते ‘हज’च्या संमेलनात ‘सूरह-ए-बरात’ विरोधकांसमोर वाचून दाखवतील.
  • इस्लामी कायद्यात मानवहत्येची शिक्षा

    एखाद्या माणसाला जीवे मारणे हे किती मोठे पाप आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. एका माणसाची हत्या करणे म्हणजे समस्त मानवजातीची हत्या करण्यासम असल्याचे कुरआनात म्हटले आहे.(संदर्भ : सूरह-ए-माइदा : ३२) म्हणूनच इस्लामने मानवहत्या करण्याची शिक्षासुद्धा कठोर स्वरुपाची दिली आहे. शिवाय ही शिक्षा ईह आणि पारलौकिक या दोन्ही जीवनात तजवीज करण्यात आली आहे. मानवहत्या करणारी व्यक्ती नेहमीसाठी नरकाग्नीत राहणार. कुरआनात म्हटले आहे,
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]