Islam Darshan

इस्लामी शासन आणि मुस्लिम शासन

Published : Saturday, Apr 16, 2016

इस्लाम काही जीवित प्राणी नाही की जो आपल्या प्रयत्नाने राज्यसत्ता हस्तगत करील आणि त्यास टिकून ठेवेल. इस्लाम तर त्याच्या अनुयायींच्या माध्यमातूनच सत्ता प्राप्त करू शकतो. इस्लामचे अनुयायी (मुस्लिम) आपल्या अथक प्रयत्नांनीच राजकीय सत्तेला आपलेसे करू शकतात. म्हणूनच इस्लामचे खरे अनुयायी ते आहेत ज्यांच्या हातात शासनाधिकार (सत्ता) आहे किवा जे राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहतात. इस्लामच्या या सच्च्या अनुयायींचा राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा उद्देश मात्र फक्त इस्लामला वैभवशाली बनविण्याचा असतो. काहींचा उद्देश मात्र स्वतःला प्रभुत्वशाली बनविण्याचा असतो. अशा प्रकारे इस्लामसाठी सत्ता प्राप्त करणे हे ‘इस्लामी शासना’चे उदाहरण आहे तर स्वतःसाठी सत्ता प्राप्त करणे हे ‘मुस्लिम शासना’चे उदाहरण आहे.

संबंधित लेख

  • इस्लामी न्याय व्यवस्थेची मूलतत्त्वे

    इस्लामी न्याय व्यवस्थेची खालीलप्रमाणे मूलतत्त्वे आहेत. १) इस्लामी कायद्याचे दोन मूळ स्रोत आहेत- कुरआन व हदीस. सर्व कायदेकानू दोहोंत स्पष्ट सांगितलेली आहेत, ती सर्व शाश्वत आणि अपरिवर्तनीय आहेत. ते सर्वकालिक आहेत आणि त्यांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. क्षुल्लक बदलसुध्दा त्यात शक्य नाही. खलीफासुध्दा अशा मूलभूत कायद्यापासून पळ काढू शकत नाही. जो कोणी असे करील तो धर्मद्रोही आहे. अल्लाहने कुरआनमध्ये स्पष्ट केले आहे,
  • स्वतःच्या देहाचे व आत्म्याचे हक्क

    स्वतःच्या देहासंबंधीचे व आत्म्यासंबंधीचे हक्क. मनुष्य आपल्या स्वतःवरच सर्वांत जास्त अत्याचार करीत असतो, हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरेतर ही बाब विस्मयकारकच आहे, कारण सकृतदर्शनी तर प्रत्येक माणसाची अशीच भावना असते की सर्वांत अधिक प्रेम त्याचे स्वतःवरच आहे. कोणताही व्यक्ती स्वतःचाच वैरी असल्याचे मान्यही करणार नाही, परंतु यावर थोडेसे विचार-चिंतन केल्यास यातील वास्तवता तुमच्या दृष्टीस पडेल.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]