Islam Darshan

सत्याच्या रुपात असत्य

Published : Saturday, Apr 16, 2016

मनुष्य उघड अनाचार व स्पष्ट कुकृत्याकडे फार कमी आकृष्ट होतो. ईश्वराने मानवाला दिलेल्या उत्तम शारिरीक रचना व योग्यता या अद्भुत चमत्कारांपैकीच हा एक चमत्कार आहे. याच कारणाने अव्यवस्था आणि दुराचाराला कोणत्या ना कोणत्या प्रकारे सदाचार आणि चांगुलपणाचे फसवे वस्त्र घालून माणसापुढे प्रस्तुत करण्याकरिता सैतान नेहमीच विवश होत असतो. स्वर्गात आदम (अ) यांना, ‘‘मी तुमच्याकडून ईश्वराची अवज्ञा करवू इच्छितो, की ज्यामुळे तुम्ही स्वर्गाबाहेर काढले जाल.’’ असे सांगून सैतान कदापि धोका देऊ शकत नव्हता. त्याऐवजी त्याने हे सांगून धोका दिला.

‘‘काय मी तुम्हाला असा वृक्ष दाखवू जो अमर करणारा आणि शाश्वत सत्ता बहाल करणारा वृक्ष आहे.’’ (कुरआन २०: १२०)

माणसाचा हाच स्वभाव आजही आहे. आजही जितक्या चुका आणि अज्ञानात त्याला सैतानाने गुरफटले आहे त्या कोणत्या ना कोणत्या फसव्या घोषणा आणि कोणत्या ना कोणत्या खोटया पोषाखाच्या सहाय्याने अंगीकारल्या जात आहेत.

संबंधित लेख

  • इस्लामी कायदे आणि राजकारण

    साधारणतः खालील बाबींचा समावेश राजकारण म्हणून होतो आणि त्यामुळे मनुष्याच्या राजकीय जीवनाचा साचा तयार होतो. सामाजिक शिस्त कशासाठी आवश्यक आहे? समाज सार्वभौमत्व कोणाला बहाल करते? मनुष्याचे खरे स्थान काय आहे? नागरिकांचे मूलभूत हक्क कोणते? शासनाचे अधिकार कोणते आणि मर्यादा काय आहे? राज्यघटना कोण तयार करतो? कोणती राज्यघटना कार्यान्वित आहे? आपण आता पाहू या की या प्रश्नांची उकल कुरआन आणि हदीसमध्ये झालेली आहे का? या प्रश्नांचे उत्तर ‘इस्लामची राजकीय व्यवस्था’ या प्रकरणात देण्यात आले आहे.
  • वर्तमानकाळातील अपराध : गुन्हेगारीचे निर्मूलन

    मानव इतिहासात गुन्हेगारी कधीच कोणी पसंत केली नाही. म्हणूनच गुन्हेगारी निर्मूलनाचे विभिन्न पातळीवर प्रयत्न करण्यात आले. अपराधी कर्मांना आळा घालविण्यासाठी विविध कायदे करण्यात आले. यासाठी पोलिस, गुप्त तपास वगैरेसारखी खाती निर्माण करण्यात आली. राष्ट्रीय संपत्ती खर्च करण्यात आली. अपराधीवृत्तींविरुद्ध जनजागृती करण्यात आली. अपराधांमुळे भोगावे लागणारे दुष्परिणाम आणि उद्भवणारी संकटे जगासमोर मांडण्यात आली.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]