Islam Darshan

इस्लाम व वसाहतवादी पद्धत

Published : Saturday, Apr 16, 2016

वसाहतवादी पद्धत, युद्धे इतर जातींचे शोषण व भांडवलशाही पद्धतीने निर्माण केलेले आणि जगभर पसरलेल्या दोषांच्या संबंधी इस्लाम या सर्वांच्या विरुद्ध आहे. आपल्या वसाहती स्थापन करण्यासाठी अथवा इतरांना आपल्या स्वार्थाचे साधन बनविण्याच्या त्यांच्या उद्देशाशी त्यांच्याविरुद्ध युद्ध करणेसुद्धा इस्लामला पसंत नाही. इस्लाम केवळ एकाच युद्धाला अनुमती देतो व ती म्हणजे अत्याचार व दडपशाहीच्या विरुद्धचे युद्ध. शांततापूर्ण उपायांचा अंगीकार करण्याच्या मार्गात अडसर होण्याच्या स्थितीत सत्याचा व न्यायनिष्ठा उंचावण्याकरिता जिहाद.

कम्युनिस्ट व त्यांचे समर्थक वसाहतवादी पद्धत मान, प्रतिष्ठा व प्रगतीचा एक अनिवार्य टप्पा समजतात, वसाहतवादी पद्धत ही शुद्ध आर्थिक समस्येच्या रुपात प्रकट झाली. प्रगतीशील देशात औद्योगिक उत्पादनामध्ये अधिक वाढ झाली. हा उत्पादित झालेला माल खपविण्यासाठी परदेशी बाजारपेठांच्या गरजेच्या भावनेतूनच ती निर्माण झाली. म्हणून हे माणसाच्या प्रगतीचे एक अनिवार्य आर्थिक प्रदर्शन आहे, ज्याला कोणत्याही नैतिक दृष्टिकोनातून अथवा सिद्धान्ताचे सहाय्य घेऊन ती निर्माण होणेही रोखले जाऊ शकत नाही व ती टाळलीही जाऊ शकत नाही.

येथे आम्हाला या गोष्टीचा पुनरुच्चार करण्याची गरज नाही, की इस्लाम वसाहतवादी पद्धतीच्या संदर्भात हे कथित विचार कदापिही मान्य करीत नाही की वसाहतवाद हा मानवी प्रगतीचा एक अनिवार्य टप्पा आहे. कम्युनिझमला पाठिबा देणारे असाही दावा करतात की रशिया आपल्या उत्पादनवाढीची समस्या, कामगारांची कामाची वेळ कमी करुन तसेच उत्पादनात मानवी श्रमाची बचत करुन तिची सोडवणूक करुन घेईल. प्रश्न असा आहे की जर कम्युनिस्ट रशिया त्याने शोधून काढलेल्या मार्गाच्या सहाय्याने या प्रश्नाची सोडवणूक करु शकतो तर इतर पद्धती त्याचेच सहाय्य घेऊन आपल्या समस्या का सोडवू शकत नाही? त्यांना वसाहतवादी पद्धतीच्या टप्प्यातून जाणे का भाग पडत आहे व ते का अनिवार्य आहे?

इतिहास या गोष्टीची साक्ष देतो की वसाहतवादी पद्धत ही मानवी स्वभावधर्माचा एक फार जुना कमकुवतपणा आहे. तिची सुरुवात भांडवलशाहीच्या कृपाछत्राखाली झाली नाही. तरी आधुनिक प्राणघातक हत्यारांनी सजलेले हे भांडवलवादी येथे येऊन, तिचे शोषण पहिल्यापेक्षा अधिकच वाढविले. जिथे भयभीत जातींच्या अनुचित शोषणाच्या संदर्भात प्राचीन युगातील रोमन वसाहतवादी साम्राज्य, आधुनिक युरोपियन साम्राज्यापेक्षा कोणत्याही दृष्टीने व दर्जाने मागे नव्हते.

इतिहास आम्हाला हेही दाखवितो की युद्धांच्या संदर्भात ‘इस्लाम’ जगातील सर्वांत पवित्र पद्धत आहे. इस्लामी युद्धाच्या कारणस्वरुप कधीही एखाद्या जातीला शोषणाचे लक्ष्य केले गेले नाही व तसेच कोणावर धिक्कारणीय गुलामीही लादली नाही. यावरुन हे सिद्ध होते की इस्लामी जगतामध्ये औद्योगिक क्रांती आली असती तर उत्पादन वाढीची समस्या इस्लामने शांततेच्या मार्गाने सोडवून घेतली असती व हा उद्देश साध्य करण्यासाठी जगाला युद्धाच्या खाईत झोकून देण्याची गरजही इस्लामला भासली नव्हती. तसेच वसाहतवाद व वसाहतवादी साम्राज्य लादण्याचीही गरज भासली नसती. उत्पादन वाढीची समस्याही भांडवलशाही पद्धतीच्या बिघडलेल्या आधुनिक रुपाची देणगी आहे, हेच सत्य आहे. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे जर भांडवलशाहीचे महत्त्वाचे सिद्धान्त बदलले गेले तर उत्पादन वाढीची समस्या मुळातच निर्माण होणार नाही.

संबंधित लेख

  • बहुसंख्याकांची जबाबदारी

    आमच्या बहुसंख्यांक बंधूना असे म्हणणे कदाचित व्यर्थ ठरेल की ईश्वराने हा देश यासाठी तुमच्या स्वाधीन केला आहे की तुम्ही काय कर्तृत्व करुन दाखविता. तुमचा तर असा समज आहे, की हा महान देश तुमच्या बलिदानांच्या फलस्वरुप तुम्हाला लाभला आहे. तुम्ही तसेच समजत राहा परंतु थोडेसे थांबून हा विचार करा की स्वतंत्र व शासक लोकसमुदायाची जबाबदारी काय असते? त्यांच्यात कोणते गुण असले पाहिजे? एखाद्या शासकवर्गात सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचा गुण जो असायला हवा तो औदार्याचा. या मूलभूत गुणांशिवाय वीरता व साहस निर्माण होऊ शकत नाही,
  • आज्ञापालनास ज्ञान व दृढविश्वासाची आवश्यकता आणि ज्ञानप्राप्तीचे साधन

    इस्लाम वस्तुतः ईशआज्ञा-पालनाचेच नाव आहे, मनुष्य ईश्वराच्या आज्ञेचे पालन करू शकत नाही जोवर त्याला काही गोष्टींचे ज्ञान प्राप्त होत नाही आणि जोपर्यंत ते ज्ञान दृढविश्वासाच्या दर्जाप्रत वृद्धिंगत होत नाही. सर्वप्रथम माणसाला ईश्वराच्या सत्तासामर्थ्यावर परिपूर्ण विश्वास असावयास हवा, त्याच्या अस्तित्वावरच जर विश्वास नसेल तर त्याच्या आज्ञांचे पालन तो कसा करू शकेल? त्याचबरोबर ईश्वराच्या गुणवैशिष्ट्यांचे संपूर्ण ज्ञान असावयास हवे. ईश्वर एकच आहे आणि ईशत्वामध्ये त्याचा कोणीही सहभागी नाही, हेच ज्याला माहीत नाही तो इतरासमोर मान झुकविण्यापासून व हात पसरविण्यापासून दूर कसा राहू शकतो?
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]