Islam Darshan

साम्राज्यवादापासून मुक्तीचा एकमेव मार्ग

Published : Saturday, Apr 16, 2016

याकरिता, आपण सगळे मिळून इस्लामचे बोट घट्ट धरु या, कारण आम्ही त्यांच्याच झेंड्याखाली गोळा होऊन, साम्राज्यवादाच्या उरलेल्या सर्व खाणाखुणा नष्ट करुन टाकल्या. साम्राज्यवादरुपी या दैत्याने जोवर या भूतलाला आपल्या अत्याचाराचे केंद्र करुन ठेवले आहे, तोवर मानवतेच्या मुक्तीचा आता एकच मार्ग उरला आहे. येथूनच खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याच्या वाटा फुटतील. त्यानंतर कोणीही कोणाचा गुलाम अथवा दास राहणार नाही. सर्व माणसांना आचार, विचार, धर्म, याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. सगळ्यांची अब्रू व प्रतिष्ठा सुरक्षित असेल. केवळ याच तऱ्हेने आम्ही खऱ्या अर्थाने मुस्लिम बनून आपल्या पालनकर्त्याचे निष्ठावान दास होऊ शकतो. त्या पालनकर्त्यानेच आमच्याकरिता इस्लाम धर्माची निवड केली.

‘आज मी तुमचा ‘दीन’ (जीवनधर्म) तुमच्यासाठी परिपूर्ण केला. आपला कृपाप्रसाद मी तुमच्यावर परिपूर्ण केला आहे आणि तुमच्याकरिता ‘इस्लाम’ची जीवनधर्म म्हणून निवड केली आहे.’ (५:३)

विश्वव्यापी सुधारणांचा कार्यक्रम

इस्लामच्या या क्रांतिकारी सुधारणांचे क्षेत्र केवळ मुस्लिमांपुरतेच मर्यादित नसून आपल्या स्थायीभावानुसार तो एक विश्वव्यापी सुधारणांचा कार्यक्रम आहे. आजच्या संकटमय जगात आपापसांतील युद्धकलहांनी ग्रासलेल्या व तिसऱ्या महायुद्धाचे संकट डोक्यावर धिरट्या घालीत असलेल्या जगाला इस्लामचे अस्तित्व एक महान वरदान वा देणगीसारखेच आहे.

विश्वसाम्राज्यवादाचे दोन तळ

आजचे जग, दोन विरोधी तळांमध्ये भांडवलशाही व साम्राज्यवाद विभाजित असून हे दोन्ही एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. कारण यातील प्रत्येक तळ, जगावर आपले अधिपत्य स्थापण्याची महत्वकांक्षा बाळगतो. जागतिक बाजारपेठा, तसेच महत्त्वाच्या युद्धाच्या जागा व ठाणी, यावर कब्जा करण्यास उत्सुक आहेत. या दोहोंचाही दृष्टिकोन साम्राज्यवादी असून त्यांच्यात जरी मतभेद असले तरी एका बाबतीत त्यांचे पूर्ण एकमत आहे की जगातील इतर राष्ट्रांना ते आपल्या प्रभावाखाली आणून त्यांना दास बनवू इच्छितात. म्हणून अधिकाधिक मानवी बळ, तसेच अधिकाधिक भौतिक साधने आपल्या अधिकारात असावीत, याकरिता दोघेही प्रयत्नशील आहेत. दुसऱ्या माणसांचे मूल्य त्यांच्या दृष्टीने मुक्या पशूपेक्षा अधिक नाही. (आपल्या परिभाषेत हे लोक माणसांना ‘मानवशक्ती’ किवा ‘मानव संसाधन’ असे म्हणतात.) माणसांना या कार्याचे साधन समजतात व त्यांचा उपयोग करुन आपल्या घृणास्पद उद्देशांची पूर्ती करतात.

एक तिसरा तळ

मुस्लिम जगत जर या पाशवी साम्राज्यवादी दानवाविरुद्ध एक होऊन उभे ठाकले तर जागतिक विश्वशांतीला घातक ठरणाऱ्या या आंतरराष्ट्रीय द्वेषपूर्ण संघर्षांना यशस्वी रीतीने व प्रभावीपणाने रोखू शकेल. मुस्लिम राष्ट्रांनी जर एकजूट निर्माण केली तर सहजरित्या व विनासायास एक तिसरा तळ ‘मुस्लिम ब्लॉक’ होऊ शकतो. अशा तऱ्हेचा एखादा ब्लॉक, जर अस्तित्वात आला, तर जागतिक राजकारणाचे महत्त्वाचे केंद्रस्थान होऊ शकतो. कारण भौगोलिकदृष्टया हे मुस्लिम देश पृथ्वीच्या मध्यस्थानी आहेत. आपल्या अशा भौगोलिक स्थानामुळे हे मुस्लिम देश आपल्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने अथवा आपल्या समुदायरुपी ब्लॉकच्या हिताच्या दृष्टीने कसल्याही अडथळ्याविना आपल्या मर्जीनुसार कुठल्याही दुसऱ्या तळाबरोबर राहतील व पौर्वात्य अथवा पाश्चिमात्य साम्राज्यवादाचे अस्त्र बनण्याऐवजी ते आपल्या खऱ्या हिताकरिता संयुक्तरितीने प्रयास करु शकतील.

संबंधित लेख

  • इस्लामची नैतिक व्यवस्था

    माणसामध्ये नैतिक संवेदना ही एक नैसर्गिक आहे. ती काही गुणांना पसंत व काही गुणांना नापसंत करते. ही संवेदना वैयक्तिकरीत्या माणसामध्ये कमी अधिक प्रमाणात असली तरी मानवी बुद्धीने सामुदायिकपणे नेहमी नीतीच्या काही गुणांना चांगले आणि काही गुणांना वाईट ठरविलेले आहे. सत्य, न्याय, वचनपालन व विश्वासपात्रता यांना नेहमी मानवी नीतीमध्ये प्रशंसेस पात्र मानले गेले आहे आणि कोणत्याही काळात असत्य, अत्याचार, वचनभंग व विश्वासघात यांना पसंत केले गेले नाही. सहानुभूती, दया, उदारता व मनाचा मोठेपणा यांची नेहमीच कदर केली गेली आहे.
  • इस्लामी राजकीय व्यवस्था

    इस्लामची राजकीय व्यवस्था ही दोन मूळ सत्यांवर आधारीत आहे. ते खालीलप्रमाणे आहेत. १) अल्लाहचे स्वतःचे स्थान आणि मानवी विश्व - अल्लाह मनुष्याचा आणि ह्या विश्वाचा फक्त निर्माता आणि नियंताच नाही तर खरा मालक व शासकसुध्दा आहे. २) मनुष्याचे स्वतःचे स्थान - मनुष्याला ह्या विश्वात (पृथ्वीवर) अल्लाहने फक्त निर्माण केले आहे असे नाही तर मनुष्य अल्लाहचा नम्र दास आहे आणि अल्लाहचा या पृथ्वीवर प्रतिनिधी (खलिफा) आहे. वरील दोन महत्त्वाच्या सत्यतेवर ‘‘इस्लामी राजकीय व्यवस्था’’ उभी आहे. इस्लामी राजकीय व्यवस्थेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत,
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]